ADVERTISEMENT
home / बिग बॉस
नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाशची एन्ट्री, बिग बॉस विनर झाल्यामुळे लागली लॉटरी

नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाशची एन्ट्री, बिग बॉस विनर झाल्यामुळे लागली लॉटरी

बिग बॉस विनर कोण होणार याची प्रेक्षकांना जितकी उत्सुकता होती तितकीच उत्सुकता एकता कपूरच्या नव्या नागिन शोमध्ये मुख्य नागिण कोण असणार हे जाणून घेण्याची होती. कारण आजच्या घडीला हे दोन्ही शो लोकप्रिय आहेत. काल रात्री बिग बॉस फिनालेमध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळाली, बिग बॉस 15 ची विनर होताच ‘नागिन 6’ ची मुख्य नागिण तेजस्वी प्रकाश असेल असं जाहीर करण्यात आलं. ज्यामुळे तेजस्वी प्रकाशची तर काल दुहेरी लॉटरी लागली असंच म्हणायला हवं.

दाक्षिणात्य कलाकारांना बॉलिवूडमध्ये मिळते चुकीची वागणूक, अभिनेत्रीने केला खुलासा

असा लागला एकता कपूरच्या नव्या नागिणीचा लागला शोध

एकता कपूरच्या सुपर नॅचरल ड्रामा ‘नागिन 6’ बद्दल गेले अनेक महिने चर्चा सुरू आहे. नागिन 6 मध्ये मुख्य नागिणचा रोल कोणती अभिनेत्री साकारणार याबद्दल खूपच गुपित बाळगण्यात आलं होतं. एकता कपूरने तर याबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांना प्रश्न विचारून त्यांच्या मनाचा कौलही घेतला होता. मात्र असं असूनही नेमकी कोणती अभिनेत्री या सीझनची नागिण असेल याबद्दल खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर बिग बॉसच्या फिनालेमध्ये तेजस्वी प्रकाश एकताची नवी नागिण असणार हे जाहीर कऱण्यात आलं हे रहस्य दूर करण्यात आलं.

” धर्मवीर” चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट

ADVERTISEMENT

काय आहे चाहत्यांची प्रतिक्रिया 

तेजस्वी प्रकाशच्या परफॉर्मन्सनंतर सलमान खानने खूप  मस्करी करत या गोष्टीचा खुलासा बिग बॉस फिनालेमध्ये केला. सलमानने त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये करण कुंद्राला सांगितलं की तुला तर माहितच आहे की तेजस्वी नागिण आहे मात्र आता एकता हे सर्व जगाला सांगेल. हे ऐकून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हसू लागले. सलमानने यावर मै तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा या गाण्यावर थोडा डान्सही केला. यासोबतच त्यांनी तेजस्वीला ‘नागिन 6’ साठी शुभेच्छा दिल्या.  तेजस्वी प्रकाश बिग बॉस विनर आणि सोबतच ‘नागिन 6’ ची मुख्य नागिण झाल्यामुळे चाहते खूपच खूश आहेत. सोशल मीडियावर तेजस्वीवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. लोकांच्या मते तेजस्वी प्रकाशमुळे ‘नागिन 6’ ला चांगलीच लोकप्रियता मिळेल. आता पर्यंत नागिनचे पाच सीझन झालेले आहेत. ज्यामध्ये मौनी रॉय, अदा खान, अनिता हंसनंदानी, हिना खान, निया शर्मा, सुरभि चंदना यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता चाहते नागिणच्या रूपात तेजस्वी प्रकाशला पाहण्यास नक्कीच उत्सुक आहेत. 

इंदौरमध्ये पूर्ण झालं सारा आणि विकीच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग

31 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT