ADVERTISEMENT
home / फॅशन
तुमच्या बॉडी टाईप नुसार कोणते पंजाबी ड्रेस निवडावेत ते जाणून घ्या

तुमच्या बॉडी टाईप नुसार कोणते पंजाबी ड्रेस निवडावेत ते जाणून घ्या

उत्तरेपासून दक्षिणेकडे तरुण मुलींपासून वयस्क आजींपर्यंत सर्वांनीच आपलासा केलेला ड्रेस म्हणजे सलवार सूट किंवा पंजाबी ड्रेस होय. घालायला सोपा, वावरायला सोपा आणि सुटसुटीत असा हा पंजाबी ड्रेस म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय होय. जशी साडी जर चापूनचोपून व्यवस्थित नेसली तर प्रत्येकीलाच सुंदर दिसते, तसाच योग्य फिटिंगचा पंजाबी ड्रेस सुद्धा प्रत्येकीलाच उठून दिसतो.  फक्त कुठल्या कापडाचा, कुठल्या डिझाईनचा ड्रेस निवडावा हे आपल्याला माहित असले पाहिजे. 

आपल्याला लेटेस्ट ट्रेंडप्रमाणे कपडे घालण्याची नक्कीच इच्छा असते. पण फक्त ट्रेंड फॉलो करून जर आपण स्वतःसाठी ट्रेंडी पंजाबी ड्रेसचे पॅटर्न डिझाईन निवडत असू तर अनेकदा आपली ड्रेसची निवड चुकते. कारण नुसते आंधळेपणाने ट्रेंडचे अनुसरण करण्यापेक्षा आपल्या बॉडी टाईपप्रमाणे ड्रेसची निवड करणे जास्त महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या बॉडी टाईपसाठी कुठल्या प्रकारचा पंजाबी ड्रेस योग्य ठरेल. 

ऍपल शेप्ड बॉडी 

जेव्हा आपण ऍपल शेप्ड बॉडी असे म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराचा वरचा भाग गोलाकार आणि खालचा भाग हा बारीक असतो. असा बॉडी टाईप असणाऱ्या स्त्रियांनी कमीत कमी डिझाईन्स असलेले  कॉटन आणि सिल्क यांसारखे सैल आणि फ्लोइंग फॅब्रिक्स निवडले पाहिजेत. या फॅब्रिकमध्ये शरीराचे नैसर्गिक कर्व्हज उठावदार दिसतात. जर बॉडी फिटिंग म्हणजे अंगाला चिकटणारे फॅब्रिक घेतले तर त्यामुळे ऍपल शेप्ड बॉडी टाईप असलेल्या स्त्रियांची फिगर चांगली दिसत नाही. तसेच हा बॉडी टाईप असलेल्या स्त्रियांना गडद रंगाचे पंजाबी ड्रेस चांगले दिसतात. तसेच ज्यात कम्बर जाड दिसेल असे प्लीट्ससारखे डिझाईन टाळा. या स्त्रियांना चुडीदार देखील छान दिसतात कारण या डिझाईनमध्ये कंबर अधिक सडपातळ दिसते.

पेअर शेप्ड बॉडी 

बहुतांश भारतीय स्त्रिया या पेअर शेप्ड बॉडी टाईपमध्ये मोडतात. हा बॉडी टाईप ऍपल शेपच्या अगदी उलट आहे या बॉडी टाईपमध्ये शरीराचा वरचा आकार बारीक व खालचा भाग जास्त गोलाकार असतो. या स्त्रियांनी लांब आणि फ्लोइंग कपडे घालावे जे नितंबांवर नव्हे तर सडपातळ कंबरेवर अधिक लक्ष केंद्रित करतात. या स्त्रियांना लांबलचक अनारकली छान दिसतात. याचे कारण असे की ते वरच्या बाजूस अरुंद असतात आणि तळाशी रुंद होतात. आणि तुमच्या सडपातळ वरच्या शरीराला हायलाइट करतात. तसेच या स्त्रियांना पंजाबी सूट आणि चुडीदार यांसारखे कपडे देखील चांगले दिसतात. जे खालच्या अर्ध्या भागाच्या तुलनेत वरच्या शरीरासाठी अधिक प्रमाणात लूक देतात. जॉर्जेट आणि शिफॉन सारख्या फॅब्रिकची निवड करा. तसेच मोठ्या नेकलाइनसह कुर्तीवरील डिझायनर भरतकाम आणि मोठ्या प्रिंट्स या स्त्रियांना छान दिसतात. 

ADVERTISEMENT

स्ट्रेट बॉडी 

सरळ आकाराचे शरीर असलेल्या स्त्रियांचे पोट सपाट असते आणि त्या उंच असतात. त्यांचे शरीर ऍथलेटिक असते. त्यामुळे त्यांना गाऊन, अनारकली आणि स्ट्रॅपी कुर्ती सुंदर दिसतात.सरळ शरीर असलेल्या किंवा आयताकृती आकाराच्या शरीराच्या स्त्रियांचा आकार डोक्यापासून ते पायापर्यंत सारखाच असतो आणि त्यांना शरीराच्या कोणत्याही वैशिष्ट्यांना लपवण्याची किंवा हायलाईट करण्याची गरज नसते. त्यामुळे कोणत्याही डिझाईनचा सलवार सूट छान दिसतो.परंतु फ्लोअर लेन्थचा अनारकली सूट त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतो. तसेच रफल्स आणि फ्लोई स्लीव्हज तुमच्या बस्ट आणि खांद्याच्या भागामध्ये व्हॉल्यूम वाढवतात आणि त्यात कंबर अधिक बारीक दिसते. तुम्ही स्ट्रॅपी कुर्ती आणि डिझायनर सलवार सूट देखील उत्तम कॅरी करू शकतात. 

अवरग्लास शेप्ड बॉडी  

कोका-कोला बाटली किंवा अवरग्लास फिगर म्हणून ओळखली जाणारी फिगर प्रत्येक स्त्रीला हवी असते. या फिगरमध्ये कुठलाही भारतीय पोशाख सुंदर दिसतो. फ्लोई आणि सैल फिटिंगचे कपडे तुमची फिगर लपवतील. त्यामुळे असे कपडे घालू नका. कुठल्याही डिझाईनचे ब्राईट आणि सटल रंगांचे उत्तम फिटिंगचे सलवार सूट तुम्हाला छान दिसतील. 

Photo Credit- Pinterest

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Mar 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT