ADVERTISEMENT
home / Weight Loss
कमी वेळात वजन करण्यासाठी पुढील 10 गोष्टी रोज करा

कमी वेळात वजन करण्यासाठी पुढील 10 गोष्टी रोज करा

खरंतर थोडंफार हेल्दी दिसण्यात काहीच गैर नाही. पण वजन जरा जास्त वाढू लागलं तर आपल्यालाच काळजी वाटायला लागते की, बस्स आता काहीतरी करायला हवं. बरेच वेळा नोकरी करणाऱ्या आपल्या मैत्रिणींना लक्षात येत नाही की, त्या कधी आणि कशा ओव्हरवेट झाल्या? या समस्येवर उपयोगी अशा टीप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही ह्या टीप्स रोज फॉलो केल्या तर काही दिवसात तुमचे वाढते वजन नक्कीच आटोक्यात येईल.

चला पाहूया ह्या टीप्स  

1. जेवणाआधी घ्या सूप (Drink soup before dinner)

नुकत्याच एका रिसर्चमध्ये हे आढळलं आहे की, जेवण्याआधी 1 तास सूप घेतल्यास भूक कमी लागते. ह्यामुळे तुम्ही जास्त जेवण टाळू शकता आणि पोट ही भरलेलं वाटतं.

2. पौष्टीक नाश्ता करा (Healthy Breakfast)
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्यापैकी बऱ्याच जणी नाश्ता करणं टाळतो. पण खरंतर नाश्ता केल्याने आपल्या शरीराला दिवसभर उर्जा आणि शक्ती मिळते. जर तुम्ही रोज योग्य वेळी नाश्ता केला तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही आणि वजन ही आटोक्यात राहील.

ADVERTISEMENT

3. थोड्या-थोड्या वेळाने खात रहा (Have meals in breaks)
जर तुम्ही फिट होण्याचा निश्चय केला असेल तर योग्य आखणी करावी लागेल. तुमच्यासोबत पौष्टीक स्नॅक्स असणं गरजेचं आहे आणि थोड्या थोड्या वेळाने म्हणजे 2 ते 3 तासांच्या अंतराने खात रहा. ह्यामुळे शरीराचं मेटाबॉलिजम वाढतं आणि फॅट्स ही लवकर बर्न होतात.  

4. जेवणात करा मिरचीचा वापर (Use of Chillies)

Copy of pexels-photo-48840
जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर आमच्याकडे एक खूषखबर आहे. तिखट खाल्ल्यामुळे मेटाबॉलिजम 8% टक्क्याने वाढतं. झोपण्याआधी रात्रीच्या जेवणात हिरवी मिरची नक्की खा, कारण मिरचीमुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते. तसंच बरेचदा तिखट पदार्थ जेवताना लोक चावून चावून आणि हळूहळू खातात. ही एक चांगली आणि आरोग्यदायी सवय आहे.

Also Read What Causes Belly Fat & Home Remedies To Get Rid Of It In Marathi

ADVERTISEMENT

5. रात्री प्या ग्रीन टी (Green tea inktake)
रात्री झोपण्याआधी एक कर ग्रीन टी जरूर प्या. ह्यामुळे शरीराचं मेटाबॉलिजम वाढतं आणि रात्रभर फॅट्स बर्न होण्याची प्रक्रिया ही सुरू राहते. ग्रीन टी ने फक्त जाडेपणाच नाहीतर कॅन्सरसारखे रोग ही दूर राहतात. पण ग्रीन टीमध्ये कॅफीनची मात्रा कॉफीपेक्षा जास्त असते. त्यामुळे ग्रीन टी चे सेवन जास्त केल्यास अपायकारक आहे. योग्य मात्रेत ग्रीन टी घेतल्यास ती नक्कीच फायदेशीर आहे.

6. हसणं आवश्यक आहे (Laughing is excercise)
हसणं ही एक तऱ्हेची एरोबिक एक्सरसाइज आहे. तुम्हाला माहीत आहे का? 30 मिनिटांचं वेट लिफ्टींग केल्यावर जेवढं वजन कमी होतं तेवढंच वजन एक तास हसल्यामुळे कमी होतं.  हो, खरंच. जर तुम्ही रोज एक तास मोकळेपणाने हसलात तर तुमच्या जवळजवळ 400 कॅलरीज बर्न होतील आणि जाडेपणा कमी होऊ लागतो. म्हणूनच रोज कमीतकमी १५ मिनिटं वेळ काढून लाफिंग एक्सरसाइज नक्की करा.

7. साखरेला करा रामराम (Say no to sugar)

97-3
जाडेपणासाठी जवाबदार असणाऱ्या घटकांमध्ये साखर ही आहे. जर तुम्ही वजन करण्याचा प्रयत्न करत असाल तर साखरेपासून चार हात लांब राहणं चांगल आहे. जास्त गोड चहा पिऊ नका. ज्या गोष्टींमध्ये जास्त साखर आढळते. त्या गोष्टी टाळा. दिवसभरात कमीतकमी एक मौसमी फळ खा. केक, पेस्ट्री, डेजर्टस्, तेलकट पदार्थ टाळा, कारण ह्या सर्व गोष्टी तुमचे वजन कमी करण्यात अडथळा निर्माण करतात.

ADVERTISEMENT

8. निळ्या रंगाच्या ताटात जेवा (Have food in coloured plates)
जर तुम्ही निळ्या रंगाच्या ताटात जेवलात तर तुमचे वजन वेगाने कमी होईल. एका रिसर्चनुसार, भडक रंगाच्या ताटात जेवल्यास भूक कमी लागते. ज्यामुळे आपण कमी जेवतो. नीळा आणि इतर असेच भडक रंग तुमच्या मेंदूमध्ये एक असे चित्र तयार करतात. ज्यामुळे आपली जेवणावरील इच्छा लवकर उडते आणि पोट ही भरल्यासारखं वाटतं.

9. अंधार करून झोपा (Sleep in the dark)

Copy of 20141223161238-good-night-sleep-ditch-e-reader
प्रकाशाच्या तुलनेत अंधारात झोपल्याने वजन कमी होते. हे थोडं विचित्र वाटेल, पण खरं आहे. ओहियो स्टेट विद्यापीठातील संशोधकांना आढळून आलं की, अंधाऱ्या जागी झोपल्याने शरीरात हलकेपणा येतो आणि तुमचं वजन कमी होतं. खरंतर, आपण जेव्हा झोपतो तेव्हा मेलाटोनिन हार्मोन आपल्या शरीरात ब्राउन फॅट निर्माण करतं. ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. अंधारात आपल्या शरीरात जास्त मेलाटोनिन उत्पन्न होतं. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या खोलीत पूर्ण अंधार करून झोपा.

10. पूर्ण झोप घ्या (Sleep well)
हो, चांगला उपाय आहे ना…. वजन कमी करायचं असेल तर भरपूर झोप घ्या. कारण झोपण्यामुळे तुमच्या शरीरातील दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर होतो. विशेष म्हणजे वजन कमी करण्याच्या पूर्ण प्रक्रियेत चांगली झोप अावश्यक आहे. झोप ही तुमच्या हंगर हार्मोनला स्थिर करते, ज्यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

ADVERTISEMENT

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

तुम्हाला आरोग्याशी निगडीत ही 10 सत्य माहीत आहेत का?

शहाळ्याच्या पाण्याचे हे फायदे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल 

प्रत्येकाला माहिती हवे आपल्याशी निगडीत ही 15 सत्य

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी योग

Effective Tips & Diet Plan To Reduce Weight In Marathi

13 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT