ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Uses Of Glycerin

केवळ मऊ त्वचेसाठीच नाही तर या कामांसाठीही वापरता येते ग्लिसरीन

आपण अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो, त्यापैकी ग्लिसरीन हे रसायन तर जवळजवळ सगळ्याच घरांत असते. ग्लिसरीनचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो जसे की क्लिन्झर, मॉइश्चरायझर किंवा टोनर इत्यादी. पण ग्लिसरीन म्हणजे नक्की काय? हे हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजनचे बनलेले द्रव, सेंद्रिय संयुग आहे. हे दाट, गंधहीन आणि रंगहीन आहे आणि मॉइश्चरायझर्स, साबण आणि यासारख्या सौंदर्य उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमध्ये वापरले जाते. पण सौंदर्यप्रसाधनांव्यतिरिक्त ग्लिसरीनचा वापर छपाई उद्योगात, फार्मास्युटिकल्समध्ये आणि पदार्थांमध्ये स्वीटनर म्हणून देखील केला जातो. जेव्हा तुम्ही ग्लिसरीन विकत घेता तेव्हा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की त्यात 2 प्रकार आहेत. पहिली प्रकार म्हणजे नैसर्गिक ग्लिसरीन जे वनस्पतीच्या तेलापासून मिळते. तर दुसऱ्या प्रकारचे ग्लिसरीन हे सिंथेटिक असते जे पेट्रोलियम-आधारित तेलांपासून बनविले जाते. नैसर्गिक ग्लिसरीन विषमुक्त आणि वापरण्यास सुरक्षित आहे तर सिंथेटिक ग्लिसरीन तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते. म्हणूनच ग्लिसरीन विकत घेताना नैसर्गिक ग्लिसरीनच घ्यावे. ग्लिसरीनचा वापर आपण केवळ त्वचेची काळजी घेण्यासाठीच नाही तर अनेक घरगुती कामे सुलभ करण्यासाठी करू शकता, कसे ते जाणून घेऊया.

वुडन फ्लोरिंग तसेच लाकडी फर्निचर स्वच्छ ठेवणे 

वार्निश केलेल्या आणि पॉलिश केलेल्या पृष्ठभागाचे धुळीपासून संरक्षण करण्यासाठी आपण ग्लिसरीनचा वापर करू शकतो. त्यासाठी एक नॅपकिन ग्लिसरीनमध्ये बुडवून त्याने फर्निचर पुसून घ्या. तसेच लॅमिनेट, लिनोलियम, पार्केट आणि इतर कोणतेही.फ्लोरिंग साफ करण्यासाठी व चमकवण्यासाठी एक बादली पाण्यात 2-3 चमचे ग्लिसरीन घालावे आणि ढवळावे व त्याने लादी पुसून घ्यावी. लेदर अपहोल्स्ट्रीसह चामड्याच्या वस्तू नव्या व चांगल्या दिसण्यासाठी आपण ग्लिसरीनचा वापर करू शकतो. त्यासाठी या वस्तू ग्लिसरीनने नियमितपणे पुसाव्यात.  

Uses Of Glycerin
Uses Of Glycerin

काचा आणि आरसे पुसणे 

आपण दैनंदिन जीवनात खिडकीच्या काचा आणि आरसे पुसण्यासाठी ग्लिसरीन वापरू शकता. ग्लिसरीन हे एक साधे पॉलीओल कंपाऊंड असल्याने, याच्या मदतीने घाण सहजपणे साफ केली जाते. यासाठी पाणी आणि डिटर्जंट घ्या व त्यात २ चमचे ग्लिसरीन टाकून या द्रावणाने काचा व आरसे स्वच्छ पुसून घ्या. तसेच रेफ्रिजरेटरच्या दरवाजावरील रबर सील अधिक लवचिक राहावे यासाठी ते ग्लिसरीनने पुसून घ्यावे.  

कपड्यांवरील डाग काढणे

स्टँडर्ड डिटर्जंट्सपेक्षा डागांशी लढण्यासाठी ग्लिसरीन कधीकधी अधिक प्रभावी असते. कपड्यावर पडलेले चिकट डाग काढून टाकण्यासाठी ग्लिसरीन वापरता येते. फक्त वापरण्यापूर्वी ग्लिसरीन गरम करावे आणि जिथे डाग पडला आहे त्यावर ते लावावे आणि 30 मिनिटे ठेवावे व नंतर कपडे धुवावे. 

ADVERTISEMENT

जखम बरी करण्यासाठी वापरणे 

तुम्ही ग्लिसरीनने फक्त कोरड्या त्वचेवरच नव्हे तर तुम्ही तुमच्या जखमेवर देखील उपचार करू शकता आणि संसर्ग कमी करू शकता. ग्लिसरीन लावल्यावर तुम्हाला थोडी जळजळ जाणवत असली तरी ते लावल्यावर तुमची जखम नक्कीच लवकर बरी होईल.

पेंटिंगसाठी वापर करणे 

जर तुम्हाला पेंटिंगची आवड असेल तर तुम्ही पेंटिंगच्या रंगांमध्ये ग्लिसरीन वापरू शकता. रंगांत ग्लिसरीन मिसळून वापरले तर तुमच्या पेंटिंगचा रंग दीर्घकाळ टिकून राहील. 

Uses Of Glycerin
Uses Of Glycerin

करपलेली भांडी स्वच्छ करणे 

जर तुमची भांडी स्वयंपाक करताना करपली असतील तर तुम्ही ग्लिसरीनच्या मदतीने ती स्वच्छ करू शकता. यासाठी डिशवॉशिंग लिक्विड आणि ग्लिसरीन एका भांड्यात घेऊन एकत्र करा आणि त्याने भांडी घासा. भांड्यांचा ओशटपणा काढण्यासाठी तुम्ही कोमट पाणी देखील वापरू शकता.

तुम्ही ग्लिसरीनचा असा विविध प्रकारे वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

Photo Credit – istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

29 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT