उन्हाळ्यात अंगाची काहिली होणे स्वाभाविक आहे. पण अंगासोबत त्वचेची देखील काहिली होत असते. आपल्याला दिसत नसले तरी देखील त्वचेचे हायड्रेशन कमी होत अशते. अशावेळी तुम्हाला हायड्रेट ठेवण्यासाठी काही असे हवे जे तुमच्या त्चचेचे हायड्रेशन राखण्यास मदत करेल. आम्ही तुमच्यासाठी असे प्रॉडक्ट शोधून काढले आहे जे तुमच्या त्वचेसाठी नैसर्गिक आहे आणि या उन्हाळ्यात तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी मदत करेल असे देखील आहे. शिवाय याचा नेमका वापर कसा करावा ते देखील जाणून घेऊया
विटामिन सी त्वचेसाठी चांगले
विटामिन सी (Vitamin C हे त्वचेसाठी खूपच जास्त चांगले असते. विटामिन सीचे त्वचेसाठी योग्य पोषण झाले तर अशी त्वचा अधिक चांगली दिसू लागते. त्यामुळे चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विटामिन सीचा उपयोग करणे हे गरजेचे असते. विटामिन सीमध्ये सगळी आंबट वर्गातील फळे येतात. लिंबू, मोसंबी, आवळा, पपई, स्ट्रॉबेरी, पेरु या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते. ज्याचा उपयोग करुन तुम्हाला चांगली त्वचा मिळू शकते. विटामिन सी तुमच्या त्वचेखाली असलेले कोलॅजन बुस्ट करण्यास मदत करते. त्यामुळे त्याचे शीटमास्क हे त्वचेला हायड्रेट ठेवून त्वचा तजेलदार करते. ज्यामुळे त्वचा सुंदर दिसते.
असा करावा शीट मास्कचा वापर
शीट मास्क हा प्रकार त्वचेसाठी चांगला आहे हे आपण जाणतोच. पण त्याचा नेमका वापर कसा करावा असा विचार करत असाल तर सोप्या टिप्स
- तुमच्या आवडीचा शीट मास्क निवडा. तो लावण्याआधी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तो पुसून मग त्यावर शीट मास्क लावा.
- शीट मास्क हा खूप जणांच्या चेहऱ्यासाठी मोठा असतो अशावेळी ओठाकडी भाग थोडासा कापून तुम्ही तो चेहऱ्याला लावा.
- शीट मास्क साधारण 20 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. शीट मास्क काढून चेहऱ्याला योग्य असा मसाज करा. शीट मास्कमुळे आलेला ग्लो तुम्हाला नक्की दिसेल.
ऑर्गेनिक शीट मास्क जे तुमच्या त्वचेसाठी आहेत चांगले
विटामिन सी यु्क्त फेस शीट मास्क तुमच्या त्वचेला अधिक चांगले करण्याचे काम करतात. त्याचा उपयोग करुन तुम्हाला इच्छित असलेला ग्लो मिळेल.
ORGANIC VITAMIN C SHEET MASK
विटामिन सीने युक्त असलेला असा हा शीट मास्क असून यामध्ये अकाई बेरी आणि डेझी फ्लॉवरचे गुणधर्म आहेत. यामध्ये असलेले विटामिन सी तुमच्या त्वचेला न्युट्रीटिव्ह सीरम पुरवण्याचे काम करते. त्वचेला पोषण देऊन त्वचेवर उष्णतेमुळे आलेली लाली कमी करण्यास शीट मास्क मदत करते. कोणत्याही त्वचेच्या प्रकारासाठी हे प्रॉडक्ट उत्तम आहे.
RADIANCE BOOST SHEET MASK- ORANGE
त्वचेसाठी असा शीट मास्क निवडायला हवा जो तुमच्या त्वचेमधील विटामिन सी बुस्ट करण्याचे काम करेल. त्वचा रेडियंट दिसायला हवी असेल तर संत्र्याचे गुणधर्म तुमच्या त्वचेसाठी पुरेसे असे आहे. संत्र्याच्या गुणांनी युक्त असे हे शीट मास्क सुगंधी तर आहे. पण ते त्वचा उत्तम पद्धतीने हायड्रेट करण्याचे काम करते. 100% ऑर्गेनिक असे प्रॉडक्ट असून त्याचा उपयोग तुम्ही खास कार्यक्रमांसाठी नक्की करायला हवा.
आता तुमच्या त्वचेला द्या विटामिन सी चा डोस आणि मिळवा तजेलदार त्वचा