ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Things You Should Never Say to Your Kids in Marathi

लहान मुलांसमोर कधीच बोलू नका हे विषय, होतील दुष्परिणाम

लहान मुलं जिज्ञासू असतात, त्यांना प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची असते. ज्यामुळे मुलांच्या मनात अनेक प्रश्न पडत असतात. मोठ्यांसाठी ते प्रश्न साधे अथवा कंटाळवाणे असू शकतात. कधी कधी मुलं असे प्रश्न विचारतात की ज्याचे उत्तर पालकांकडे नसते. पण अशा वेळी मोठ्यांनी मुलांना जर चुकीची उत्तरे दिली अथवा उत्तर देण्याची टाळाटाळ केली तर मुलं त्यातून चुकीचे अर्थ काढू शकतात. जर तुमची मुलं भविष्यात चांगली निपजावी असं वाटत असेल तर मुलांसमोर चुकूनही या गोष्टी बोलू नका.

आपल्या जोडीदाराबद्दल अथवा कुटुंबियांबद्दल चुकीच्या गोष्टी

घर आणि संसार म्हटला की जोडीदारासोबत अथवा कुटुंबियांसोबत वाद अथवा मदभेद असू शकतात. मात्र तुमच्या लहान मुलांसमोर हे वाद कधीच करू नका. कारण याचा तुमच्या मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. आईवडील अथवा घरातील इतर लोकांमध्ये असलेले मदभेद पाहून त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलू शकतो. अशाने मुलांच्या मनात नकळत नकारात्मकता निर्माण होते. ज्यामुळे मुलं भविष्यात कोणावरही विश्वास ठेवू शकत नाहीत.

जबाबदाऱ्यांविषयी भीती

लहान मुलांसमोर घरातील सांसारिक अडचणी, आर्थिक संकट अथवा आजारपणांविषयी असलेली चिंता बोलून दाखवू नका. कारण पालकांमध्ये असलेली जबाबदाऱ्यांविषयी भीती नकळत तुमच्या मुलांच्या मनात परिवर्तित होऊ शकते. अशी मुलं पुढे त्यांच्या आयुष्यातील आव्हानांना पेलण्यास असमर्थ ठरतात. अशी मुलं जस जशी मोठी होऊ लागतात ती त्यांच्या वयातील जबाबदाऱ्या देखील स्वीकारण्यास तयार होत नाहीत.

इतर मुलांची तुलना

पालकांना नेहमीच आपल्या मुलांने चांगले निपजावे असं वाटत असतं. बऱ्याचदा त्यामुळे नकळत मुलांची इतर मुलांशी तुलना केली जाते. अभ्यास, वागणूक, संस्कार यावरून मुलांशी इतरांशी कधीच तुलना करू नका. तुमची मुलं जशी आहेत तशी त्यांना स्वीकारा आणि कौतुक करून त्यांच्यामध्ये आणखी चांगले गुण वाढवा. कारण मुलांना कौतुक केल्याने अधिक उत्साह येतो, मात्र तुलना केल्यास मुलांचा विश्वास तुटतो आणि ती उद्धट होतात.

ADVERTISEMENT

रूढी परंपंराविषयी टीका

आपल्या समाजात अनेक चुकीचे गैससमज अथवा रूढी परंपरा असतात. अनेक पालक त्या रूढी परंपरांमध्ये पुरते अडकले असतात. पण मुलांवर तुमची मतं लादणं चुकीचं आहे. कारण त्यांना स्वतःचे स्वत्रंत मत असू शकते. त्यामुळे अशा गोष्टींवर त्यांचे मत जाणून घ्या. तुम्ही जेव्हा मुलांसमोर उघडपणे एखादी गोष्ट ठामपणे बोलता अथवा टीका करता तेव्हा तुमची मतं नकळत मुलांवर लादली जातात.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT