ADVERTISEMENT
home / मेकअप
why nude lipstick is called nude in Marathi

न्यूड लिपस्टिकला ‘न्यूड’ असं का म्हणतात ते माहीत आहे का, जाणून घ्या

लिपस्टिक हा प्रत्येक स्त्रीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकीला आपल्याजवळ लिपस्टिकचं खास कलेक्शन असावं असं वाटत असलं. अगदी काहीच नाही तर प्रत्येकीकडे एक तरी आवडती लिपस्टिक असतेच. आजकाल न्यूड लिपस्टिक शेडचा ट्रेंड आहे. त्यामुळे इतर शेडसोबत न्यूड लिपस्टिकदेखील आवर्जून खरेदी केली जाते. काही लुक्ससोबत न्यूड लिपस्टिकची शेड उठून दिसते. नॅचरल लुक अथवा नो मेकअप लुकसाठी न्यूड शेडचा वापर केला जातो. यासाठी असा करा न्यूड मेकअप (How To Do Nude Makeup). पण या लिपस्टिक शेडला ‘न्यूड’ असं नाव का पडलं असावं तुमच्या मनात अनेकदा आलं असेल. यासाठीच जाणून घ्या यामागचं कारण… तसंच तुमच्याजवळ असायला हव्या या बेस्ट न्यूड लिपस्टिक | Best Nude Lipstick Shades

न्यूड लिपस्टिकला ‘न्यूड’ का म्हणतात ?

न्यूड लिपस्टिक हा लिपस्टिकचा शेड आहे. स्किन टोननुसार दिसणाऱ्या लिपस्टिकच्या शेडला न्यूड असं म्हणतात. ज्या लिपस्टिकचे रंग तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिळते जुळते असतात त्यांना आपण न्यूड शेडच्या लिपस्टिक असं म्हणतो. बऱ्याचला चेहऱ्यावरील हेव्ही मेकअपला बॅलन्स करण्यासाठी अशा लिपस्टिक शेड वापरल्या जातात. नैसर्गिक लुक मिळत असल्यामुळे तुमचा चेहरा अशा शेडमुळे नॅचरल वाटतो. आजकाल न्यूड शेडमध्येही विविध छटा बाजारात विकत मिळतात. ज्या तुम्ही ऑफिस, कॉलेज अथवा कॅज्युअल लुकसाठी वापरता. कोणताही मेकअप न करता जरी तुम्ही न्यूड शेड वापरली तरी तुमचा स्कीन टोन यामुळे बॅलन्स होतो. त्वचेत मिसळून जात असल्यामुळे या लिपस्टिक शेड्सनां न्यूड शेड असं म्हटलं जातं.

न्यूड शेडच्या लिपस्टिक कशा निवडाव्या

न्यूड लिपस्टिक आवडत असली तरी ती तुमच्या स्कीन टोननुसार निवडणं गरजेचं आहे. बऱ्याचजणी यामध्ये गोंधळ घालतात ज्यामुळे त्यांना परफेक्ट शेडची लिपस्टिक मिळत नाही. यासाठीच न्यूड लिपस्टिक खरेदी करताना ती नेहमी तुमच्या त्वचेशी मिळती जुळती असेल याची खात्री करून घ्या. लिपस्टिक टेस्टर वापरताना बिना मेकअप टो ट्राय करा. ज्यामुळे तुमचा अंदाज चुकणार नाही. समजा तुमची त्वचा उजळ असेल तर तुम्ही न्यूडचे ब्राइट शेड निवडा आणि जर तुमची त्वचा गडद असेल तर तुम्हाला लाइट शेडच्या न्यूड लिपस्टिक छान दिसतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
13 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT