ADVERTISEMENT
home / Shoes
चप्पल ,शूज ऑनलाईन खरेदी करताय? मग ह्या गोष्टींची काळजी घ्या

चप्पल ,शूज ऑनलाईन खरेदी करताय? मग ह्या गोष्टींची काळजी घ्या

पूर्वी चप्पल किंवा शूज खरेदी करायचे म्हणजे दुकानात जायचे आणि आवडलेली चप्पल घालून बघून, ती चप्पल किंवा शूज घालून दुकानातच चालणे, एक-दोन फेऱ्या मारून बघणे असे आपण करायचो. एकवेळ माप माहित असले तर आपण दुसऱ्यासाठी कपड्यांची खरेदी करू शकतो. पण घालून न बघता चप्पल घेणे आपल्या कल्पनेत सुद्धा नव्हते. मग ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आला आणि सगळंच ऑनलाईन मिळू लागलं. कपडे, मेकअपचे सामान, दागिने ऑनलाईन पटापट घेता येऊ लागले आणि मग या ऑनलाईन दुकानांत चप्पल देखील मिळू लागल्या.

पण आता आली ना पंचाईत? ऑनलाईन स्टोरमधून चप्पल सिलेक्ट तर करता येते पण ती घालून मात्र बघता येत नाही इथेच खरी गोची होते. आता लॉकडाऊनच्या काळात तर दुकानं सुद्धा बंद होती. मग ऐनवेळी चप्पल तुटली,खराब झाली तर ऑनलाईन मागवायची सोय तर होती पण आपल्या पायात परफेक्ट बसणारी चप्पल कशी सिलेक्ट करायची हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला. ऑनलाईन चप्पल, शूज खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला आवडेल ती आणि आपल्या पायासाठी अगदी परफेक्ट चप्पल आपण घरबसल्या मागवू शकतो.  

अधिक वाचा –निऑन फुटवेअरचा ट्रेंड आहे हिट, नक्की करा ट्राय

फोटो झूम करता यावेत

बूट ऑनलाइन खरेदी करताना सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांची गुणवत्ता आणि फिनिशिंग कसे आहे याची अचूक माहिती मिळवणे कठीण होऊ शकते.कायम अश्याच साईटवर खरेदी करा जिथे तुम्हाला चप्पलचे विविध अँगलने काढलेले फोटो दिसतील व ते तुम्हाला चांगले झूम करून बघता येतील. जेणे करून तुम्हाला चप्पल कोणत्या मटेरियलने बनवली आहे तसेच तिचा रंग, पोत व फिनिशिंग या सर्वांची स्पष्ट कल्पना येऊ शकेल.  

ADVERTISEMENT

साईज चार्ट तपासून घ्या

आपल्या आवडीची चप्पल सिलेक्ट करताना कायम साईज चार्ट काळजीपूर्वक तपासून घ्या.  तुम्हाला तुमच्या चप्पलेचा साईज खात्रीपूर्वक माहित असला तरीही एकदा चप्पल विकत घेण्याआधी स्केलने पायाचा साईज मोजून घ्या कारण  बर्‍याच वेळा प्रत्येक कंपनी थोड्या वेगळ्या स्केलचे अनुसरण करते आणि तुम्ही ऑर्डर करण्यापूर्वी त्यांचे स्केल तपासले तर येणारी चप्पल तुमच्या पायासाठी परफेक्ट असेल. साईज चार्ट बघून तुमचा गोंधळ उडाला असल्यास फक्त तुमचा पाय स्केलने सेंटिमीटरमध्ये मोजा आणि तो साईज चार्टमध्ये तपासा. जवळजवळ प्रत्येक कंपनी याच कारणासाठी साईज चार्टमध्ये सेंटीमीटर अनुसार पर्याय देते. 

माहिती काळजीपूर्वक वाचा

तुम्ही घेताय त्या पादत्राणांची काळजी कशी  घ्यायची हे जवळजवळ प्रत्येक साईटवर अगदी तपशीलवार दिले असते. काही चप्पल पावसाळ्यात पाण्यात वापरून चालतात, तर काही पाण्यात नेल्यास खराब होऊ शकतात हे तिथे व्यवस्थित लिहिलेले असते. जर तुम्हाला त्या पॉइंटर्सवर विश्वास वाटत असेल, तरच पुढे जा. तसेच तुम्हाला इतर काही माहिती किंवा मदत हवी असल्यास ब्रँडशी संपर्क साधा. इंस्टाग्रामवर किंवा फक्त त्यांच्या वेबसाइट चॅट बॉक्सवर तुम्हाला हवी असलेली माहिती मिळू शकेल. घाईघाईत चप्पल घेऊन नंतर पस्तावण्यापेक्षा आधीच सगळी माहिती जाणून घ्या. चप्पल जर योग्य मापाची नसली, घट्ट झाली तर शू बाईटचा त्रास होऊ शकतो.

बेस कलर निवडा  

तुम्ही बऱ्याच ड्रेसेसवर मॅचिंग वर मॅच होणारे चप्पल/शूज शोधत असाल तर पांढरा, तपकिरी, काळा, राखाडी, निळा यासारख्या रंगांची पादत्राणे निवडण्याचा प्रयत्न करा. या रंगांचे डिझाईन्स बऱ्याच ड्रेसेसवर मॅच होतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृपया प्राण्यांच्या लेदरपेक्षा व्हेगन लेदर खरेदी करा. व्हेगन लेदरची क्वालिटी ही ऍनिमल लेदरइतकीच चांगली असते आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी देखील होत नाही.  

अधिक वाचाऑनलाईन फूटवेअर खरेदी करताय मग हे वाचाच

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

08 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT