ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
baked cake

घरात केक बनवताना व्यवस्थित फुलत नसेल तर वापरा सोप्या ट्रिक्स

आजकाल कोणतेही सेलिब्रेशन असो केक (Cake) तर हवाच. लग्नाचा वाढदिवस असो, वाढदिवस असो वा साखरपुडा हल्ली केक तर आपल्याकडे कोणत्याही कारणाने बनवला जातो. खरं तर कोरोना काळापासून केक बनवायला आता काही कारणही लागत नाही. कोणत्याही दिवशी घरात असाच खावासा वाटला म्हणून केक तयार केला जातो. केक बनवणं ही एक कला आहे आणि ती प्रत्येकाला जमतेच असं नाही. पण तुम्हीही घरी केक बनविण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला केक फुलवता येत नसेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. कारण काही जणांचा केक हा काही वेळातच टणक होतो आणि फुलतही नाही. मग अशावेळी नक्की काय करायचं आणि केक करताना कोणते पदार्थ वापरायचे याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

इनोचा करा वापर (Eno)

तुम्हाला जर केक फुलायला आणि मऊ बनायला हवा असेल तर तुम्ही या टिपचा नक्की वापर करा. तुम्ही केक बनविण्यासाठी जेव्हा बॅटर बनवता तेव्हा त्यात अगदी थोड्याशा प्रमाणात इनो घाला. असं केल्यामुळे केक अधिक मऊ आणि मुलायम बनतो. इनोमधील घटकांमुळे हे केक चांगले फुलतात. 

अधिक वाचा – बिस्किटांपासून बनवा मस्त केक, बिस्किट केक रेसिपी (Biscuit Cake Recipes In Marathi)

बेकिंग सोडा अथवा बेकिंग पावडर घाला (Baking soda and Baking Powder)

बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेटने तयार होतो आणि आंबट पदार्थांमध्ये सोडा घातल्या, त्यातून कार्बन डायऑक्साईड गॅस निघतो. यामुळे बबल्स एकत्र होतात आणि केक अधिक स्पंजी बनतो. बेकिंग सोडा सक्रिय होण्यासाठी तुम्ही त्यात दही, ताक अथवा अशा आंबट पदार्थांचे मिक्स्चरही घालू शकता. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात केकमध्ये बेकिंग सोडा अथवा बेकिंग पावडरचा वापर केल्यास, तुमचा केक फुलेल आणि अधिक स्पंजी आणि मऊ, मुलायम राहील. 

ADVERTISEMENT

अंड्यांचा करा प्रयोग (Egg)

आपल्या सर्वांना माहीत आहे की, अंडं हा असा पदार्थ आहे ज्याचा उपयोग आपण खाण्यापासून ते अगदी सौंदर्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी करतो. तुमचा केक तुम्हाला फुललेला हवा असेल आणि अधिक स्वादिष्ट हवा असेल तर तुम्ही अंड्याचा उपयोग करून घ्या. केकचे बॅटर बनवताना तुम्ही अंडे फेटून त्यात घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामुळे केक अधिक हलकाफुलका बनण्यास मदत मिळते. 

अधिक वाचा – असे बनवा घरीच तुमचे आवडते आईस्क्रिम केक (Ice Cream Cake Recipe In Marathi)

ताज्या घटकांचा करा वापर (Fresh ingredients) 

बऱ्याचदा असे होते की, केकमध्ये बेकिंग सोडा घातल्यानंतरदेखील केक व्यवस्थित वर येत नाही. असे होण्याचे कारण म्हणजे आपण त्यामुळे जुन्या बेकिंग सोड्याचा अथवा ओव्हर राईप्ड फ्रूटचा वापर करतो. जो केकसाठी योग्य नाही. त्यामुळे केक बनवताना तुम्ही नेहमी ताज्या पदार्थांचाच वापर कराल याची काळजी घ्या. विशेषतः तुम्ही वापरत असणारा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे ताजेच असावे. 

व्हॅनिला इसेन्सचा करा वापर (Vanilla Essence)

तुम्ही केकमध्ये अंड्याचा वापर करू इच्छित नसाल तर व्हॅनिला इसेन्सचा नक्की वापर करा. कारण व्हॅनिला इसेन्स हा असा एक पदार्थ आहे जो केक फुलण्यासाठी आणि केक अधिक मऊ बनविण्यासाठी उपयोगी ठरतो. जेव्हा तुम्ही केक बनवणार असाल तेव्हा त्या बॅटरमध्ये तुम्ही वॅनिला इसेन्सचा वापर करा. त्याशिवाय तुम्ही या बॅटरमध्ये थोड्या प्रमाणात दहीदेखील घाला. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi)

इतर महत्त्वाच्या टिप्स

  • केक बनवताना तुम्ही सारखा सारखा ओव्हन उघडून पाहू नका. असं केल्यामुळे केक अजिबातच मऊ होणार नाही
  • परफेक्ट केक बनविण्यासाठी तुम्ही ज्या टीनमध्ये केकचे मिश्रण घालणार आहात त्याचा आकार योग्य असायला हवा. उदाहरणार्थ तुम्ही एक कप मैद्याचा केक बनवणार असाल तर तुम्ही 7 इंच आकाराचा टीन घ्या
  • तुम्ही केक बनवत असाल तर ओव्हनमध्ये केक ठेवण्याआधी तुम्ही प्रिहीट करून घ्या. असं केल्याने केकचे मिश्रण जेव्हा तुम्ही ओव्हनमध्ये ठेवाल तेव्हा वेगळा वेळ लागत नाही 
  • केक बनवताना लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या पदार्थांचा वापर केला आहे ते नो रूम टेम्परेचरवर असायला हवेत. त्यामुळे केक अधिक स्वादिष्ट आणि मऊ होतो 
  • केकमध्ये दूध, अंडी आणि मस्का या साहित्याचा तुम्ही वापर करत असाल तर ते नॉर्मल तापमानावरच असावेत 
  • बेकिंग करणे खरं तर सोपे आहे. पण तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की, तुम्ही योग्य मापात सामानाचा वापर करत आहात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT