ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Tips to take care of your Washing Machine During Monsoon in Marathi

पावसाळ्यात वॉशिंग मशीन बिघडू नये यासाठी अशी राखा निगा

पावसाळ्यात हवेतील उष्णता कमी होऊन वातावरणात छान गारवा निर्माण होतं. त्यामुळे सहाजिकच पावसाळ्यात सगळीकडे आनंदी आणि उत्साही वातावरण असतं. मात्र पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढते आणि त्याचे काही दुष्परिणामही भोगावे लागतात. या वातावरणात जीवजंतू पोसले गेल्यामुळे आजारपणं वाढतात. तसंच कपडे वारंवार भिजतात आणि लवकर सुकत नाहीत. पावसात भिजल्यामुळे आपले कपडे अनेक वेळा खराब होतात, ज्यामुळे ते धुण्याचा भारही वाढतो. गोदरेज अप्लायन्सेसचे वॉशिंग मशीन्स उत्पादन समूहप्रमुख राजिंदर कौल यांच्या मते, भारतात राहणारे सुमारे एक तृतीयांश शहरी नागरिक आजकाल कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनवर अवलंबून आहेत. पावसाळ्यात वॉशिंग मशीचा वापर अधिक वाढतो. यासाठीच वॉशिंग मशीन वर्षभर आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात नीट चालणे गरजेचं आहे. यासाठीच फॉलो करा या सोप्या टिप्स ज्यामुळे तुमची वॉशिंग मशीन लवकर बिघडणार नाही. यासोबतच वाचा आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi), घराची सजावट करून द्या घराला नवा लुक, करा स्वस्तात मस्त सजावट (Home Decor Ideas In Marathi)

योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरा

वॉशिंग मशीन नीट सुरू राहण्यासाठी योग्य प्रकारचे आणि योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरणं गरजेचं आहे. यासाठी मशीनसोबत मिळालेली माहिती पुस्तिका नीट वाचा. उदाहरणार्थ, टॉप लोड मशीनसाठी असलेले खास डिटर्जंट तुम्ही फ्रंट लोड मशीनमध्ये वापरू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या कपड्यांचा लोड किती आहे त्यानुसार तुम्ही डिटर्जंटचे प्रमाणदेखील तपासले पाहिजे. खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणात डिटर्जंट वापरू नये. हे प्रमाण किती असाव, याची माहिती तुमच्या मशीन मॅन्युअलमध्ये समाविष्ट असते.

मशिन नीट स्वच्छ करा

डिटर्जंट किंवा जड पाण्यामुळे काहीवेळा मशीनवर डाग येतात. घाणीचा अनावश्यक थर निर्माण होतो. यामुळे कपडे धुण्याच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो आणि विशेषतः फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीनमध्ये दुर्गंधी येऊ लागते. यासाठी वॉशिंग मशीनची खास क्लिनिंग पावडर वापरून डिटर्जंटचे डाग वेळोवेळी काढून टाकणे आवश्यक आहे. मशीनमध्ये कपडे न घालता किंवा ‘टब क्लीन मोड’ वापरून मशीन अशा प्रकारे आतून स्वच्छ करता येते. ही प्रक्रिया दर महिन्याला करावी. थोडेसे पांढरे व्हिनेगर टाकून गरम पाण्याचा ‘एम्टी लोड’ लावणे ही एक उत्तम पर्याय आहे.  ही ‘एम्टी लोड’ची प्रक्रिया सुरू असताना मध्येच मशीनमध्ये थोडे डिटर्जंट टाकावे आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबावे. स्वच्छ टॉवेल वापरुन मशीनमधील ड्रम, दरवाजे आणि गास्केट पुसून घ्यावेत.

दुर्गंधी टाळण्यासाठी

आपल्या वापरलेल्या कपड्यांना कधी कधी  वास येत असतो. तसेच कपडे मशीनच्या धुण्याच्या जागेमध्येही काही वास अडकून राहतो. हा वास घामाचा असल्यामुळे कधीच चांगला नसतो. यासाठी प्रत्येक वॉशनंतर वॉशिंग मशीनचे झाकण काही वेळ उघडे ठेवा. असं केल्यामुळे मशीन सुकते आणि त्याच्या आतमध्ये ताजी हवा खेळती राहणे, वास निघून जातो. त्याचप्रमाणे कपडे धुवून झाल्यावर मशीनच्या दाराच्या सभोवतालची गास्केट व्यवस्थित पुसून घ्या. असे न केल्यास तेथे बुरशी साठू शकते ज्यामुळे कपड्यांना इनफेक्शन होऊ शकते. 

ADVERTISEMENT

कपडे धुण्याचे नियोजन 

वॉशिंग मशीनचा पूर्ण क्षमतेने वापर तुम्ही करीत असाल, परंतु मशीनमध्ये कधीही क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुण्यास टाकू नका. थोडक्यात मशीन ओव्हरलोड होता कामा नये. ज्यामुळे तुमचे मशीन शक्य तितक्या कमी प्रमाणात ऊर्जा वापरू शकते. जेव्हा तुम्हाला फक्त थोडेच कपडे धुवायचे असतील तेव्हा मशीनचा इको मोड (निवडक वॉशिंग मशीनमध्ये उपलब्ध असणारी सुविधा) वापरा. या सुविधेमुळे वीज आणि पाणी यांची बचत होते.

जंतूनाशक पर्याय

बेडशीट, खूप घाण झालेले कपडे, घराबाहेर वापरलेले व पावसाच्या पाण्याने, चिखलाने बरबटलेले कपडे धुताना वॉशिंग मशीनमधील जंतूनाशक हा पर्याय वापरा. याचे सेटिंग वॉशिंग मशीनमध्ये उपलब्ध असते. यामध्ये मशीनमध्ये असलेला हीटर वापरला जातो आणि तुम्हाला तुमचे कपडे गरम पाण्यात धुता येतात. बहुतांश फ्रंट-लोड वॉशिंग मशीनमध्ये हे अंगभूत वॉटर हीटर बसवलेले असते. तसेच काही निवडक टॉप-लोड वॉशिंग मशीन आणि सेमी-ऑटोमॅटिक मॉडेल्समध्ये ही सुविधा देण्यात आलेली आहे. सध्याच्या विशेष काळजी घेण्याच्या काळात ही सुविधा अतिशय उपयुक्त आहे. 

लिंट कलेक्टर स्वच्छ ठेवा

वॉशिंग मशीनमध्ये अनेक वेळा कपडे धुवून झाल्यानंतर मशीनमधील ‘लिंट कलेक्टर’ भरून जाते (हा भाग बहुतांश मशीन्सच्या मध्यभागी आढळतो). आठवड्यातून किमान एकदा नळाच्या पाण्याखाली धुवून हा कलेक्टर स्वच्छ करा. हा कलेक्टर लिंटचे कण कार्यक्षमतेने गोळा करत राहील याची काळजी घ्या. कपडे उत्कृष्ट पद्धतीने स्वच्छ केले जावेत यासाठी ही सोपी टीप फार महत्त्वाची आहे. 

मशीनमधील कंट्रोल्स

काही मशीन्समध्ये ओलावा प्रतिरोधक नियंत्रण असतात. परंतु काही मशीन्समध्ये ही सोय नसते. म्हणून ओले कपडे नेहमी मशीनच्या कंट्रोल पॅनलपासून दूर ठेवावेत. 

ADVERTISEMENT

बेसिक गोष्टी

घरातील सर्व उपकरणांसाठी योग्य प्रकारचे अर्थिंग असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही उपकरणे सुरक्षित राहतात. घरात एखादे उपकरण बसवून घेण्यापूर्वी इलेक्ट्रिशियनकडून अर्थिंगची स्थिती आपण तपासून घेतली पाहिजे. अनेकदा असे दिसून येते की ग्राहक आपले वॉशिंग मशीन उघड्यावर चुकीच्या जागी ठेवतात. बऱ्याचदा मशीन्सच्या तळाशी उंदीर-विरोधक जाळ्या बसवलेल्या असतात. पण तरिही मशीन सुरक्षित ठिकाणी आणि उंदरांपासून दूर ठेवण्याची शिफारस केली जाते. कारण उंदीर तुटलेल्या तारांकडे सहजपणे आकर्षित होतात आणि त्यामुळे सुरक्षाविषयक गंभीर समस्या निर्माण होतात. 

रेग्युलर सर्व्हिसिंग

अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संबंधित असलेल्या तंत्रज्ञांकडून वॉशिंग मशीनची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक असते.  मशीनमधील विविध भाग आणि घटक यांची स्वच्छता व देखभाल या गोष्टी आपण ग्राहक म्हणून करू शकत नसतो. वॉशिंग मशीन नीट सुरू राहण्यासाठी अशी देखभाल गरजेची आहे. मशीनमधील एखादा भाग झिजू लागल्यास त्याबाबत हा तंत्रज्ञ आपल्याला वेळीच खबरदार करतात आणि त्याची दुरुस्तीही वेळेवर करतात. ज्यामुळे मशीनमध्ये होणारा मोठा बिघाड टाळता येतो.

या टिप्सनुसार काळजीपूर्वक वापर आणि नियमित देखभाल केल्यास आपल्या घरातील कोणतेही वीजेचे उपकरण केवळ पावसाळ्यातच नव्हे तर पुढील अनेक वर्षे अधिक चांगल्या पद्धतीने सुरू राहू शकते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Aug 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT