बरेचदा आपल्या शरीरयष्टीबाबत महिला सजग असतात. वजन अथवा उंची या अशा दोन गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी समस्या निर्माण करतात. कोणत्याही महिलेची उंची कमी असेल तर उंच दिसण्यासाठी किती गोष्टी कराव्या लागतात याला काही प्रमाणच नाहीये. काही महिला तर कमी उंची असल्यामुळे आत्मविश्वासाने सामोरेही जात नाहीत. आपल्या वॉर्डरोबमध्ये असे काही कपडे असतात ज्यामुळे तुम्ही उंच दिसू शकता. विशेषतः तुम्ही टॉप्स आणि टी-शर्ट्सची स्टाईल करून तुमची उंची अधिक मोठी दिसू शकते. तुमची उंची जर कमी असेल तर तुम्ही तुमच्या कपाटातील सैलसर शर्ट्स, मोठे आणि लांब टॉप्स बाहेर काढा. तुम्ही तुमची कपडे घालण्याची स्टाईल जर बदलली तर तुम्ही तुमच्या कमी उंची मोठी दाखविण्यासाठी भास नक्कीच निर्माण करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही स्टायलिंग टिप्स (Styling Tips) या लेखाद्वारे देत आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही आत्मविश्वासाने आपली उंची अधिक दर्शवू शकता.
शर्ट बाहेर ठेऊ नका
- जर तुम्ही शर्ट घालणार असाल तर तुम्ही शर्ट अजिबात पँटच्या बाहेर लटकू देऊ नका. यामुळे तुमची उंची कमी दिसते
- तुम्हाला जर शर्ट बाहेर ठेवायचा असेल तर त्याची एक बाजू आत खोचा आणि एक बाजू बाहेर अशी स्टाईल करा. अशा पद्धतीने शर्ट घातला तर कंबर अधिक बारीक दिसते आणि तुमची उंची अधिक असल्याचा भास होतो
क्रॉप टॉप निवडा
- तुम्हाला टॉप घालायचा असेल तर तुम्ही तुमच्या कमरेच्या खाली अधिक दिसून येईल असा टॉप निवडू नका
- लहान उंची असणाऱ्या मुलींना क्रॉप टॉप अधिक चांगले दिसतात, कारण क्रॉप टॉप तुम्हाला उंच दाखविण्यासाठी मदत करतात. तुमचा टॉर्सोचा भाग कव्हर न करता तुमची उंची यामुळे अधिक दिसून येते. उंच दिसण्यासाठी तुम्ही हा उपाय करून पाहू शकता.
मोनोक्रोम रंग आणि व्हर्टिकल स्ट्राईप्स घाला
- लहान उंची असणाऱ्या महिलांनी वा मुलींनी मोनोक्रोम कलर्स आणि व्हर्टिकल स्ट्राईप्सची निवड करावी
- लहान उंची असलेल्या महिलांना आपली उंची अधिक आहे असे भासवायचे असल्यास, मोनोक्रोम रंगांची निवड करावी, जेणेकरून रंग कॉलममध्ये उठून दिसतात आणि तुमचे शरीर अधिक उठावदार दिसून येते
व्ही नेकलाईनचे टी-शर्ट आणि टॉप घाला
- व्ही नेकलाईनचे टी-शर्ट्स तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट नक्की करून घ्या. लोअर नेकलाईन तुमची मान अधिक उंच दर्शविण्याचा भास निर्माण करते
- जर तुमची उंची कमी असेल आणि खांदे पसरट असतील तर तुमच्या शरीरयष्टीसाठी हे उत्तम आहे. यामुळे तुमची उंची अधिक दिसून येते
तुमची उंची कमी असेल तर तुम्ही स्लिम-फिट टॉप्स घालणे सहसा टाळा. तसंच तुमची हेअरस्टाईल, तुमचे शूज इत्यादी फॅशनमध्येही तुम्ही बदल करा. तुम्ही जर या टिप्स पाळल्यात तर तुम्ही नक्की तुमची उंची अधिक दाखवू शकता. याशिवाय तुम्हाला हाय हिल्सचा अधिक वापर करण्याचीही गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या उंचीनुसार कपड्यांची आणि स्टाईल्सची निवड करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक