ADVERTISEMENT
home / मेकअप
what is the difference between kajal and surma

काजळ आणि सुरमामध्ये काय असतो फरक, जाणून घ्या

मेकअप करताना डोळ्यांचा मेकअप सर्वात महत्त्वाचा ठरतो. कारण आय मेकअपमुळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडते. आकर्षक आणि दिलखेचक डोळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. यासाठी डोळ्यांना काजळ, सुरमा, आय लायनर, आय शॅडोने मेकअप केला जातो. काजळ आणि सुरमा डोळ्यांना नियमित लावला जातो. काजळ आणि सुरमा ही पारंपरिक सौंदर्यप्रसाधने आहेत.  म्हणूनच काजळ आणि सुरमा यामध्ये नेमका फरक काय आणि त्यापैकी कोणतं डोळ्यांसाठी उत्तम हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. यासाठी वाचा ही महत्त्वाची माहिती…

काजळ (Kajal) म्हणजे काय 

लहानपणी बाळ जन्माला आलं की त्याला नजर लागू नये यासाठी काजळ लावलं जातं. काजळ हे सुरम्यापैक्षा थोडं जाड असतं. आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारची काजळ मिळतात. ज्यामध्ये जेल काजळ, लिक्वीड काजळ, पेन्सील काजळ, स्टिक काजळ असे प्रकार असतात.  एवढंच नाही तर काजळामध्ये काळ्या, करड्या, तपकिरी, हिरव्या, निळ्या रंगाच्या विविध शेड्सही आजकाल उपलब्ध असतात.  मात्र पूर्वी पारंपरिक पद्धतीने घरीच काजळ बनवलं जायचं. चार ते पाच बदाम जाळून त्याच्यावर एक स्वच्छ प्लेट ठेवली जात असते. ज्यामुळे त्याची काजळी त्या प्लेटवर धरली दाते. ही काजळी आणि जळलेले बदाम वाटून त्यात कोरफडाचे जेल अथवा नारळाचे तेल मिसळतात. ज्यामुळे पारंपरिक पद्धतीने काजळ घरीच बनवता येते. काजळ डोळ्यात घातल्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. डोळ्यांचे सौंदर्य वाढण्यासाठी काजळ लावण्याची पद्धत आहे.

सुरमा (Surma)म्हणजे काय

सुरमा हे देखील काजळप्रमाणे डोळ्यात घालण्याचे एक प्रॉडक्ट आहे. सुरमा देखील पारंपरिक सौंदर्यप्रसाधन असल्यामुळे पूर्वी ते घरी बनवले जात असते. मात्र सुरमा हे काजळाप्रमाणे चिकट नसून पावडर फॉर्ममध्ये असते. असं म्हणतात की पूर्वी अरबी समुद्रातील कोहिनूर दगडापासून सुरमा बनवला जात असते. सुरमादानीने सुरमा डोळ्यात घातला जातो. अनेकांना वाटतं की सुरमा फक्त काळ्यात रंगाचा असतो. पण असं नाही सुरम्यामध्ये सफेद सुरमा आणि काळा सुरमा असे दोन प्रकार असतात. सुरमा डोळ्याला लावणं सोपं नाही सवयीने तुम्हाला ते जमू लागतं. सुरमा घातल्यावर डोळ्यांची जळजळ होते आणि काही वेळाने थंडावा जाणवतो. 

सुरमा आणि काजळमध्ये काय आहे फरक

सुरमा आणि काजळ एकसारखे दिसत असले तरी यामध्ये खूप फरक असतो.

ADVERTISEMENT
  • काजळ तुम्हाला निरनिराळ्या प्रकारात मिळू शकते, मात्र सुरमा फक्त पावडर स्वरूपात असतो.
  • सुरमा दगडापासून तयार करतात तर काजळ तेल अथवा बदाम जाळून काजळीपासून तयार होते.
  • काजळ केमिकल फ्री असते मात्र सुरम्यामध्ये केमिकल्स असण्याची शक्यता असते.
  • सुरम्यामध्ये दोनच शेड असतात तर काजळ तुम्हाला बाजारात विविध शेडमध्ये मिळते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

10 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT