ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
what-to-do-with-burnt-and-hard-chapati-in-marathi

पोळी भाजताना अधिक करपली तर, सोपा उपाय

पोळी करणं ही एक कला आहे. पोळी करताना गव्हाचे पीठ योग्य भिजवायला हवे. तसंच पोळी लाटणे आणि सर्वात मोठी कला म्हणजे पोळी भाजणे. पोळी (चपाती) गोल व्हायला हवी किंवा चपाती कशी बनवतात याच्याही टिप्स अनेकांना द्याव्या लागतात. पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण पोळी करताना अनेकदा पोळी करपते वा अधिक भाजली जाते. तर कधी कधी नीट न भाजता आल्यामुळे पोळी कडक होते. आम्ही तुम्हाला याआधीही पोळीसंदर्भात अथवा अनेक भाज्यांसंदर्भात किचन हॅक्स सांगितले आहेत. भाजी बिघडली तर सोप्या टिप्स वापरून तुम्हाला ती सुधारता येते, तसंच भात, आमटीदेखील व्यवस्थित करता येते. पण पोळी जळली तर ती फेकावी लागेत असाच समज आहे. पण असं अजिबात नाही. आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे काही हॅक्स आणि रेसिपी सांगत आहोत, ज्यामुळे तुमची करपलेली अथवा कडक झालेली पोळी नक्कीच फुकट जाणार नाही आणि तुम्हाला एक उत्तम पदार्थही चाखायला मिळेल. तुम्हीही या रेसिपी घ्या जाणून. 

कडक पोळीचा हलवा 

अनेकदा आपण शिळ्या पोळीची फोडणीची पोळी करतो. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळा हलवा ऐकला आहे आणि खाल्ला आहे पण करपलेल्या वा कडक पोळीचा हलवा होतो हे नक्कीच तुमच्यासाठी नवे असेल. जाणून घ्या कसा बनवायचा हलवा. 

  • सर्वात पहिल्यांदा तुम्ही करपलेली पोळी चुरडून त्याची मिक्सरमधून पावडर करून घ्या 
  • त्यानंतर ही पावडर पॅनमध्ये तेलावर परता 
  • वरून थोडे पाणी आणि गूळ घाला आणि व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ढवळत राहा 
  • वरून बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स घाला आणि गरमागरम पोळीचा हलवा खाण्यासाठी द्या 

जळलेल्या पोळीचे पोहे 

जाड पोह्यांचे नाश्त्यासाठी कांदेपोहे हे नेहमीच घराघरात केले जातात. पण तुम्ही जळलेल्या पोळीचे पोहेदेखील ट्राय करू शकता. 

  • करपलेली पोळी तुम्ही मॅश करून घ्या आणि त्यावर पाण्याचा हबका मारून थोडी मऊसर करून घ्या
  • आता एका पॅनमध्ये तेल घाला, जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कडिपत्त्याची फोडणी द्या आणि त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टॉमेटो परतून घ्या 
  • त्यात वरून पोळीचा चुरा घालून मिक्स करा आणि मीठ घालून परतून घ्या
  • पोळी तयार झाल्यावर त्यात वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू आणि बारीक शेव टाकून खायला द्या 

करपलेल्या पोळीचे चाट 

होय तुम्ही योग्य वाचलं आहे. जळलेल्या पोळीचे चाटही तुम्ही बनवू शकता. कशा पद्धतीने बनवायचे याबाबत घ्या जाणून 

ADVERTISEMENT
  • सर्वात पहिल्यांदा पोळी मॅश करून घ्या आणि त्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून मिक्स करून घ्या 
  • त्यानंतर त्यात मीठ, तिखट, हळद, धनेजिरे पावडर, आमचूर पावडर, पाणीपुरी मसाला मिक्स करून एकत्र करून त्याची टिक्की करून घ्या 
  • वाटाण्याचा रगडा करून घ्या 
  • एका पॅनवर तूप सोडा आणि ही टिक्की शॅलो फ्राय करा 
  • त्यानंतर त्यावर गोड चटणी, पुदिन्याची वा कोथिंबीरची हिरवी चटणी, चाट मसाला, शेव घाला आणि गरमागरम खायला द्या

जळलेल्या वा काळ्या झालेल्या पोळीचे लाडू 

पोळीचे लाडू अनेक घरांमध्ये बनवले जातात. तुम्ही जळलेल्या पोळीचेही चुरमा लाडू बनवू शकता. याची रेसिपी अतिशय सोपी आहे 

  • पोळी पुन्हा एकदा तूप लाऊन भाजून घ्या आणि कडक करून घ्या 
  • त्यानंतर या पोळीचा चुरा करून घ्या आणि मग त्यात साखरेची पावडर मिक्स करा 
  • यामध्ये बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करा आणि सर्व मिश्रण एका पॅनमध्ये भाजून घ्या 
  • साखर वितळल्यावर हे चिकट झालेले मिश्रण खाली काढा आणि त्याचे लाडू तयार करून थंड झाल्यावर खा

पोळी जर अधिक भाजली वा करपली तर कधीही फेकून देऊ नका. त्याचा तुम्ही अशा पद्धतीने पुनर्वापर करून खायला द्या. हे पदार्थ अधिक चविष्ट लागतील. तसंच संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही एक वेगळा पदार्थ तुम्हाला मिळेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT