ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Vastu Tips For Name Plate

घराला नेमप्लेट लावताना वास्तुशास्त्राच्या या गोष्टी ठेवा लक्षात 

नेमप्लेट म्हणजेच आपल्या घराची ओळख असते. नेमप्लेटवर घरात राहणाऱ्या मुख्य व्यक्तीचे नाव लिहिलेले असते. बहुतेक घरांच्या बाहेर नेम प्लेट्स लावलेल्या असतात. स्वतःच्या मालकी हक्काचं घर घेतल्यावर तर आपल्या नावाची एक सुंदर नेमप्लेट लावणं हे बहुतांश लोकांचं स्वप्नं असतं. नेमप्लेट ही जर सोय असली तरी हल्ली तो इंटेरियरचाच एक भाग असतो. दारावर नेमप्लेट लावल्याने लोकांना तुमचे घर शोधण्यात अडचण येत नाही. पण नेमप्लेट्स लावण्याचेही वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत.नेमप्लेट हे आपल्या घराचे पहिले इम्प्रेशन असते. तुमच्या घराची नेमप्लेट तुमचे व्यक्तिमत्व देखील प्रतिबिंबित करते. अशा परिस्थितीत नेमप्लेट्सशी संबंधित वास्तुशास्त्राच्या काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.वास्तूमध्ये नेमप्लेट खूप महत्त्वाची मानली जाते. नेमप्लेट ही तुमच्या घराची ओळख तर असतेच पण असे मानले जाते की ती स्वतःकडे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. अनेक लोक आपल्या घराचे काही छानसे नाव ठेवतात व नेमप्लेटवर तेच नाव घालतात आणि त्याबरोबर घराच्या प्रमुखाचे नावही लिहून घेतात. लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नेमप्लेट लावतात. आज या लेखात आपण जाणून घेऊया नेमप्लेटचे महत्त्व आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ती लावताना कुठले नियम पाळावेत जेणेकरून तुमच्या जीवनात प्रसिद्धी, सुख आणि समृद्धी येईल.

Name Plate According To Vastu
Name Plate According To Vastu

वास्तुशास्त्राप्रमाणे नेमप्लेट लावण्याचे नियम 

  • घराची नेमप्लेट नेहमी व्यवस्थित आणि योग्य आकारात असावी. सर्वोत्तम नेमप्लेट आयताकृती मानली जाते. तसेच नेमप्लेट नेहमी दोन ओळीत लिहावी आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावावी.
  • नेमप्लेटवर अक्षरांची रचना स्पष्टपणे लिहावी. जर तुमचा व्यवसाय असेल तर तो ही नेमप्लेटवर स्पष्टपणे लिहिला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही डॉक्टर असाल किंवा वकील असाल तर तुमच्या नावाच्या समोर डॉ. किंवा ऍड. असे आवर्जून लिहा. 
  • नावाच्या फलकावर नाव अशा प्रकारे लिहिले पाहिजे की ते नेमप्लेट जास्त भरलेली दिसू नये किंवा ती फार रिकामी सुद्धा दिसू नये.
  • नेमप्लेट तुटलेली नसावी किंवा ती सैल नसावी. नेमप्लेटला छिद्र पडले असतील तर ती त्वरित बदलून घ्या. 
  • नेमप्लेट नेहमी स्वच्छ ठेवा. त्यावर धूळ आणि माती साठू देऊ नका. तसेच त्यावर कोळ्याची जळमटेही लागू देऊ नका. वेळोवेळी नेमप्लेट स्वच्छ पुसून घ्या. 
Name Plate According To Vastu
Name Plate According To Vastu
  • नेमप्लेटचा रंग हा घराच्या प्रमुखाच्या राशीनुसार ठरवावा. घराच्या प्रमुखाच्या राशीनुसार जो रंग लकी आहे त्या रंगाची नेमप्लेट लावा. 
  • तुम्हाला उजव्या बाजूला नेमप्लेट लावण्यात अडचण असेल तर तुम्ही डाव्या बाजूलाही नेमप्लेट लावू शकता. फक्त त्या नेमप्लेटवर श्रीगणेशाचे चित्र असावे किंवा स्वस्तिकाचे चित्र असेल तरी ते शुभ असते. 
  • जर नेमप्लेट थोडीशी तुटली असेल किंवा त्याचे पॉलिश निघाले असेल तर ती बदलली पाहिजे.  तुमची इच्छा असल्यास नेमप्लेटच्या वर,तुम्ही एखादा लहानसा बल्ब लावू शकता जेणे करून नेमप्लेटवर उजेड पडेल. 
  • नेमप्लेटच्या मागे कोळ्याचे जाळे, जळमटे, पाली आणि पक्षी यांना जायला जागा नसावी. जरी तेवढी जागा असली तरी नेमप्लेटच्या मागे पाल राहणार नाही याची काळजी घ्या. 
  • हे लक्षात ठेवा की नावाची पाटी मजबूत आणि व्यवस्थित बसलेली असावी. टांगलेली नेम प्लेट तुमची प्रतिमा खराब करू शकते.
  • नावाच्या पाटीचा आकार एवढा मोठा असावा की लोकांना नाव सहज वाचता येईल.
  • नावाची पाटी लावताना लक्षात ठेवा की त्यावर प्रकाश आला पाहिजे, जेणेकरून दूर उभ्या असलेल्या व्यक्तीलाही ती वाचता येईल.

घरावर तुमच्या नावाची पाटी लावताना ही काळजी घ्या म्हणजे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होईल. 

Photo Credit – istockphoto, pinterest

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
14 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT