पार्लर बंद… सगळी दुकानं बंद… आता त्वचेवर वाढलेल्या अनावश्यक केसांचे करायचे काय? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. कारण सगळ्यांकडे वॅक्सच सामान असेल असे सांगता येत नाही आणि सामान असेल तरी त्यांना अगदी व्यवस्थित करता येईल हे ही सांगता येणार नाही. त्यामुळे अनावश्यक केस काढण्याचा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे रेझर(Razor).. हो आम्ही तुम्हाला रेझर वापरु नका हा सल्ला आधी नक्कीच दिला असेल. पण आताची परिस्थिती पाहता लॉकडाऊन संपेपर्यंत तुम्हाला घराबाहेर पडता येणे अगदीच अशक्य आहे. आता या परिस्थितीत तुम्ही रेझर वापरण्याचा विचार करत असाल तर काही सोप्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात. म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्हाला पार्लरमध्ये गेल्यानंतर वॅक्स करताना अडचणी येणार नाहीत.
चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा चेहरा होईल खराब
रेझरचा वापर करताना
shutterstock
सगळ्यात आधी जर तुमच्याकडे गंजलेले किंवा जुने रेझर असेल तर त्याचा वापर अजिबात करु नका. अनेक ठिकाणी मेडिकल सुरु आहेत. तुम्हाला एखादे फॅन्सी नाही. पण साधे रेझर नक्कीच मिळू शकेल (आता हे रेझर शोधण्यासाठी दूर जाऊ नका. तुमच्या घराजवळ असणारे एखादे मेडिकल गाठ).
- आता रेझरचा वापर करताना तुमच्या त्वचेचा पोत तुम्हाला माहीत हवा. म्हणजे तुमची त्वचा नाजूक आहे की नाही ते तुम्हाला माहीत हवे.
- त्वचा नाजूक असेल तर तुम्हाला थोडं सावकाश रेझर वापरायला हवे. याचे कारण असे की, तुम्हाला त्यामुळे जखम होण्याची शक्यता असते.
- सगळ्यात आधी तुम्हाला जो भाग शेव्ह करायचा आहे. तो थोडा ओला करा. शक्यतो आंघोळ करतानाच हे काम उरकून घ्याल तर अधिक उत्तम.
- त्वचा ओली असेल तर तुमचे केस निघण्यास अडचण येत नाही. शिवाय तुम्हाला जळजळतही नाही.
- जर तुम्हाला अजून थोडे स्मुथ सेव्हिंग करायचे असेल तर तुम्ही बॉडीवॉश लावा. थोडा फेस काढा आणि रेझर फिरवा.
रेझर फिरवताना ते एकाच दिशेतून फिरवा( कारण पुढे तुम्ही वॅक्स करायला जाणार असाल तर तुम्हाला कसेही रेझर फिरवल्यामुळे केसांची ग्रोथ चुकीची येऊ शकते आणि वॅक्सला अडचणी येऊ शकतात) - तुमच्या केसांची ग्रोथ पाहा आणि उलट दिशेने रेझर फिरवा. जर केस पूर्ण निघाले नाहीत. तर फार फार तर दोनदा फिरवा . त्यापेक्षा जास्त रेझर फिरवाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.
- त्यानंतर रेझर केलेला भाग स्वच्छ करुन तुम्ही त्यावर अॅलोवेरा जेल किंवा मॉश्चरायझर हलक्या हाताने लावायला विसरु नका.
घरीच करा स्वतःचे वॅक्सिंग, स्वयंपाकघरातील या गोष्टींचा करा वापर
अंडरआर्म्स शेव्ह करताना
shutterstock
आता जर तुम्हाला तुमच्या काखेतील केस काढायचे असतील तर तुम्ही थोडी अधिक काळजी घ्यायला हवी. सध्या आपण पर्याय नाही म्हणून रेझर वापरत आहोत.
- काखेत रेझर फिरवताना तुम्हाला अगदी हलक्या हाताने काखेतील घाम स्वच्छ करुन घ्यायचा आहे.
- काख जर तुम्ही जास्त घासून स्वच्छ कराल तर तुम्हाला त्रास होईल.
- काखेत रेझर फिरवताना तुम्ही तो भाग ओला केला नाही तरी चालेल. तुम्ही त्या भागात टाल्कम पावडर लावा. आणि केसांच्या उलट दिशेने केस काढा.
- काखेतही दोनपेक्षा जास्त वेळा रेझर फिरवू नका. कारण त्यामुळे तुमची त्वचा जळजळू शकते.
- तुमची ग्रोथ तुम्हाला जाड नको असेल तर तुम्ही थोडी अधिक काळजी घ्या. गरज असेल तरच काखेतील केस काढा
आता तुम्हाला या काळात रेझर वापरण्यास काहीच हरकत नाही. पण याचा वापरही तुम्ही जपून करा. दोन दिवस आड किंवा आठवड्यातून एकदा असा करु नका. केसांची पूर्ण ग्रोथ होऊ द्या मगच रेझरचा वापर करा.
तणावामुळे त्वचेवर होऊ शकतात हे दुष्परिणाम
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा.