ADVERTISEMENT
home / आरोग्य
Healthy Snacks in pregnancy

गरोदरपणात काहीतरी वेगळे खावेसे वाटतेय, मग हे पौष्टिक व टेस्टी पदार्थ खा

गरोदरपणात स्त्रियांना वेगवेगळे डोहाळे लागतात. छान चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं. पण गरोदरपणात मनात आले आणि खाल्ले असे  करता येत नाही. कारण बाळाचे पोषण देखील आईच्या आहारवरच अवलंबून असते. म्हणूनच आईने अगदी विचारपूर्वक आहार घेतला पाहिजे. कधी कधी मॉर्निंग सिकनेसचा त्रास हा तीन महिने उलटून गेल्यावरही सुरूच राहतो. सारखा मॉर्निंग सिकनेसचा त्रास होऊ लागला, पाळी चुकली, थकवा व अशक्तपणा बरोबरच मूड स्विन्ग्स होऊ लागले की गर्भधारणा झाली हे ओळखावे. कारण ही गरोदरपणाची काही लक्षणे आहेत. उलट्यांचा त्रास होत असेल तर अशा वेळेला पौष्टिक खाणेही पचत नाही. काहीच खावेसे वाटत नाही. पण तरीही पौष्टिक खाणे तर आवश्यकच असते. पण नुसतेच साधे रोजचे जेवून कंटाळा येतो. अशा वेळेला पौष्टिक पण चटपटीत पदार्थ खायला मिळाले तर तेवढेच त्या स्त्रीच्या पोटात चार घास जातात. जर तुम्ही गरोदर असाल आणि तेच तेच पालेभाज्या, कडधान्ये खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पुढील पौष्टिक पण चटपटीत पदार्थ खाऊ शकता. 

चीज आणि नट्स प्लेट 

Healthy Eating In Pregnancy
Nuts and Cheese

जेव्हा तुम्हाला पॉवर-पॅक स्नॅकची आवश्यकता असेल, तेव्हा cheddar , गौडा, parmesan  किंवा स्विस यांसारखे हार्ड चीज आणि नट्स असे कॉम्बिनेशन तुम्ही खाऊ शकता.नट्समध्ये फायबर असते आणि चीजमध्ये कॅल्शियम असते. या दोन्हीही गोष्टी बाळाच्या व आईच्याही पोषणासाठी आवश्यक असतात. म्हणून तुम्ही हे पौष्टीक स्नॅक खाऊ शकता. तुम्हाला आवडत असल्यास याबरोबरच होल ग्रेन क्रॅकर्सदेखील खाऊ शकता. तुम्हाला प्रवासात झटपट स्नॅक खायचे असतील तर बदाम आणि मोझरेला स्टिक बरोबर घ्या आणि भूक लागली की ते खा. 

प्रोटीन बार आणि फळे 

गरोदरपणात उपाशी राहू नये. त्यामुळे बाळाच्या वाढीवर तर परिणाम होतोच पण आईलाही त्याचा त्रास होतो. म्हणूनच तुमच्या पर्स, डेस्क ड्रॉवर आणि कारमध्ये हेल्दी स्नॅक्स ठेवा जेणेकरुन जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही खाऊ शकता. प्रोटीन आणि एनर्जी बार टिकाऊ असतात आणि ते ग्रॅनोला बारपेक्षा जास्त पौष्टिक असतात. बहुतेक प्रोटीन बार मध्ये साखर कमी असते, त्यात फायबर, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स असतात. हे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या फ्लेवरचे प्रोटीन बार खाता येतील. तसेच तुम्ही सुकवलेली किंवा कॅन केलेली फळे खाऊ शकता. फळे व्हिटॅमिन्स व फायबरने समृद्ध असतात. फक्त बाजारात मिळणारे इन्स्टंट ज्यूस किंवा पॅक्ड ज्यूस घेऊ नका. कारण त्यात खूप साखर व प्रिझर्व्हेटिव्ज असतात. 

हमस विथ व्हेजीस अँड पिटा चिप्स 

Healthy Eating In Pregnancy
Hummus

तुम्हाला कॉन्टिनेन्टल पदार्थ आवडत असतील तर पिझ्झा बर्गरऐवजी तुम्ही हमस आणि व्हेजीज खाऊ शकता. फक्त याबरोबर इतर कुठले चिप्स न घेता पिटा चिप्स घ्या. या स्नॅकमध्ये भरपूर प्रमाणात  फायबर आहे. हमस बरोबर तुम्ही गाजर, सेलरी, लाल -पिवळी सिमला मिरची, काकडी अशा भाज्या खाऊ शकता. त्यांना आणखी चविष्ट बनवण्यासाठी त्यावर तुम्ही थोडी मिरपूड व चाट मसाला घालू शकता. तुम्हाला याबरोबर काहीतरी कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही पिटा चिप्स किंवा ज्वारी-बाजरीचे चिप्स किंवा नाचणीचे चिप्स देखील खाऊ शकतात. हमस हे काबुली चण्यांपासून बनवतात. त्यामुळे त्यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल व भाज्यांमधून व्हिटॅमिन्स व फायबर मिळेल. 

ADVERTISEMENT

योगर्ट विथ नट्स अँड फ्रुट्स 

Healthy Eating In Pregnancy
Yogurt

गरोदर असताना दररोज कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ दिवसातून तीनदा खाण्याचे लक्ष्य ठेवा, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मजबूत हाडे आणि दातांसाठी पुरेसे कॅल्शियम मिळेल. ग्रीक योगर्टमध्ये नेहमीच्या दह्यापेक्षा जास्त प्रथिने असतात आणि त्याने पोट देखील भरते. हे दही आरोग्यदायी असते. प्रथिने आणि फायबरसाठी या दह्यात 1 ते 2 चमचे काजूचे काप घाला. किंवा बेरीज, ताजी फळे, बदाम, अक्रोड असे कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. 

हे पदार्थ चविष्ट तर आहेतच शिवाय पौष्टिक देखील आहेत.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

28 Mar 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT