ADVERTISEMENT
home / Eye Make Up
लिक्विड आय लायनर लावताना अशी घ्या काळजी, डोळे दिसतील सुंदर

लिक्विड आय लायनर लावताना अशी घ्या काळजी, डोळे दिसतील सुंदर

आय लायनरमुळे तुमचा आय मेकअप अधिक चांगला होतो. डोळे अधिक आकर्षक करण्यासाठी जर तुम्ही लिक्विड आय लायनरची निवड केली असेल तर ते लावण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला  हव्या. कारण एक छोटीशी चूक तुमचा पूर्ण लुक खराब करू शकते. आय मेकअप खराब झाला तर सगळी मेहनत वाया जाते आणि सगळा मेकअप पुन्हा करावा लागतो. यासाठीच लिक्विड आय लायनर लावताना या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा आणि दिसा सुंदर आणि आकर्षक

योग्य टूलची निवड करा –

मेकअप करताना सर्वात महत्त्वाचे असतात ते मेकअप टूल्स. कारण त्याच्या मदतीनेच तुम्ही परफेक्ट मेकअप करू शकता. लिक्विड आय लायनर लावताना टोकदार टिप असलेला ब्रश तुमच्याकडे असायला हवा. बऱ्याचदा लिक्विड आयलायनर बॉटलसोबत असा ब्रश दिलेला असतो. पण काही कारणामुळे तो खराब झाला तर त्याच ब्रशने आय लायनर लावण्याचा प्रयत्न करू नका. जर ब्रश पातळ आणि निमुळता असेल तरच तुम्हाला हवं तसं आय लायनर तुम्ही लावू शकता.

लायनर लावताना पापण्या खेचू नका –

बऱ्याचजणींना लिक्विड आय लायनर लावताना ते व्यवस्थित लागावं म्हणून डोळ्याची पापणी खेचण्याची सवय असते. असं केल्यामुळे तुम्ही डोळ्यांवर सरळ लाईन नक्की काढू शकता. पण जेव्हा पापणी पु्न्हा पहिल्यासारखी झाल्यावर तुमचे आय लायनर बाऊंस होते. ज्यामुळे आकार बदलण्याची शक्यता वाढते. पापणीवर जास्तीचे आय लायनर लागण्यामुळे तुमचा लुक बिघडतो. यासाठीच आय लायनर लावताना पापण्या रिलॅक्स आणि मोकळ्याच असू  द्या. ज्यामुळे तुमचं आय लायनर नैसर्गिक दिसेल. लिक्विड आय लायनर लावताना योग्य पद्धत फॉलो करणं खूप गरजेचं आहे. 

घाई घाईत मेकअप करू नका –

आय मेकअप हा अतिशय शांतपणे आणि कौशल्याने करण्याची गोष्ट आहे. सरावाने तुम्हाला आय लायनर लावण्याची सवय नक्कीच होऊ शकते. मात्र सुरूवातीच्या दिवसांमध्ये अशी घाई मुळीच करू नका. जर तुम्हाला बाहेर जाण्याची अथवा लवकर तयार होण्याची घाई असेल अशा वेळी पापण्यांवर लिक्विड आय लायनर लावू नका. कारण असं केल्यामुळे घाई घाईत ते हवं तसं लागणार नाही आणि सुकण्यासाठी योग्य वेळ न दिल्यामुळे पसरून तुमचा मेकअप खराब होईल. लिक्विड आय लायनर लावल्यावर काही मिनिटं डोळे बंद करून ते सुकू द्यावं. जर वेळ नसेल तर लिक्विड आय लायनर पेक्षा पेन्सिल आय लायनरचा वापर करा. 

ADVERTISEMENT

डोळ्यांच्या आकारानुसार द्या शेप-

आय लायनर लावणं ही एक कला आहे आणि तुम्ही सरावाने तुम्हाला हवं तसं आय लायनर लावू शकता. विंग आय लायनर, फॉक्स आय लायनर, क्लासिक कॅट आय लायनर असे निरनिराळे ट्रेंड येत असतात. तुमचे डोळे गोल आहेत, मोनोलिड आहेत, बारीक आहेत की मोठे आहेत हे आधी समजून घ्या. त्यानुसार तुमच्या डोळ्यांना योग्य दिसेल असं आय लायनर लावण्याचा सराव करा.

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

भारतातील सर्वोत्कृष्ट मस्कारा, ज्यामुळे तुमचे डोळे दिसतील आकर्षक (Best Mascara In India)

DIY: आयशॅडोपासून तयार करा कलर आयलायनर, फॉलो करा या स्टेप्स

त्वचेचं नुकसान न करता असा काढा आय मेकअप

17 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT