ADVERTISEMENT
home / Travel in India
कँपिंगला जाण्याचा प्लॅन करत असाल तर लक्षात ठेवा या गोष्टी

कँपिंगला जाण्याचा प्लॅन करत असाल तर लक्षात ठेवा या गोष्टी

तरूणाईमध्ये कँपिंग ही सर्वात आवडती अॅक्टिव्हिटी आहे. नैसर्गिक ठिकाणी फिरून तिथे राहणे आणि आपल्या मित्रमैत्रिणींसह निसर्गामध्ये रममाण होणे यापेक्षा अधिक आनंद तो काय असणार? भारतात अनेक प्रसिद्ध कँपिंग डेस्टिनेशन (Camping Destination) आहेत. शहरातील धावपळीपासून लांब कुठेतरी छान निसर्गाच्या सान्निध्यात राहणे अत्यंत छान वाटते. घरातील आयुष्यापासून जरा वेगळे आयुष्य अनुभवायचे असेल तर बरेच जण सध्या कँपिंगचा आनंद घेताना दिसून येतात. मग अगदी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते अगदी लग्न झालेल्या कपल्सपर्यंत सर्वच जण याचा आनंद घेत असल्याचे दिसून आले आहे. पण कँपिंगला जाण्याआधी काही तयारी करणे अत्यंत आवश्यक असते. कँपिंगमध्ये घरच्यासारखे कम्फर्ट नसते. त्यामुळे आपण कोणती तयारी करायला हवी हे जाणून घेणे आवश्यक आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला त्याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. 

कँपिंगसाठी लागणारा रिसर्च करा पूर्ण

कँपिंगचा सर्वात बेसिक नियम आहे की, तुम्ही ऋतूप्रमाणे जागेची निवड करा. कँपिंगसाठी जात असाल तर पावसाचे क्षेत्र निवडू नका. तुम्ही पहिल्यांदाच जाणार असाल तर अगदी दूरची जागा निवडू नका. जी जागा तुम्ही निवडली आहे त्या जागेविषयी तुमच्या मित्रमैत्रिणींकडून अथवा इंटरनेटवरून व्यवस्थित माहिती करून घ्या. काही वेळा अशा जागांवर जाण्याचा धोकाही असू शकतो. त्यामुळे जिथे जाणार आहात तिथली परिस्थिती आणि तिथला परिसर व्यवस्थित जाणून घ्या. माहिती असेल तर तुम्ही आलेल्या परिस्थितीला व्यवस्थित तोंड देऊ शकता.

फिरायला जायचं आहे तर उत्तम पर्याय आहेत कोकणातील पर्यटन स्थळे – Places To Visit In Konkan

कँपिंगचा तंबू मजबूत असायला हवा

कँपिंगचा तंबू मजबूत असायला हवा

ADVERTISEMENT

Freepik

कँपवर जाण्यासाठी तंबू हा सर्वात महत्त्वाचा ठरतो. बऱ्याचदा डोंगरदऱ्यांमध्ये तंबू लावला तर जोराची हवा अथवा येणाऱ्या जाणाऱ्या जनावरांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तंबू अतिशय मजबूत हवा. ज्यामुळे हवा, पाणी आणि उन्हाळा या तिन्ही गोष्टींचा व्यवस्थित सामना करता येईल. तसंच तंबू घेऊन जाताना तुम्ही जागेविषयीही लक्षात घ्यायला हवे. त्यानुसारच याची खरेदी करा. योग्य ठिकाणी तंबू लावा जेणेकरून झोपताना तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. 

तयार करा यादी

तयार करा यादी

Freepik

ADVERTISEMENT

 

आपल्या धावपळीच्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आणि लक्षात ठेवणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे तुम्ही एक यादी बनवून घ्या. कँपिंगला जाण्यापूर्वी एक यादी तयार करून घ्या जेणेकरून तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी विसरणार नाही. जर तुम्ही 5 दिवसासाठी ट्रीप आखत असाल तर तुम्ही काय काय घेऊन जायला हवं याची एक यादी बनवा. तुम्ही पहिल्यांदाच कँपिंग करणार असाल तर तुम्ही वेळ आणि शेड्युलिंग या दोन्ही गोष्टींच्या योजना व्यवस्थित करून ठेवायला हवी. 

महाराष्ट्रात फिरा मनसोक्त, जाणून घ्या वैशिष्ट्य- Places To Visit In Maharashtra In Marathi

कोणत्या गोष्टी हव्यात याकडे करू नका दुर्लक्ष

कँपिंगमध्ये कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या दरम्यान तुम्ही बॅगमध्ये अगदी आपल्याला हवे तितकेच सामान घ्या. जेणेकरून तुम्हाला ओझं होणार नाही. कँपिंगदरम्यान तुम्हाला थंडी वाजली तर त्यासाठी एखादी बेडशिट, खाण्याची पिशवी, पाण्याची बाटली, फर्स्ट एड बॉक्स, कंपास आणि मॅप यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही घेऊन ठेवायला हव्यात. अत्यंत गरजेच्या वस्तूच तुम्ही तुमच्यासोबत घ्या. 

ADVERTISEMENT

पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं (Places To Visit In Monsoon In Marathi)

कँप फायरने वाढवा ट्रीपची मजा

कँप फायरने वाढवा ट्रीपची मजा

Freepik

कँप फायर कँपिंगमध्ये असतेच. रात्री याच्या मदतीने थंडी घालवली जाते आणि शिवाय मित्रमैत्रिणींसह मजा करत गप्पा मारता येतात. याशिवाय जेवण बनवण्यासाठीही हा चांगला पर्याय आहे. यासाठी कँप फायरसाठी लागणारे सर्व सामान तुम्ही तुमच्यासह ठेवा. जेणेकरून तुमची ट्रीप अधिक मजेशीर होईल. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT