सोशल मीडियावर (Social Media) कधी कोणता ट्रेंड (Trend) सुरू होईल काहीच सांगता येत नाही. विशेषत मीम्स (Memes) तर सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहेत. तर आता मराठीतील वाक्प्रचारांचे मीम्स सुरू झाले आहेत आणि हे अतिशय मजेशीर असून सध्या मराठी वाक्प्रचार (Marathi Phrases) मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस पडल्याचेच जणू दिसून येत आहे. या मीम्समुळे हसून हसून सगळेच लोटपोट होत आहेत. शब्दशः अर्थ घेऊन त्याचे मीम्स सध्या खूपच व्हायरल होत आहेत. त्याचीच मजा सध्या सगळे घेत आहेत. कधी कोणाचं डोकं कसं चालेल काहीच सांगता येत नाही. मीम्सच्या बाबतीत क्रिएटिव्हिटीला मात्र सध्या जोर आला आहे असंच म्हणावे लागेल. आपण नेहमी कोणतीही गोष्ट फोटोंशी पटकन जवळीक साधून बघत असतो. असाच हा काहीसा प्रकार आहे. लहानपणी आपल्याला मराठी माध्यमातून शिकताना वाक्याचा अर्थ लिहा आणि वाक्प्रयोग करा असे सांगण्यात येत होते. पण त्याचा पुढे जाऊन असाही अर्थ निघेल असं कोणालाच वाटलं नसेल. पाहूया काही मजेशीर मीम्स.
प्राण कंठाशी येणे
मराठीतील हा प्रसिद्ध वाक्प्रचार. एखाद्याचा प्राण कंठाशी येणे अर्थात काहीच करायला न सुचणे. इतके मोठे संकट येणे की, त्यातून कसे बाहेर पडायचे याचा जराही अंदाज न लावता येणे. मात्र हे मराठी मीम (Marathi Memes) पाहिल्यानंतर ओठांवरही हसू थांबूच शकत नाही. या मीममध्ये शशी कपूरने (Shashi Kapoor) अभिनेता प्राण (Pran) यांना कंठाजवळ मिठी मारली आहे. त्यामुळे ‘प्राण कंठाशी येणे’ असा त्याचा अगदी शब्दशः अर्थ लावत मजेशीर मीम तयार करण्यात आले आहे.
ओलीस धरणे
खरंतर ओलीस धरणे हा अत्यंत वाईट कामासाठी शब्द वापरण्यात येतो. एखाद गुंड अथवा कोणीही एखाद्या व्यक्तीचे अपहरण करून घेऊन जातात आणि समोरच्या व्यक्तीकडून खंडणी उकळण्यासाठी त्या व्यक्तीला ओलीस धरण्यात येते. पण इथे मीम्स करताना मात्र अक्षरश हसून हसून पोट दुखेल अशी परिस्थिती निर्माण करणारे मीम तयार करण्यात आले आहे. स्मिता पाटील (Smita Patil) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रसिद्ध ‘आज रपट जाये तो’ (aaj rapat jaye to) गाण्यातील फोटो वापरून ‘ओलीस धरणे’ हे मीम बनविण्यात आले आहे.
अधिक वाचा – मुंबई पोलिसांनीही घेतली बबड्याची दखल, ‘बबड्या चांगला की वाईट…’
वीट आणणे
एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीसाठी हैराण करणे यासाठी हा वाक्प्रचार वापरण्यात येतो. पण इथे अगदी शब्दशः माणूस वीट आणतानाचा फोटो वापरण्यात आला आहे. खरं तर आताच्या घडीला असे लहान लहान क्षणही खूपच मोठे वाटत आहेत. मीम्स करणाऱ्यांचे डोकं नक्की कोणत्या दिशेने धावते याचे कौतुक करतानाही आता शब्द कमी पडू लागले आहेत.
अधिक वाचा – ‘रसोडे मै कौन था’ मीम्स सरकारलाही भावले, असा केला वापर
ताकास तूर लागू न देणे
अंगाची लाही लाही होणे
हे मीम पाहिल्यानंतर तर हसू आवरणेही कठीण होतंय. लाह्या अर्थात पॉपकॉर्न (Popcorn) कोणाला आवडत नाही? अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत चवीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे लाह्या. अंगाची लाही लाही होणे याचा अर्थ एखाद्याबाबत असूया वाटून राग येणे आणि राग अनावर होणे. मात्र इथे अंगाला सर्व बाजूने लाह्या चिकटल्या आहेत आणि त्याचे मीम बनविण्यात आले आहे.
मीम्स बनविण्याऱ्या लोकांचे खरंच कौतुक आहे. आपल्या मातृभाषेतून तयार झालेल्या मीम्सची मजाच काही और असते. तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि हे आर्टिकल आवडले असेल तर शेअर करायला विसरू नका.
अधिक वाचा – या ट्रेडिंग गाण्याने उडवली सगळ्यांची झोप
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक