ADVERTISEMENT
home / आरोग्य
hot compress for pain

हॉट कॉम्प्रेस की कोल्ड कॉम्प्रेस, वेदनांसाठी काय आहे फायदेशीर

आपला हात किंवा पाय मुरगळतो किंवा काही कारणाने आपल्याला कुठल्याही प्रकारचे मस्क्युलर पेन म्हणजे स्नायूंना दुखापत झाल्याने वेदना होत असतील तर आपण त्याला वेदनानाशक मलम किंवा बाम लावतो आणि डॉक्टर आपल्याला गरम पाण्याने किंवा बर्फाने ती जागा शेकण्याचा सल्ला देतात. जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होतात तेव्हा बहुतेक डॉक्टर कॉम्प्रेशन करण्याचा सल्ला देतात. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी उष्ण आणि थंड पाण्याने किंवा बर्फाने शेकणे हा एक चांगला मार्ग आहे. शेकल्याने स्नायूंना आलेली सूज कमी होते आणि वेदना कमी होतात. आपल्याकडेही पारंपरिक प्रथमोपचारांमध्ये गरम पाण्याने शेकण्याचा समावेश होतोच. पाय दुखत असतील तर घरातील आया -आज्या आपल्याला लहानपणापासूनच गरम पाण्यात मीठ घालून त्यात पाय घालून बसवत असत. तसेच कफाने छाती भरली असेल तर तव्यावर कापड कोमट करून त्याने छाती शेकली जात असे. हल्ली तर हॉट व कोल्ड कॉम्प्रेससाठी बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. गरम पाण्याची बॅग, शेकण्यासाठी विजेवर चालणारा बेल्ट, हीटिंग पॅड, आईसपॅक असे पर्याय अगदी सहज उपलब्ध असतात. 

हॉट कॉम्प्रेस चांगले की कोल्ड कॉम्प्रेस 

जेव्हा कॉम्प्रेशनचा विचार केला जातो तेव्हा सामान्यतः दोन पद्धती असतात, पहिली गरम आणि दुसरी थंड. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्नायूंच्या वेदना होतात आणि कोणत्या प्रकारच्या वेदनांमध्ये कोणते कॉम्प्रेशन करावे याबद्दल अनेकदा गोंधळ उडतो. कोणत्या प्रकारच्या दुखण्यामध्ये कोणते कॉम्प्रेस करावे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. 

पाठदुखीसाठी कोणते कॉम्प्रेस करावे 

जर एखाद्या व्यक्तीला पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होत असेल तर अशा व्यक्तींनी गरम पाण्याच्या बॅगने किंवा हीटिंग पॅडने पाठ व कंबर शेकावी.यासाठी बाजारात उपलब्ध असलेली गरम पाण्याची बॅग, गरम करण्यासाठी पॅड मिळते.किंवा तुम्ही सुती कापड तव्यावर गरम करून शेकण्यासाठी वापरू शकता. असे केल्याने तुम्हाला वेदनांपासून नक्कीच आराम मिळेल.

सांधेदुखीसाठी काय करावे 

जर तुमचे सांधे दुखत असतील आणि सांध्यावर सूज असेल तर कोल्ड कॉम्प्रेस अधिक फायदेशीर मानले जाते. अशा परिस्थितीत बर्फाने शेकणे खूप फायदेशीर ठरते. यासोबतच स्नायू जर आखडले असतील तर ती समस्याही दूर होते. तुम्ही बर्फाचे पॅड वापरू शकता किंवा कापडात बर्फाचे तुकडे ठेवून त्यानेही सांध्यांना शेक देऊ शकता.

ADVERTISEMENT

संधिवाताच्या वेदनांमध्ये काय करावे

संधिवात ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. या स्थितीत सांध्यांमध्ये जडपणा येतो आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. अशा स्थितीत कोमट पाण्याचा शेक घेतल्याने मोठा आराम मिळतो. हे स्नायूंना उबदार करते, सूज कमी करते आणि रक्ताभिसरण वाढवते. जेव्हा तुम्हाला वेदना होत असेल तेव्हा कोमट पाण्याने 20 मिनिटे शेक घ्या. याने तुमच्या वेदना कमी होण्यास मदत मिळेल. तुम्हाला जर संधिवात किंवा आमवाताचा त्रास असेल तर कोल्ड कॉम्प्रेसचा त्रास होऊ शकतो. 

मासिक पाळीच्या वेदना

मासिक पाळीच्या दरम्यान क्रॅम्प्स येतात ज्यांचा खूप त्रास होतो.  मासिक पाळीच्या वेदनांसाठी कोमट पाण्याने किंवा हीटिंग पॅडने ओटीपोट आणि कंबर शेकून घ्या. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल. 

डोकेदुखी

कोणत्याही कारणाने डोके दुखत असेल तर कोल्ड कॉम्प्रेस अधिक फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही आइस पॅड आणि आइस क्यूब दोन्ही वापरू शकता, फक्त ते हळू हळू लावा. 

शरीरातील वेदनांपासून मुक्त होण्यासाठी कॉम्प्रेशन हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे, परंतु जर तुम्हाला शेकुनही आराम मिळत नसेल, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून ते तुमच्यावर योग्य उपचार करतील. 

ADVERTISEMENT

Photo Credit- istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

16 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT