ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
प्री वेडिंग शूटसाठी ड्रेस

प्री वेडिंग शूटसाठी बेस्ट वेस्टर्न ड्रेस डिझाईन्स

 येत्या काही काळाता तुम्ही प्री वेडींग शूट करण्याचा विचार करत असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. कारण  प्री वेडिंग करताना वेगवेगळ्या थीम ठरवून फोटोशूट केले जाते. जर तुम्ही वेस्टर्न आऊटफिट असा पर्याय निवडायचा विचार करत असाल तर या खास शूटसाठी तुम्ही कोणते 5 प्रकार निवडावे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही तुमच्या प्री वेडींग शूटसाठी हे ड्रेस निवडले तर तुम्ही फोटोत सुंदर दिसाल यात काहीही शंका नाही. जाणून घेऊया असेच काही प्री वेडिंग आऊटफिट्स

जमसुट्स

Instagram

जमसु्ट्स म्हणजे पँट आणि टिशर्ट किेंवा टॉप एकत्र असलेला असा भाग. प्रीवेडींग शूटच्यावेळी नाही म्हटलं तरी देखील खूप गडबड असते. अशावेळी वेगळी पँट आणि टीशर्ट असा शोधायला काही वेळ नसेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. कारण हे जमसुट्स दिसायला खूपच सुंदर दिसतात. जमसुट्सची पँट ही मोठी असते. तर प्लेसूटची पँट ही शॉर्ट असते. तुम्हाला कशापद्धतीने शूट करायचं आहे विचारात घेऊन तुम्ही याची निवड करु शकता.

स्लिट गाऊन

वेस्टर्न पर्यायामधील गाऊन हा प्रकार देखील खूप जणांना आवडतात. फोटोमध्येही हे गाऊन खूप छान दिसतात. जर तुम्हाला स्लिट गाऊनन असा पर्याय हवा असेल तर तुम्ही तो शिवून घेऊ शकता किंवा तुम्हाला रेडिमेडही अगदी बजेटमध्ये असे कपडे मिळू शकतात. खूपदा असे कपडे घातल्यानंतर तुम्हाला मस्त पार्टी थीम असलेल्या गोष्टी शूट करता येऊ शखतात. एखादी डीनर डेट थीम किंवा मस्त पार्टी डान्स असं बरचं काही रोमँटीक त्यामध्ये तुम्हाला करता येऊ शकतं.

शॉर्ट ड्रेस

Instagram

जर तुम्हाला थोडे चुलबुल टाईप फोटोशूट करायचे असेतल तर तुम्हाला काही शॉर्ट ट्रेस निवडता येतील. थोडे फ्लोई असे हे शॉर्ट ड्रेस दिसायला फारच सुंदर असतात. तुम्ही असा ड्रेस वापरुनही फोटोशूट करु शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत असे काही करायचे असेल तर तु्म्ही दोघे त्याची थीम ठरवू  शकत. यामध्ये केलेले फोटोशूटही खूपच सुंदर दिसतात. 

ADVERTISEMENT

थीम्ड टीशर्ट

जर तुम्हाला अगदीच बजेटमध्ये शूट करायचे असेल तर तुम्ही मस्तपैकी दोघांसाठी थीम्ड टीशर्ट निवा. हे थीम्ड टीशर्ट अगदी स्वस्तात आणि मस्त मिळतात. तुम्ही एखाद्या स्कर्टवर किंवा पँटवर हे टीशर्ट घालू शकता. तुम्हाला असे टीशर्ट अगदी कुठेही आणि कधीही मिळतील. त्यामुळे तुम्हाला असे कपडे शोधण्यासाठी कोणतीही घाई करावी लागणार नाही.

पार्टी गाऊन

Instagram

एखादे रॉयल कपल प्रमाणे तुम्हाला शूट करायचे असेल तर तुम्ही एखादा पार्टी गाऊन निवडायला हवा. इंडो वेस्टर्न प्रकारातील गाऊन तुम्ही निवडला तर तुम्हाला तो नंतर कधीही घालता येईल असा निवडा. म्हणजे तुम्हाला लग्नानंतरच्या एखाद्या कार्यक्रमात नक्कीच हा गाऊन घालता येतो. 

प्री वेडिंग शीट साठी कपडे निवडताना तुम्हाला असे कपडे निवडायचे आहेत जे वाया जाणार नाहीत ते तुम्हाला अगदी कधीही आणि कुठेही वापरता येतील.

25 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT