चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं ही समस्या कोणत्याही महिलेसाठी एखादया वाईट स्वप्नाप्रमाणे असू शकते.वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू डोकं वर काढू लागते.सहाजिकच यावर उपाय करण्यासाठी महीला बाजारातील एन्टी एजींग क्रीमचा वापर करू लागतात.मात्र या क्रीम वापरणे बऱ्याचदा फारच खर्चिक ठरू शकते.त्यामुळे अनेकजणींना कमीतकमी खर्चात चेहऱ्यावरील सुरकुत्या कशा कमी कराव्या ही चिंता सतावू लागते.जर तुम्हाला देखील या सौदर्य समस्येला तोंड द्यावं लागत असेल तर मुळीच काळजी करू नका.कारण आम्ही तुम्हाला या समस्येवर असे काही घरगुती उपचार सांगणार आहोत.ज्यामुळे तुम्ही तुमच्या वयाच्या किमान 10 वर्ष तरी लहान दिसू शकाल.
एका भांड्यामध्ये दोन चमचे कोरफडाचा रस आणि एका अंड्याचा पांढरा भाग घ्या.या मिश्रणाची एक छान पेस्ट तयार करा व ती चेहऱ्यावर लावून काही वेळ मसाज करा.अर्धा तास हा फेसपॅक चेहऱ्यावर तसाच ठेवा व नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ई चे नैसर्गिक गुणधर्म असतात.ज्यामुळे त्वचा ओढली जाऊन सुरकुत्या कमी होतात.त्याचप्रमाणे कोरफड व अंड्याच्या मिश्रणामुळे तुमची निर्जीव त्वचा तजेलदार दिसू लागते.
पपईचा गर आणि केळं मिक्सरमध्ये वाटून घ्या.वाटलेले मिश्रण तुमच्या सुरकुतलेल्या त्वचेवर लावा.पंधरा मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.पपईमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्याचे गुणधर्म असतात.त्यामुळे तुमची त्वचा खेचली जाऊन तुम्ही पुन्हा तरुण दिसू लागता.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घेण्याची मुळीच गरज नाही.यासाठी फक्त पाच ते सहा बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवा.सकाळी या बदामांची साले काढून दुधासह बदाम मिक्सरमध्ये वाटून घ्या.चेहऱ्यावर हे मिश्रण लावून वीस मिनीट चेहरा तसाच ठेऊन नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून काढा.बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि तुमची त्वचा पुन्हा सतेज व उजळ दिसू लागते.दुधामुळे तुमची त्वचा मॉश्चराइज झाल्याने ती मुलायम होते.
एका अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये अर्धा चमचा मिल्क क्रीम व एक चमचा लिंबूरस मिसळा.हे मिश्रण चेहऱ्यावर लावून पंधरा मिनीटांनी चेहरा पाण्याने धुवून काढा.हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून किमान तीनदा वापरू शकता.अंड्यामध्ये एन्टी एजिंग गुणधर्म असतात.त्यामुळे तुमच्या त्वचा खेचली जाऊन तुमचे वाढते वय कमी दिसू लागते.
दोन चमचे गुलाबपाण्यामध्ये अर्धा चमचा लिंबूरस मिसळा.या मिश्रणामध्ये काही थेंब ग्लिसरीनचे टाका.सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा.कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या.दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे मिश्रण चेह-यावर लावू शकता.गुलाबपाण्यामुळे तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे देखील कमी होण्यास मदत होते.