ADVERTISEMENT
home / Care
घरीच करा बॉडी पॉलिशिंग, फॉलो करा या सोप्या टिप्स

घरीच करा बॉडी पॉलिशिंग, फॉलो करा या सोप्या टिप्स

त्वचेची निगा राखण्याची ती स्वच्छ करण्यासोबतच ती नितळ आणि चमकदार दिसावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सणासुदीला, लग्नकार्यात अथवा एखाद्या खास कार्यक्रमात त्वचा चमकदार दिसावी यासाठी बॉडी पॉलिशिंग करण्यात येतं. बॉडी पॉलिशिंगमुळे नैसर्गिक त्वचेवर ग्लो येतो. ब्युटी पार्लर, स्पामध्ये बॉडी पॉलिशिंग केलं जातं. मात्र या महागड्या ट्रिटमेंटवर पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही घरच्या घरी बॉडी पॉलिशिंग करू शकता. यासाठी तुम्हाला या काही टिप्स फॉलो करा. तसंच वाचा कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट (Best Facial Kits For Dry Skin In Marathi), हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi), घरगुती फेशियल कसे करावे मराठी माहिती (Facial Steps In Marathi)

स्क्रबिंग करा

बॉडी पॉलिशिंगमधील सर्वात महत्त्वाची स्टेप आहे स्क्रबिंग. कारण त्यामुळे त्वचेवरील धुळ, माती, डेड स्किन निघून जाते. जर स्क्रबिंग न करताच तुम्ही इतर प्रॉडक्ट त्वचेवर लावले तर ते त्वचेत खोलवर मुरत नाहीत. यासाठी एखादं चांगलं माइल्ड बॉडी वॉश घ्या त्याने त्वचा स्वच्छ करा आणि घरगुती स्क्रबरने संपूर्ण शरीर स्क्रब करा. मध आणि साखर अथवा ओट्स अशा नैसर्गिक घटकांचा यासाठी वापर करा. स्क्रबिंग करताना त्वचेवर हळुवार मसाज करा. ज्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल. 

कोरफडाचा गर वापरा

स्क्रबिंग केल्यावर त्वचेचा दाह कमी करण्यासाठी तुम्ही संपूर्ण शरीरावर कोरफडाचा गर लावू शकता. कारण कोरफडामध्ये त्वचेला थंडावा देणारे आणि त्वचेच्या समस्या कमी करणारे घटक असतात. कोरफडाच्या गरामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. त्वचा मुळापासून स्वच्छ झाल्यामुळे आणि हायड्रेट झाल्यामुळे त्वचेला पुरेसा ऑस्किजन मिळतो. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसू लागते.

बॉडी लोशन विसरू नका

त्वचा चमकदार दिसण्यासाठी तिचे योग्य पोषण होणं गरजेचं आहे. यासाठी संपूर्ण शरीरावरील त्वचेला बॉडी लोशन लावायला हवं. मात्र आपण घाई घाईत नेहमी फक्त चेहरा, मान, हात आणि पायावरील त्वचेची काळजी घेतो. बॉडी पॉलिशिंग करण्यासाठी संपूर्ण त्वचेवर बॉडी लोशन अथवा चांगलं मॉइस्चराइझर लावा. जस जसं लोशन त्वचेत मुरेल आणि त्वचेचं पोषण करेल त्वचा चमकदार दिसू लागेल. शिया बटर, कोको बटर, मुरू मुरू बटरचा वापरही यासाठी योग्य ठरेल.

ADVERTISEMENT

हायलायटर लावा

एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्हाला बॉडी पॉलिशिंग करायचं असेल तर तुम्ही कार्यक्रमाला जाताना तुमच्या संपूर्ण शरीरावर बॉडी हायलायटर वापरू शकता. कारण त्यामुळे काही काळापुरतं तुमचं शरीर मोत्याप्रमाणे चमकदार दिसेल. डीप नेकलाईन, ऑफ शोल्डर, बॅकलेस ड्रेस घातल्यावर फोटोसेशन करण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी हायलायटर नक्कीच फायद्याचे ठरतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक


18 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT