कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. पण तुम्हाला हे माहीत आहे का?, की कोरफडाचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धन उत्पादनांमध्ये देखील केला जातो. तसंच तुम्ही ह्या वनस्पतीचा वापर प्रत्येक ऋतूंमध्ये करू शकता. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. कोरफडाच्या ह्या विविध गुणांमुळे ह्याचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पानं ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. कोरफड जेलमध्ये जळजळरोधक असून थंडावा देते. या गुणांमुळे छोटं-मोठं खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडाचा वापर केला जातो.
Table Of Content
त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी लाभदायक
कोरफड संबंधित प्रश्न - उत्तर FAQ’s
कोरफड वनस्पती ई जीवनसत्वाने समृध्द आहे. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती जणू वरदानच आहे. आपल्या ओठांवर कोरफड जेल लावा आणि विसरून जा. बस इतकंच करायचंय. जर तुम्हाला हवं असेल तर कोरफड जेलमध्ये थोडंस ऑलिव्ह तेल मिसळून लिप बामसारखं ही वापरू शकता.
जर सकाळी उठल्यावर तुमचे डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असल्यास कोरफडीचा वापर केल्यास सगळं ठीक होईल. डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला कोरफड जेल लावायला सुरुवात करा. कित्येक अंडर आय क्रीम्समध्ये कोरफडीचा वापर केला जातो.
जर तुम्हाला वॅक्सिंग, थ्रेडींग आणि प्लकींग केल्यानंतर लालसर चट्टे किंवा पिंपल्स येत असतील तर हे बरं करण्यासाठी तुम्ही बहुगुणी कोरफड नक्की वापरून पहा. त्याचा नक्कीच उपयोग होईल.
कोरफड तुमच्या त्वचेतील लवचिकपणा सुधारतो. ज्यामुळे फाइन-लाइन्स, सुरकुत्या किंवा डाग-चट्टे अशा समस्या उद्भवत नाहीत. ह्यासाठी तुम्ही कोरफड जेलमध्ये थोडंसं ऑलिव्ह तेल आणि थोडी ओटमील पावडर मिसळून पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि 30 मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धूवून टाका.
कोरफडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा सजल (Hydrate) राहते तेही कोणत्याही चिकटपणाशिवाय. आहे ना चमत्कारिक? हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते. यावर रामबाण उपाय म्हणजे कोरफड होय. कोरफड जेलचा वापर नॉइश्चरायजरसारखा करून त्वचेला मसाज करा आणि झालं तुमचं काम. हे जेल तुम्ही नखांना ही लावू शकता. हे जेल नखांनासुध्दा मॉइश्चरायज करून मजबूत आणि चमकदार बनवेल.
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड खूपच उपयुक्त आहे. कोरफडीमध्ये बुरशीविरोधी, जळजळविरोधी आणि जंतूनाशक घटक आहेत. जे त्वचेवरील डाग-व्रण आणि पिंपल्सची समस्या दूर करतं. ह्यातील पॉलीकेराइड्स ह्या घटकामुळे नव्या पेशींच्या वाढीला मदत करतं. ज्यामुळे पिंपल्स लवकर बरे होतात आणि तेही कुठल्याही डागांशिवाय. आश्चर्य आहे ना? कोरफडाचा हा अजून एक अचूक उपयोग आहे. रोज रात्री पिंपल्स वर कोरफड जेल लावा किंवा जेलमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळून लावा.
सूर्य किरणांमुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होते. कोरफडाच्या रसात त्वचेचे सूर्य किरणांपासून रक्षण करण्याची क्षमता आहे आणि यातील अॅंटी ऑक्सीडंट गुण त्वचेचा ओलावा ही काायम राहतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही ऊन असताना बाहेर पडणार असाल तेव्हा कोरफडाचा रस आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित लावा.
कोरफड जेलमध्ये कापूस थोड्यावेळासाठी बूडवून ठेवा. ज्यामुळे जेल चांगल्यारितीने कापसात शोषले जाईल. मग तो कापूस काही मिनिटांसाठी चामखीळावर टेपच्या मदतीने चिकटवा. हीच कृती काही महिने नियमितपणे केल्यास तुमचं चामखीळ आपोआपच गळून पडेल.
कोरफड जेल नियमितपणे स्ट्रेच मार्क्सवर लावल्यास बऱ्याच प्रमाणात कमी होतात. तसंच चेहऱ्यावरील पोर्सवर हे जेल अगदी अॅस्ट्रीजेंटसारखे काम करते. ज्यामुळे तुमचे पोर्स कमी होण्यास मदत होते.
कोरफड जेलमध्ये थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा स्क्रब तयार करा आणि वापरा. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्कीन तर काढतोच आणि त्वचेला हायड्रेट ही करतो. यामुळे तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते.
याशिवाय कोरफडाच्या रसात थोडेसे नारळाच्या तेलाचे थेंब घालून ते गुडघे, टाचा आणि हाताच्या कोपराला लावल्यास काळेपणा दूर होतो.
कोरफडाला घृतकुमारी असे ही म्हंटले जाते. कोरफडात असलेल्या गुणांमुळे केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते. ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच घटकाचे संतुलन कायम राखण्यास मदत करते. कोरफडाने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते, केसांतील कोंडा जातो, स्कॅल्पच्या समस्या दूर होतात आणि केसांचे चांगले पोषण ही होते. आता एवढे सगळे गुण आहेत म्हंटल्यावर केस तर छान होतीलच ना. कोरफड जेल डोक्याला आणि केसांना लावून चांगला मसाज करा आणि काहीवेळा नंतर केस धूवून टाका. तुम्हाला हवं असल्यास कोरफड जेल ‘लीव-इन कंडीशनर किंवा स्टाइलिंग क्रीम’ म्हणूनसुध्दा वापरू शकता. कोरफडाच्या दोन पानांचा गर काढा. त्यामध्ये लिंबाचा रस घालून हे मिश्रण चांगलं फेटून घ्या. आता हलक्या हातांनी ओल्या केसांवर लावा. मग गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने 15 ते 20 मिनिटं केस बांधा. आता थोडे गरम पाणी आणि शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा असं केल्यास केस दाट, मऊ आणि सुंदर होतात.
जगभरात कोरफडीच्या तब्बल 400 हून अधिक प्रजाती आढळतात. पण त्यापैकी फक्त 5 प्रजाती आहेत. ज्या आपल्यासाठी गुणकारी आहेत. कोरफडाचा उपयोग पौष्टीक आहार म्हणून ही केला जातो. जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरपूर कोरफड आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. ही वनस्पती खूप प्रकारे आरोग्याला लाभ देणारी आहे -
1. कोरफड हे मधुमेह म्हणजेच डायबेटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे.
2. पोटासंबंधीच्या समस्यांवर ही कोरफड रामबाण उपाय आहे.
3. गुडघ्यांच्या दुखण्यावर कोरफड वापरल्यास काही प्रमाणात आराम पडतो.
4. कोरफड शरीरातील रक्ताचं प्रमाण सुधारतं आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता ही वाढवतं.
5. नियमितपणे कोरफड रस पिण्यामुळे शरीरातील शक्ती कायम राहते.
6. कोरफड रसाचे नियमित सेवन केल्यास वजनसुध्दा कमी होतं.
7. कोरफडाचा रस हा काविळीमध्येही उपयोगी आहे.
8. जर तुम्ही सकाळी उठल्यावर कोरफडाचा रस प्यायला तर तुमचे पोट साफ राहते आणि भूक ही लागते.
9. सकाळी रिकाम्या पोटी कोरफड रस घेतल्यास डोकेदुखीच्या समस्येपासून ही आराम मिळतो.
10. लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाल्यास 5 ग्रॅम ताजा कोरफड रस मधात मिसळून द्या. ह्यामुळे मुलांचा सर्दी खोकला बरा होतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नेहमीच उन्हातून एसीमध्ये आणि एसीमधून उन्हात गेल्यास त्वचेशीनिगडीत अनेक अॅलर्जी होतात. अॅलर्जीमुळे येणारे चट्टे, खाज आणि जळजळ दूर करण्यासाठी कोरफड खूपच जालीम उपाय आहे. कोरफड जेल खाज येणाऱ्या जागेवर थोडावेळ लावून ठेवा आणि नंतर धूवून टाका. ह्या उपायाने खाज आणि अॅलर्जी दोन्हीपासून त्वरित आराम मिळतो. ह्याशिवाय कोरफड जेलमध्ये ज्वलनशामक (अॅंटी इन्फ्लमेटरी) गुण असल्याने कोणत्याही छोट्या मोठ्या जखमेवर, कापलेल्या किंवा भाजलेल्या ठिकाणी किेवा किडयाने चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडाचा वापर केला जातो.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण औषधी गुण असूनही कोरफडामुळे शरीराला काही प्रकारे नुकसानसुध्दा होऊ शकते. कोरफडामधील रेचकामुळे (Laxative) तुम्हाला काही प्रकारे त्रास ही होऊ शकतो.
1. कोरफडाचा रस घेण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा डॉक्टरांनी दिलेली औषथेही घेत असता. त्यामुळे कोरफडाचा रस औषधांबरोबर घेतल्यास त्याचा प्रतिकूल परिणामसुध्दा होऊ शकतो.
2. कोरफडाचे रोज सेवन केल्यास तुमचा रक्तदाब (Blood pressure) कमी होऊ शकते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी कोरफडाचे सेवन चांगले आहे. पण कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी हे त्रासदायक ठरू शकतं.
3. ज्या लोकांना हृदयासंबंधित त्रास आहे. त्यांनी ही कोरफडाचा रस घेणं टाळावं. रसाच्या रोजच्या सेवनाने हृदयाचे ठोके अनियमित होऊन शरीरात अशक्तपणा जाणवतो.
4. कोरफडाच्या अतिसेवनाने डिहायड्रेशचा त्रास ही होऊ शकतो.
5. कोरफडाच्या रसातील रेचकामुळे आपल्या मांसपेशी कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे ह्याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
6. गर्भवती महिलांनी ह्याचे सेवन करू नये कारण ह्याच्या सेवनाने गर्भाशय संकुचित होऊ शकते. ज्यामुळे गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या जन्मावेळी त्रास होऊ शकतो.
खूप पूर्वीपासून कापणं, सोलणं, जळणं किंवा किड्याने चावल्यास कोरफडाच्या वनस्पतीचा वापर हा औषध म्हणून केला जातो. हे त्वचेच्या अॅलर्जीसुध्दा बरं करतं. कोरफड जेल हे पतंजलिचं एक असं उत्पादन आहे जे तुमच्या घरी अवश्य असलं पाहिजे.
हिमालया हर्बलचा मॉयश्चराइजिंग कोरफड फेसवाॅश तुमची त्वचा साफ करतो आणि त्यासोबतच त्वचेवरील पोर्ससुध्दा बंद करण्यात सहायक ठरतो. हे तुमच्या त्वचेला हायड्रेट करतं आणि त्वचेला मॉयश्चराइज करतं. याशिवाय हा फेसवॉश सोप फ्री असल्याने तुमची त्वचा कोरडीसुध्दा होत नाही.
हे मसाज क्रीम तुमच्या त्वचेला तजेलदार बनवतं. ह्या क्रीममध्ये मेन्थॉल आहे, त्यामुळे हे कमी प्रमाणात लावावे. हे तुमच्या त्वचेत खोलवर जाऊन मॉइश्चराइज करते. ह्यातील अॅंटीसेप्टीक गुणांमुळे कापल्यावर किंवा जखमेवरही प्रभावी आहे.
जर तुमची त्वचा मऊ आणि नाजूक असेल तर आम्ही सूचवू इच्छितो की, कोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेऊ नका. याउलट ज्यांची त्वचा साधारण किंवा खरखरीत आहे, त्यांनी कोरफड जेल रात्रभर लावून ठेवावे. पण तरीही ही ह्याचा वापर रोज रात्री करू नये.
उत्तर - कोरफड जेल हे तेलरहित असल्याने तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यात मदत करते. तुमच्या त्वचेचा रंग कायम राखण्यास हे उपयोगी आहे, पण रंग उजळवण्यासाठी नाही. कोरफड तुमची त्वचा चमकदार बनवतं पण हे त्वचा पांढरट नक्कीच करू शकत नाही.
ज्या लोकांच्या हातांवर, चेहरा आणि शरीरावरील इतर ठिकाणी काळे डाग असतील, ते कोरफडाचा
वापर करू शकतात. कोरफडाने त्या जागांवरील डाग वाढणार नाहीत आणि त्वचा तजेलदार आणि चमकदार बनेल
तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:
विविध आजारात गुणकारी गुळवेल आणि गुळवेलाच्या सेवनाचे दुष्परिणाम