ADVERTISEMENT
home / आरोग्य
What You Should Know About Swelling in Your Legs in Marathi

सकाळी उठल्यावर दिसत असेल पायावर सूज तर व्हा सावध!

सकाळी उठल्यावर जर तुमच्या पायाला दररोज सूज येत असेल तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे. कारण सूज येण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य औषधोपचार व्हायला हवेत. याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याल तेव्हा तुमच्या पायावर येणारी सूज जास्त असते की कमी हे नक्कीच सांगा. शिवाय पायावर सूज किती काळ असते आणि त्या सूजमध्ये नियमित काही बदल होतात का याबाबतही तुमच्या डॉक्टरांना जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी जाणून घ्या पायाला सूज येण्याची कारणे आणि कसा केले जातात त्यावर उपाय 

जाणून घ्या अंगदुखीवर घरगुती उपाय (Ang Dukhi Upay In Marathi)

पायाला सूज येण्यामागे काय असू शकते कारण

What You Should Know About Swelling in Your Legs in Marathi

पायाला सूज येण्यामागे तुमची अपूरी झोप, शारीरिक हालचाल, जास्तीचे वजन, अती प्रमाणात मीठाचे सेवन, हॉर्मोनल असंतुलन अथवा एखादी गंभीर आरोग्य समस्या असू शकते. त्यामुळे अशा स्थितीत पहिल्यांदा डॉक्टरकडे गेल्यावर ते तुम्हाला अनेक प्रश्न विचारून याबाबत जाणून घेतात. तुमच्या जीवनशैलीचा विचार करून योग्य ते निदान करतात. मात्र जर तुम्ही यासाठी डॉक्टरकडे जाणं टाळलं तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागू शकतात. यासाठीच याकडे वेळीच लक्ष द्या.

जाणून घ्या संधिवातावर घरगुती उपाय (Arthritis Home Remedies In Marathi)

ADVERTISEMENT

कशी करावी पायाची सूज कमी 

पायावर सूज येण्याचे कारण समजल्यास पायाच्या सूजेवर योग्य उपाययोजना नक्कीच करता येतात. डॉक्टर यासाठी तुम्हाला काही औषधे देतात जी तुम्हाला नियमित घ्यावी लागतात. पायाची सूज कमी करण्यासाठी तुम्ही पायामध्ये कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज घालू शकता. ज्यामुळे तळव्यांची सूज कमी होते. मसाज थेरपी घेऊन तुम्ही पायाची सूज कमी करू शकता. काही लोकांना यासाठी फिजिओ थेरपीची गरजसुद्धा लागू शकते. ज्यामुळे तुमच्या पायातील स्नायू बळकट होतात आणि सूज येणं कमी होतं.

व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय (Varicose Veins Home Remedies In Marathi)

25 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT