ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अर्चना पूरन सिंह घेतेय नव्या कपिल शर्माचा शोध

अर्चना पूरन सिंह घेतेय नव्या कपिल शर्माचा शोध

हिंदी टेलीव्हिजन माध्यमात ‘दी कपिल शर्मा शो’ ची क्रेझ कायमच दिसून आली आहे. मात्र सर्वांना पोटभरून हसवणारा दी कपिल शर्मा शो लवकरच बंद होणार आहे. कारण सोनी वाहिनीने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांमध्येच दी कपिल शर्माची पूर्ण टीम लाईव्ह शोसाठी परदेशदौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी हा शो सध्या बंद असणार आहे. सहाजिकच वाहिनीने या दरम्यान एक नवा शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जो शो अगदी कपिल शर्मा शोप्रमाणेच असेल मात्र त्यामध्ये इतर कलाकारांऐवजी फक्त अर्चना पूरन सिंह असणार आहे. अर्चना पूरन सिंह या नव्या शोची परिक्षक असणार असून ती या शोमधून नव्या कपिल शर्माचा शोध घेणार आहे. 

कसा असेल नवा कॉमेडी शो

दी कपिल शर्मा शोने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. या शोमधून कपिल शर्मा घराघरात पोहचला. ज्यामुळे आज देशभरातच नव्हे तर परदेशातही कपिल शर्माला खास लोकप्रियता मिळाली आहे. म्हणूनच कपिल शर्मा शोच्या जागी असा एक शो सुरू होणार आहे ज्यातून नव्या कपिल शर्माचा शोध घेतला जाईल. कपिल शर्मा अशाच एका शोमधून जगासमोर आला होता. हा शो नवीन जरूर असेल पण त्याचा फॉर्मेटमात्र जुनाच असेल. कपिल शर्माच्या शोच्या जागी आता इंडियाज लाफ्टर चॅम्पियन हा शो पुन्हा सुरू होणार आहे. या शोमध्ये अर्चनासोबत शेखर सुमन परिक्षकाचे काम पाहणार आहेत. या शोमधून देशभरातील नव्या कॉमेडियन्सचा शोध घेतला जाणार आहे. कपिल देखील याच शोमधून नावारुपाला आला होता. हा शो कपिल ने जिंकला आणि त्याची कॉमेडीची गाडी सुसाट सुरू झाली. म्हणूनच अर्चनाला आणखी एका कपिल शर्माचा शोध या नव्या शोमधून घ्यायचा आहे. 

अर्चना पूरन सिंह नव्या कपिलच्या शोधासाठी उत्सुक

नव्या शोची घोषणा होताच अर्चना खूप खुश झाली आहे. कारण तिने अनेक वर्ष सोनी वाहिनीसाठी कॉमेडी शोमध्ये काम केलेलं आहे. आता एका नव्या कॉमेडियनचा शोध या शोमधून घेतला जाणार आहे. कपिल शर्मादेखील याच शोमधून पुढे आला आहे. आता तिला आणखी एका नव्या कपिल शर्माचा शोध घ्यायचा आहे. सध्या अर्चना कोणत्याही चित्रपटात काम करत नाही त्यामुळे ती या शोसाठी पुरेसा वेळ नक्कीच देऊ शकते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
30 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT