ADVERTISEMENT
home / आरोग्य
चिंता काळजीवर नियंत्रण मिळवण्याचे नैसर्गिक उपाय

चिंता काळजीवर नियंत्रण मिळवण्याचे नैसर्गिक उपाय

अचानक आनंद आणि अचानक चिंता-काळजी वाटून मन उदास होणं नैराश्याचं लक्षण असू शकतं. मात्र याचं मुळ तुमच्या मनातील  Anxiety (अती चिंता) यात दडलेलं आहे. चिंताग्रस्त माणसं सतत कोणत्यातरी तणावाखाली वावरत असतात. चिंता आणि ताणतणाव ही एक शारीरिक प्रतिक्रिया असली तरी त्याचा संबध तुमच्या मनाशी असतो. या शारीरिक आणि भावनिक प्रक्रियेचा परिणाम तुमच्या मन आणि शरीरावर दिसून येतो.  चिंतेमागे ऑफिसचे काम, घरातील काम, आजारपण, आर्थिक परिस्थिती, नातेसबंध अशी कारणे असू शकतात. यासाठीच प्रत्येकाला अती चिंता टाळण्याचे आणि नैसर्गिक पद्धतीने तणाव नियंत्रणात आणण्याचे कौशल्य माहीत असायला हवे. यासोबतच वाचा मानसिक ताण कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय (Relieve Mental Pressure In Marathi)

असे मिळवा चिंतेवर नियंत्रण

अती प्रमाणात नको द्या गोष्टींची चिंता करणे हा एक मानसिक विकार असू शकतो. ज्याचा परिणाम नकळत तुमच्या आरोग्यावर होतो. सतत चिडचिड होणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, चक्कर, झोप न येणे, थकवा अशी अनेक लक्षणे या विकारात जाणवतात. 

सतत चांगलेच विचार करा

आजकालच्या जीवनशैलीत प्रत्येकाला नकळत नकारात्मक विचार करण्याची सवय लागली आहे. नकारात्मक विचार तुमची चिंता अधिक वाढवू शकतात. वास्तविक प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टींची चिंता काळजी सतावू शकते. मात्र चिंता काळजी अधिक वाढली तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. नकारात्मक विचार अशा परिस्थितीत आगीत तेल ओतण्याचे काम करतात. यासाठीच वेळीच सकारात्मक विचारसरणीची सवय स्वतःला लावा. ज्यामुळे तुम्हाला ताणतणाव नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. वाचा Health Slogans And Quotes In Marathi | आरोग्यावर घोषवाक्य आणि सुविचार

योगासने, प्राणायम आणि मेडिटेशन आहे बेस्ट

तुम्हाला जर सतत एखादी चिंता सतावत असेल तर त्याचा विचार सातत्याने केल्यामुळए परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी आणि मार्ग शोधण्यासाठी योगासने, प्राणायम आणि मेडिटेशनची सवय स्वतःला लावा. कारण यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही संतुलित राहण्यास मदत होईल. ध्यानधारणेमुळे ताणतणाव नियंत्रित ठेवणं नक्कीच सोपं जातं. 

ADVERTISEMENT

छंद जोपासा 

ताणतणाव, चिंता दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे एखादा छंद जोपासणे. कारण प्रत्येकाला आयुष्यात धावपळ, दगदग, कामाचा ताण, नात्यातील गुंतागुंत सहन करावीच लागते. मात्र अशावेळी या गोष्टींचा सतत विचार करून चिंता करत बसण्यापेक्षा एखाद्या आवडत्या छंदात मन गुंतवले तर काही काळ तुम्हाला चिंतेपासून मुक्ती मिळू शकते. यासाठी तुमच्या आवडीनिवडी आणि छंद जरूर जोपासा.

पटकन प्रतिक्रिया देऊ नका

आजकाल आपल्याला पटकन प्रतिक्रिया देण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीचे नीट ऐकून  न घेता अथवा समोरच्या व्यक्तीच्या भावना न समजून घेता प्रतिक्रिया देतो. मात्र त्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला थोडं शांत राहून विचारपूर्वक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला विचार करण्यास वेळ मिळेल आणि गैरसमज होणार नाहीत. चिंता काळजी वाढण्याचं मुख्य कारण गैरसमज असू शकतात. यासाठी वेळीच सावध व्हा आणि स्वतःमध्ये योग्य ते बदल करा. यासोबतच वाचा तुम्ही तणावाखाली तर नाही ना… जाणून घ्या नैराश्य लक्षणे (Depression Symptoms In Marathi)

27 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT