ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
पिरेड्सचा रंग

तुमच्या पिरेड्सचा रंग सांगतो तुमच्या आरोग्याविषयी

मासिक पाळीचा अनुभव हा प्रत्येकीचा वेगळा असतो. काहींना अगदी सहज आणि कोणताही त्रास न होता मासिक पाळी येते. तर काहींना मात्र या दिवसात इतका त्रास होतो की, त्यांना या दिवसात काहीही करायची इच्छा होत नाही. पण या व्यतिरिक्त तुम्ही कधी असा विचार केला आहे का? की, तुमच्या मासिक पाळीतील (Periods)च्या काळात होणारा ब्लड फ्लो अर्थात रक्तस्राव आणि त्याचा रंग हा तुमच्या आरोग्याविषयी बरेच काही सांगतो. तुमच्या मासिक पाळीतील स्रावाचा रंग नेमका कसा असतो? चला जाणून घेऊया रंग नेमकं काय सांगतो तुमच्या आरोग्याविषयी. पिरेड्स पँटी संदर्भात तुम्ही कधी ऐकले नसेल तर नक्की ट्राय करा. 

पिरेड्स फ्लो म्हणजे काय?

पिरेड्स फ्लो

वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या पिरेड्सचा अनुभव हा वेगळा आहे. पिरेड्समध्ये खूप जणांना जास्त फ्लो म्हणजेच रक्तस्राव होतो. त्यामुळे त्यांना अगदी काही तासातच सॅनिटरी पॅड बदलावे लागते. तर काही जणांना फारसा फ्लो होत नाही. या फ्लोसोबतच प्रत्येकाच्या रक्ताचा स्राव ही वेगवेगळ्या रंगाचा असतो. आता रक्ताचा रंग हा लाल आहे हे आपण सगळेच जाणतो. पण पिरेड्सचे रक्त येताना त्याचा रंग नेमका कसा असतो. तो रंग जर काळा, केशरी किंवा फिक्कट गुलाबी असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला काही तरी आरोग्याच्या तक्रारी आहेत. चला जाणून घेऊया या रंगाचा नेमका काय आहे अर्थ 

लाल रक्तस्राव

पिरेड्सचा रंग काय सांगतो

लाल रंगाचा  रक्तस्राव  हा सगळ्यात चांगला मानला जातो. याचे कारण असे की, आपल्या रक्ताचा रंगही तोच असतो. मासिक पाळीत आपल्या शरीरातून अशुद्ध रक्त शरीराबाहेर जात असते. पण या रक्ताचा रंग जर लाल असेल तर तुम्ही निरोगी आहात असे दिसते. त्यामुळे असा फ्लो असणाऱ्यांना शक्यतो मासिक पाळीच्या दरम्यान फारसा त्रास होत नाही. 

चॉकलेटी किंवा काळा रक्तस्राव

खूप जणांचा रक्तस्राव हा फारच गडद अशा रंगाचा असतो. याचा अर्थ तुमचा  रक्तस्राव  हा खूपच कमी किंवा उशीराने होणारा आहे. अशा रक्तस्राव होताना अनेकदा त्यासोबत लंप्स म्हणजे रक्ताच्या गुठळ्या देखील येतात. त्यामुळे पोटात एक कळ येते. इतकेच नाही तर रक्त काही काळासाठी राहून गेले तर त्याचा रंग हा काळपट होऊ लागतो. अगदी त्याचप्रमाणे पिरेड्सचे रक्त या रंगाचे झाले असेल तर याचा अर्थ तुमचे रक्त जुने झाले आहे. 

ADVERTISEMENT

भगवा किंवा केशरी रंगाचा रक्तस्राव 

आता रक्त लाल असताना स्राव हा भगवा कसा काय असू शकतो? पण अनेक महिलांचा  रक्तस्राव  हा भगव्या किंवा केशरी रंगाचा असतो. केशरी रंगाचा हा फ्लो तुमच्यामधील काही एलर्जीच दर्शवतो. खूप जणांना व्हजायनल इन्फेक्शन झालेले असते. हे असे इन्फेक्शन बॅक्टेरियाच्या कारणामुळे होत असते. अशांनी या फ्लोकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. अशांनी लगेच डॉक्टर गाठायला हवा.

गुलाबी  रक्तस्राव

गुलाबी रंगाचा रक्तस्राव हा चिंतेचे कारण नाही. कारण अशा रंगाचा स्राव हा एकतर मासिकपाळीची सुरुवात किंवा शेवट दर्शवतो. इतकेच नाही तर अनेकांचा फ्लो हा कूप लाईट असतो. त्यामुळेही  रक्तस्राव  हा गुलाबी असतो. शिवाय अशांना काळजी घेतली नाही तरी भविष्यात ॲनिमिया होण्याची भिती असते. अशा प्रकारचा फ्लो हो असेल तरी काही काळजी घेण्याची गरज नाही. 

आता तुमच्या पिरेड्सचा फ्लोच्या रंगावरुन तुमचे आरोग्य कसे आहे ते जाणून घ्या. तुम्हाला ही माहिती आवडली तर तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.

31 Jul 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT