ADVERTISEMENT
home / लहान बाळ
how to bathe a baby

बाळाला सुरक्षितपणे आंघोळ घालण्यासाठी वापरा ही पद्धत 

गरोदरपणाचा काळ जितका कठीण असतो तितकाच कठीण काळ बाळाच्या जन्मानंतर असतो. नवजात नाजूक बाळाला सांभाळणे खूप कठीण असते. विशेषत: ज्यांना पहिल्यांदाच आई होण्याचा अनुभव येतो त्यांच्यासाठी तर हे सगळे फारच कठीण असते. पहिल्या काही महिन्यांत, लहान मुलं फुलांसारखी नाजूक असतात की त्यांना हातात घ्यायची देखील भीती वाटते. बाळाला दूध पाजणे,  मालिश करणे आणि आंघोळ घालणे हे आईसाठी कठीण काम आहे, ज्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे. बाळाला आंघोळ घालणे तर सर्वात अवघड काम मानले जाते. बाळाच्या डोळ्यात पाणी जाऊ नये, एका जागी बाळ थांबत नाही त्यामुळे ते पटकन निसटून पडू नये, बाळाला फार घट्ट धरल्यास वेदना होऊ नयेत, हे असे काही प्रश्न आहेत ज्यांचा विचार करून प्रत्येक आई घाबरते. परंतु काळजी करू नका, बाळाला आंघोळ घालताना पुढील पद्धत वापरा जिचे पालन केल्यानंतर बाळाला आंघोळ घालण्याचे काम काही दिवसांत तुमच्यासाठी सोपे होईल.

आवश्यक गोष्टी एकाच ठिकाणी ठेवा 

हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही बाळाला आंघोळीसाठी घेऊन जाता, त्याआधी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी ठेवा. जेणेकरून तुम्हाला मदत करणारे कोणी नसेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा उठण्याची गरज पडणार नाही.  

बाळाला कोमट पाण्यानेच आंघोळ घाला

बाहेरचे वातावरण कितीही गरम असले तरीही बाळाला थंड पाणी सहन होणार नाही, तसेच खूप गरम पाणी देखील बाळाला सहन होणार नाही. म्हणूनच बाळाच्या आंघोळीसाठी फक्त कोमट पाणीच वापरा. तसेच बाळाला बाथरूममध्ये नेण्यापूर्वी बादलीत पाणी भरून ठेवा. याने तुमचे काम सोपे होईल. तसेच आंघोळीपूर्वी आपल्या मनगटाने किंवा कोपराने पाणी किती गरम आहे हे तपासा.

How To Bathe A Baby
How To Bathe A Baby

रासायनिक साबण वापरू नका 

हल्ली बाळाच्या आंघोळीसाठी अनेक प्रकारचे लिक्विड क्लिन्झर बाजारात उपलब्ध आहेत. पण लक्षात ठेवा की तुमच्या बाळाची त्वचा फुलासारखी नाजूक असते. विशेषतः पहिल्या दोन महिन्यांत तर बाळाची त्वचा कागदासारखी नाजूक असते. कुठल्याही केमिकलच्या संपर्कात आल्याने बाळाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे त्याला ऍलर्जी, पुरळ येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाळाला साध्या पाण्याने आंघोळ घाला आणि अगदी माईल्ड नैसर्गिक साबण वापरा. 

ADVERTISEMENT

आंघोळीसाठी बाळाला कसे धरावे 

बाळाला आंघोळ घालताना त्याला योग्य पद्धतीने धरणे फार महत्वाचे आहे. अन्यथा, पाणी शरीराच्या नाजूक भागांमध्ये जाऊ शकते आणि ते बाळासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या बाळाला तुमच्या गुडघ्यावर धरा आणि त्याचा चेहरा स्वच्छ करा. यानंतर त्याचे केस साध्या पाण्याने धुवा. बाळाला आंघोळ घालण्यासाठी दोन्ही हात वापरा. बाळाला एका हाताने आधार द्या आणि दुसऱ्या हाताने स्वच्छ करा. म्हणजेच, एका हाताने बाळाला हळूवारपणे आंघोळ घाला. लक्षात ठेवा, यावेळी तुम्ही जितके धीर धरून व शांतपणे काम कराल तितके काम अधिक सोपे होईल.

How To Bathe A Baby
How To Bathe A Baby

 बाथटबमध्ये आंघोळ घालताना काय करावे

जर तुम्हाला तुमच्या बाळाला बाथटबमध्ये बसून आंघोळ घालायची असेल तर त्याच्या डोळ्यात, नाकात आणि कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. जर हवामान थंड असेल तर बाळाचे डोके पाण्यापासून वाचवा. त्याऐवजी, तुम्ही हे भाग ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता. आणि विशेष काळजी घ्या की चुकूनही बाळाला बाथटबमध्ये एकटे सोडू नका. 

बाळाची आंघोळ झाल्यावर सर्वप्रथम, बाळाला मऊ सुती टॉवेलमध्ये गुंडाळून घ्या आणि बेडवर झोपवून आणि मऊ टॉवेलने बाळाचे संपूर्ण अंग हळुवारपणे पुसून कोरडे करून घ्या. यानंतर, सुती मऊ स्वच्छ कपडे घालून त्याला स्तनपान करा. आंघोळ केल्यावर बाळाला थकवा येतो आणि त्याला भूकही लागते. यावेळी पोटभर स्तनपान करून बाळाचे पोट भरल्यावर त्याला चांगली झोप येईल.

अशा प्रकारे तुम्ही बाळाला सुरक्षितपणे आंघोळ घालू शकता.

ADVERTISEMENT

फोटो क्रेडिट – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

14 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT