ADVERTISEMENT
home / सौंदर्य
कलरफुल आयलायनर लावताना लक्षात ठेवा या गोष्टी

कलरफुल आयलायनर लावताना लक्षात ठेवा या गोष्टी

मेकअपमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आयमेकअप… आय मेकअप करताना तुम्ही आयलायनर कसं लावता यावरून तुमचा लुक ठरू शकतो. कारण आयलायनरमुळे तुमचे  डोळे लिफ्ट होतात. डोळे मोठे अथवा छोटे दिसणं हे आयलायनरवर अवलंबून आहे. डोळ्यांना आकर्षक करण्यासाठी तुम्हाला आयलायनर लावण्याची कला यायला हवी. आयलायनरमध्ये जेल, लिक्विड, पेन्सिल असे अनेक प्रकार असतात. शिवाय त्यामुळे वॉटरप्रूफ, स्मज प्रूफ आयलायनरही वापरू शकता. सध्या काळ्या रंगापेक्षा कलर आयलायनरचा ट्रेंड आहे. मात्र कलर आयलायनर वापरण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी माहीत हव्या.

कलर आयलायनर वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात

कलर अथवा रंगीत आयलायनर लावण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टींचे ज्ञान असायला हवे.

लिक्विड आयलायनर निवडा

लिक्विड आयलायनर पातळ असल्यामुळे ते पटकन तुमच्या पापण्यांवर पसरतं आणि  परफेक्ट दिसतं. जर तुम्ही पहिल्यांदा कलर आयलायनर लावणार असाल तर वेगवेगळे प्रयोग करत बसण्यापेक्षा लिक्विड आयलायनर लावणं तुमच्या सोयीचं ठरतं. बाजारात तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे आयलायनर मिळतात. मात्र लिक्विडमध्ये कलर आयलायनर विकत घेणं सोयीचं आणि भरवश्याचं असू शकतं. 

सटल लुक ट्राय करा

कलर आयलायनर मुळे तुमचे डोळे आकर्षक दिसतात आणि सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतात. अशा वेळी जर तुमचा लुक सटल नसेल तर आयलायनरवरून लक्ष भरकटण्याची शक्यता असते. सहाजिकच असा लुक करणं योग्य नाही. यासाठीच कलर आयलायनर लावताना नेहमी सर्वांचे लक्ष आयलायनरकडे जाईल असा साधा आणि सटल लुक करा. 

ADVERTISEMENT

रंग निवडताना सावध राहा

कलर आयलायनरमध्ये आजकाल विविध रंग मिळतात. मात्र या रंगाची निवड करताना नेहमी सावध राहा. तुमच्या स्किनटोनला सूट होईल असा रंग तुम्ही आयलायनरसाठी निवडायला हवा. कारण त्यामुळे तुमचा संपूर्ण  लुक हटके आणि आयकॉनिक दिसू शकेल.

डबल लायनर ट्राय करा

काळ्या रंगाच्या आयलायनरची आपल्याला एवढी सवय लागलेली असते की त्यामुळे दुसरे रंग ट्राय करणं नक्कीच जमत नाही. यावर उपाय म्हणजे काळ्या रंगासह कलर आयलायनर ट्राय करा. दोन रंगाच्या आयलायनरमुळे तुम्ही छान दिसाल शिवाय तुम्हाला या लुकचा संकोचही वाटणार नाही.

कलरफुल आयलायनर लावण्याची उत्तम पद्धत

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आय लायनर ट्राय करता तेव्हा आयलायनर लावताना तुमचा  हात थरथरल्यामुळे तुमचं आयलायनर सरळ न लागता वाकडं तिकडं लागण्याचीअथवा पापणीवर पसरण्याची शक्यता असते. यासाठीच परफेक्ट आयलायनर लावण्यासाठी तुम्हाला काही दिवस सराव करण्याची गरज आहे. सुरूवातीचे काही दिवस तुम्ही आय पेन्सिलचा वापर करा ज्यामुळे तुमचं आयलायनर परफेक्ट लागेल.  बाजारात कलर आयलायनर पेन्सिलचे अनेक प्रकार मिळतात. या पेन्सिल एखाद्या स्केचपेन प्रमाणे तुम्ही तुमच्या पापण्यांवरून ओढून आय लाईन ड्रॉ करू शकता. पेन्सिलने आधी डोळ्यांच्या कोपऱ्यांवर आयलायनर लावा आणि मग दोन्ही कडा एकमेकांना जोडा. ज्यामुळे तुमचे आयलायनर लावताना ते पसरणार नाही. आयलायनर लावण्यात परफेक्ट व्हायचं असेल तर लक्षात ठेवा आयलायनर नेहमी तुमच्या लॅश लाईनजवळ लावाायला हवं. यासाठी सर्वात आधी तुम्ही फक्त एक फाईन लाईन काढू शकता. त्यानंतर गरज असेल तर डबल लाईन अथवा ट्रिपल लाईनने कोट करा. जितका सराव कराल तितकं तुम्मही परफेक्ट आयलायनर लावू शकता. 

या ब्युटी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

पहिल्यांदा आयलायनर लावताना तुम्हाला ‘या’ गोष्टी माहीत असायला हव्या

ADVERTISEMENT

उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)

आयलायनर आणि मस्कारा काढण्याच्या या आहेत सोप्या ट्रिक्स

23 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT