गुळवेल (Gulvel) म्हणजे जणू अमृतच (Benefits of Giloy In Marathi)

गुळवेल (Gulvel) म्हणजे जणू अमृतच (Benefits of Giloy In Marathi)

‘आपले आरोग्य आपल्या हाती’. सध्याच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येक मिनिटाचा हिशोब आपल्याला द्यावा लागतोय. प्रत्येक जण चांगल्या लाइफस्टाइलसाठी धडपड करतोय. पण चांगली लाइफस्टाइल जगण्यासाठी चांगले आरोग्य ही तेवढेच आवश्यक आहे आणि आपले आरोग्य चांगले ठेवणं हे आपल्याच हाती आहे. कितीही सल्ले किंवा कोणीही सांगितलेली डाएट फॉलो करणं असो. तुम्ही करत असलेली प्रत्येक चांगली-वाईट गोष्ट तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असते. हे वेगळं सांगायची गरज नाहीच. मग ते वेळेवर जेवणं असो भरपूर पाणी पिणं असो वा वेळेवर झोपणं असो. अनेकदा आरोग्याशी निगडीत अनेक साध्या सोप्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. जसं घरातल्या घरात उपलब्ध असलेली एखादी आरोग्यदायी उपयोगी वनस्पती किंवा पदार्थ म्हणा. आपणं अगदी आटापिटा करत सूर्यफूलाच्या बिया सुपरमार्केटमधून आणा किंवा ब्रोकोलीचं खा. अशी अनेक बाहेरच्या देशातून आलेली फॅडस् फॉलो करत असतो. मात्र दुसरीकडे आपल्याच परसबागेत अगदी सहज लागवड करता येतील किंवा बाजारात सहज उपलब्ध होतील अशा भाज्यांकडे किंवा वनस्पतींकडे दुर्लक्ष करतो. पण आता काळजी करू नका, कारण आम्ही आहोत ना. आपल्या POPxo च्या सर्व मैत्रिंणीना आयुर्वेदात अमृतकुंभ म्हणून आोळखल्या जाणाऱ्या गुळवेल या वनस्पतीची ओळख तुम्हाला करून देणार आहोत. या बहुउपयोगी आणि बहुगुणी गुळवेल वनस्पतीची माहिती घेण्याआधी थोडं आयुर्वेदाबद्दलसुध्दा जाणून घेऊया.


आयुर्वेदातील गुळवेलाचं महत्व


गुळवेलाबाबत डॉक्टरांचं म्हणणं


गुळवेलाची घनवटी


गुळवेल काढा कसा करावा


विविध आजारात गुणकारी गुळवेल


गुळवेल चे फायदे   


गुळवेलाच्या सेवनाचे दुष्परिणाम


आयुर्वेद आणि आरोग्य (Ayurveda & Health)


giloy-inside-1


आयुर्वेदाची महती आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आयुर्वेद ही ५००० वर्षापूर्वीपासून म्हणजे पार वेदीक काळापासून चालत आलेली उपचार पद्धती आहे. खरंतर ही केवळ उपचार पध्दती नसून एक जीवनशैली आहे. कारण आयुर्वेदात फक्त रोगांपुरता विचार मर्यादित न ठेवता तन, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन साधून उपचार केला जातो. ज्याचा दीर्घकाळासाठी आपले आरोग्य चांगलं राहण्यास फायदा होतो. आयुर्वेदाची पाळंमुळं जरी भारतातील असली तरी जगभरात ह्या उपचार पध्दतीचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या तिन्ही मूलत्तवांचे संतुलन साधल्यास तुम्हाला कोणताही रोग होत नाही. पण जेव्हा ह्यांचं संतुलन बिघडतं, तेव्हा आपल्याला एखादा आजार होतो. म्हणूनच आयुर्वेदात ह्या तिन्ही तत्त्वांचं संतुलन राखलं जातं. त्याबरोबरच आयुर्वेदात रोगप्रतिकारक क्षमता विकसित करण्यावर आणि रोगाचे मूळ शोधून त्यावरील उपचारावर भर दिला जातो. ज्यामुळे तुम्हााला आजार पुन्हा होत नाही. आयुर्वेदात अनेक आजारांवर उपचारासाठी विविध पध्दतींचा वापर केला जातो. जसं वनौषधींचा वापर, घरगुती उपचार, आयुर्वेदीक औषधं, आहार, मालीश आणि ध्यानसाधना अशा विविध पध्दतींचा उपयोग केला जातो.आयुर्वेद हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनला आहे. आयुर्वेदाचा अर्थ दीर्घायुषी आरोग्य आणि वेद म्हणजे ज्ञान असा आहे. दीर्घकाळ आयुष्यासाठी आयुर्वेद खूपच प्रभावी आहे. ५००० वर्षांनंतरही आजही आयुर्वेदातील सर्व उपाय सहज लागू होतात आणि अॅलोपथीप्रमाणे ह्याचे साइडइफ्केटस नाहीत. भारतीय ऋषीमुनींनी कित्येक वंश आयुर्वेदाचे ज्ञान आधी मौखिक रूपात पुढे नेले आणि त्यानंतर ते एकत्रित करून त्याचे लेखन करण्यात आले. आयुर्वेदातील सर्वात जुने ग्रंथ म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग ह्रदय हे आहेत. हे सर्व ग्रंथ पंचत्तत्वावर आधारित आहेत. ज्यामध्ये पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांचा समावेश होतो. या पंचत्तत्वांचा आपल्यावर मुख्यतः परिणाम होत असतो. हे ग्रंथ आपल्याला निरोगी आणि आनंदी जीवनासाठी ही पाच तत्व कशी संतुलित ठेवावी ह्याचे महत्त्व सांगतात. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तत्वाने प्रभावित होत असतो. याचे कारण असते त्याच्या प्रकृतीची संरचना. प्रत्येकाच्या शारीरिक संरचनेप्रमाणे तीन वेगळे दोष आढळून येतात.


वात दोष: ज्यामध्ये वायू आणि आकाश तत्व प्रबळ असतात.


पित्त दोष: ज्यामध्ये अग्नी दोष प्रबळ असतो.


कफ दोष: ज्यामध्ये पृथ्वी आणि जलतत्वाचे प्राबल्य असते.


हे दोष फक्त प्रत्येकाच्या शरीर स्वरुपावरच नाही तर त्यांच्या शारीरिक प्रवृत्ती म्हणजे जेवणाची निवडी आणि पचन तसेच स्वभाव आणि भावनांवरही ह्याचा प्रभाव पडतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्तीचे उपचार पथ्य विशेषतः याच गोष्टींना महत्त्व देते. तसंच हवामानातील बदलांच्या आधाराने जीवनशैली कशी अनुकूल करता येईल, ह्याचं मार्गदर्शनसुध्दा आयुर्वेद करत असतं. त्यामुळे आयुर्वेदाची उपचारपध्दती आजच्या मिलेनीअल युगात ही लागू पडते आहे.


वाचा -  वजन कमी करण्यापासून ते केसगळती थांबवण्यापर्यंत फायदेशीर आहे जास्वंदीचं फुल


आता पाहूया गुणकारी गुळवेलबाबत इत्यंभूत माहिती - गुळवेल म्हणजे काय (Giloy Meaning In Marathi)


गुळवेल म्हणजेच गुडुची किंवा शास्त्रीय नावानुसार टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia) ही वनस्पती भारत, श्रीलंका  आणि म्यानमार या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. ह्या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर औषध म्हणून केला जातो. ज्याला गुळवेलसत्त्व असे म्हंटले जाते.या गुळवेलीचा उल्लेख हा विविध ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. विविध भाषांमधील या गुळवेलीची नावं पुढीलप्रमाणे -लॅटीन नाव- टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia), संस्कृत नाव- मधुपर्णी, वत्सादनी, अमृता, गुडूची, बल्ली, छिन्ना, छिन्नरूहा, सोमा, सोमवल्ली, चक्रलक्षनिका, धीरा, विशल्या, चन्द्रहासा, व्यस्था, मंडली, देवनिर्मिता, कुण्डलिनी, ज्वरनाशिरनी, अमृतवल्लरी, आणि जीवन्ति, मराठी नाव- गुळवेल, अमृता, अमृतवल्ली, गुडूची, गरोळ आणि वारूडवेल, गुजराती नाव-गुलो, हिंदी नाव- गिलोय,गुडीच, इंग्रजी नाव- टिनोस्पोरा (Tinospora) किंवा हार्ट लिव्हड मूनसीड वगैरे.


महाराष्ट्रांमध्ये सगळीकडे गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते. गुळवेलाची वेल आकाराने मोठी आणि मांसल असते मोठ्या झाडांवर किंवा कुंपणांवर पसरलेली दिसून येते. ह्या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालंही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची सालं निघतात. या खोडांंवर लहान-लहान छिंद्रसुध्दा आढळतात. ह्या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो. वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, ह्या येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात. फळंसुध्दा गोलाकार, मोठ्या वाट्याण्यासारखी पण कठीण कवचाची असतात. साधारणतः ह्या वनस्पतीला नोव्हेंबर ते जून या दरम्यान फुले आणि फळे येतात. 


वाचा - तसेच तुळशीच्या पानांच्या फायद्यांबद्दल


आयुर्वेदातील गुळवेलाचं महत्व (Importance of Giloy in Ayurveda)


"गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ ...!!!" असा उल्लेख या वनस्पतीबाबत बऱ्याच ऋषींनी केलेला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. एक संदर्भ असा ही आहे की, राम आणि रावण यांच्या युध्दानंतर देवांचा राजा इंद्र देवाने अमृता पाऊस पाडून राक्षसांमुळे मारल्या गेलेल्या वानरांना पुर्नजीवन दिले. पुर्नजीवन दिलेल्या वानरांच्या अंगावरील अमृताचे थेंब थेंब जिथे जिथे पडले तिथे गुळवेल वनस्पती उगवली.  गुळवेलाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये गुळवेलाला अमृता असं नाव देण्यात आलं आहे.अगदी  नावानुसार ही बहुगुणी वनस्पती अमर आहे, जमिनीमधील पाण्याची पातळी कितीही कमी झाली तरी ही वनस्पती सुकत नाही. गुळवेलाची लागवड तुम्ही अगदी घराबाहेर किंवा बागेतही करू शकता. ह्याची वेल सदैव हिरवीगार राहत असल्याने बऱ्याचदा सजावटीसाठीही ह्याचा वापर केला जातो. गुळवेलाची पान ही दिसायला खायच्या पानाच्या पानासारखीच असतात. गुळवेलाच्या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॉस्फरस हे घटक आढळतात आणि ह्याच्या शिरांमध्ये स्टार्चची मात्राही आढळते. कडुनिंबाच्या झाडासोबत ह्याची लागवड केल्यास ह्या वनस्पतीच्या गुणांमध्ये अधिक वाढ आढळते.


गुळवेलाबाबत डॉक्टरांचं म्हणणं 


गुळवेलाचा उल्लेख आयुर्वेदात अमृतकुंभ असा आहे. तसंच ह्याला रसायनकल्प ही म्हंटले जाते. खरोखरच गुळवेल ही अगदी अमृताप्रमाणेच आहे. गुळवेलीचे खोड फारच औषधी असते. हे खोड आडवे चिरून पाहिल्यास चक्रीसारखा आकार दिसतो. मी बरेचदा माझ्या रुग्णांना औषध देताना गुळवेलाचा वापरते. खासकरून तापाच्या उपचारासाठी गुळवेलाचा वापर केला जातो. ज्यामध्ये मी गुळवेल सत्व किंवा गुळवेलाची घनवटी यांचा वापर करते. कावीळसारखा मोठ्या आजारातून शरीराची झालेली हानी भरून काढण्यासाठी गुळवेलाचा खूपच उपयोग होतो. कुठल्याही आजारातून उठल्यावर रूग्णाच्या शरीराला पुनरुज्जीवन देण्यात गुळवेल उपयोगी ठरते. गुळवेलीचा काढा हा अत्यंत परिणामकारक आहे. - वैद्या दीपा जोशी, BAMS 


वाचा - त्वचेसाठी एलोवेराचे फायदे देखील


गुळवेलाची घनवटी म्हणजे काय? (Gulvel Churna Tablet)


गुळवेलाची घनवटी सर्व प्रकारच्या तापांमध्ये गुणकारी आहे. खासकरून ह्याचा उपयोग रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. चरक संहितेमध्ये गुळवेलीला रसायनकल्प असे म्हंटले आहे. रसायनकल्प असल्याने हे बुध्दीवर्धक आणि आयुवर्धक आहे. नावावरूनच सिध्द होतं की, घनवटीमधील प्रमुख घटक द्रव्य गुळवेल आहे.गुळवेल ही आयुर्वेदीक चिकित्सेतील एक लोकप्रिय वनस्पती मूळ मानले जाते. ज्याचा वापर विभिन्न प्रकारच्या आयुर्वेदीक औषधांमध्ये केला जातो. संस्कृतमधील ‘अमृता’ या उल्लेखाप्रमाणे ह्या वनस्पतीत अनेक औषधीय गुण आहेत. गुळवेल ही सदैव अमर राहणारी वेल आहे आणि ह्याचे अगणित फायदे आहेत.या वेलीचे सत्त्व काढून त्याच्या गोळ्या किंवा कॅप्सूल बनवल्या जातात.ज्यालाच गुळवेल घनवटी असे म्हंटले जाते.गुळवेलाच्या अर्कापासून घनवटी बनवली जाते. अर्काला आयुर्वेदामध्ये घन असे नाव दिल आहे. गुळवेल घनवटीच्या निर्मितीमध्ये गुळवेलाच्या फांद्यापासून घन बनवले जाते. घन बनवण्यासाठी गुळवेलाच्या फांद्या कुटून त्या थोड्यावेळासाठी पाण्यात ठेवण्यात येतात. मग त्याचा काढा बनवला जातो. काढा नंतर गाळून पुन्हा मंद आचेवर घट्ट होईपर्यंत उकळला जातो. त्यांनतर हे घट्ट मिश्रण उन्हात ठेवलं जातं. गोळ्या बनवण्याच्या स्थितीत येईपर्यंत सुकवलं जातं. त्यानंतर ह्याच्या गोळ्या बनवल्या जातात. ज्यालाच गुळवेल घनवटी किंवा गुडूची घनवटी असं म्हटलं जातं.जीर्ण ताप आणि सर्व प्रकारच्या तापांमध्ये, तापानंतर येणारा अशक्तपणा, वाताचा त्रास, तहान तहान होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने वारंवार आजारपण येणे, भूक न लागणे किंवा मंदावणे,यकृत विकार, कावीळ, खोकला होणे, मधुमेह, त्वचेचे रोग होणे, उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या रोगांमध्ये गुळवेलाची घनवटी उपयोगी ठरते.


गुळवेल काढा कसा करावा? (How to Make Giloy Kadha)


G1


गुळवेलाची भरड किंवा कांड आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. काढा करण्यासाठी 1 कप गुळवेल घेतल्यास त्याच्या 16 पट पाणी घालावे. हे मिश्रण 1/4 होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे.


वाचा - BANYAN झाडाचे फायदे


गुळवेल भाजी करता येते का? 


गुळवेलाच्या हृदयाकार दिसणाऱ्या पानांची भाजीसुध्दा केली जाते. गुळवेलाची पाने ही खोडाएवढी गुणकारी नसली तरी पानांची भाजी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यदायी ठरते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.


गुळवेलीच्या भाजीचे औषधी गुणधर्म (Medicinal Properties of Giloy)


गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी केली जाते. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते.मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे. साखरेचा इष्टानिष्ट परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी.वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेलाची भाजी हितावह ठरते. त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे. कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.


या भाजीची कृती पुढीलप्रमाणे : साहित्य: गुळवेल कोवळी पाने, कांदा, लसूण, तेल, तिखट आणि स्वादानुसार मीठ.


कृती: सर्वप्रथम गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन आणि बारीक चिरून घ्यावी.त्यानंतर कांदा चिरून घ्यावा आणि तेलावर सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. ह्यात लसूणसुध्दा चिरून घालावा. त्यानंतर गुळवेलीची चिरलेली पान यावर परतून घ्यावी. त्यानंतर तिखट आणि स्वादानुसार मीठ घालून ही भाजी वाफेवर शिजवून घ्यावी.


Also Read Benefits Of Almond Oil In Marathi


विविध आजारात गुणकारी गुळवेल (Uses of Giloy)


Main Pic


तापावर रामबाण उपाय (Fever)


कोणत्याही प्रकारच्या तापावर गुळवेल हा रामबाण उपाय आहे. म्हणूनच सर्व तापावरील औषधांमध्ये ह्याचा वापर केला जातो.


रोग प्रतिकारशक्तीत वाढ करणारी गुळवेल (Boosts Immunity)


गुळवेल (Gulvel) तुमच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवते. ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. यातील हर्ब्स तुमच्या शरीराला स्वच्छ करतात. तसंच शरीराच्या इतर भागातील हानिकारक तत्वसुध्दा दूर शरीराबाहेर टाकण्यात मदत करते.


पचनास मदत करते (Helps in Digestion)


मानसिक तणाव, चिंता, भीती आणि असंतुलित आहार इत्यादी गोष्टी तुमच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम करत असतात. गुळवेलांमध्ये पचन आणि ताण दूर करणारे गुण आहेत. ज्यामुळे बध्दकोष्ठ, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. ह्याच्या सेवनाने भूक ही वाढते. ह्यामुळे तुमच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होऊन तुमचे जीवन आनंददायी होईल.  


मधुमेहासाठी वरदान गुळवेल (Helps to Control Diabetes)


जर तुम्हाला मधुमेह आहे, तर गुळवेल हे तुमच्यासाठी वरदान आहे. कारण गुळवेलमध्ये हाइपोग्लिसीमिक अर्थात साखर कमी करणारे घटक आढळतात. ज्यामुळे रक्तदाब आणि लिपीडचा स्तर कमी होतो. गुळवेलच्या नियमित सेवनाने टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांना विशेष फायदा होतो. रोज गुळवेल रस प्यायलाने साखर कमी होते.


                                                                वाचा - Uses of Peepal Leaves In Marathi


डोळ्यांसाठी फायदेशीर (Beneficial for Eyes)


गुळवेल ही वनस्पती डोळ्यांसाठी फायदेशीर मानली जाते. डोळ्यांच्या कोणत्याही समस्येला ही वनस्पती दूर करते आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात मदत करते. गुळवेल वनस्पती पाण्यात उकळून ते पाणी डोळ्याला लावल्यास डोळ्याचे सगळे आजार दूर होतात. गुळवेलाच्या वापराने चष्म्याचा नंबरसुध्दा कमी होतो. गुळवेलाच्या पानांचा रस मधात घालून डोळ्यांना लावल्यास डोळ्याचे सगळे छोटे मोठे आजार बरे होतात. आवळा आणि गुळवेलाचा रस एकत्र करून प्यायलास नजर तीक्ष्ण होते.


खोकला (Cough)


खूप दिवस खोकला जात नसल्यास गुळवेलाच्या रसाचे सेवन करावे. हा रस रोज सकाळी घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. खोकला थांबवण्यासाठी उपाय करून पहा.


सर्दी-पडसं, ताप इत्यादी आजारांमध्ये गुळवेलीच्या खोडाचा तुकडा पाण्यात उकळावा आणि ते पाणी प्यावं. ह्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि त्यामुळे अशक्त रूग्णांना वारंवार होणारी सर्दी-पडसं, ताप इ. आजार बरे होतात.आजकाल चिकन गुनियासारख्या व्हायरल तापातून बरे झाल्यावर बऱ्याच रूग्णांना महिनोमहिने गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. अशा वेळी गुळवेलाच्या पानांचा काढा लाभदायी ठरतो.लहान मुलांमधील सर्दी, खोकला आणि तापात गुळवेलाच्या पानांचा रस काढून तो दोन तीन वेळा मधाबरोबर चाटण करून द्यावा. लगेच फरक पडतो.तापामुळे अशक्तपणा आल्यास तो दूर करण्यात ही गुळवेल हे गुणकारी औषध आहे.


giloy-inside-4


वाचा - कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Curry Leaves)


गुळवेल चे फायदे (Benefits of Giloy In Marathi)


  • गुळवेलाचा रस घेतल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. अॅनीमिया असलेल्या रूग्णांनी गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्यास फरक पडतो.

  • मधुमेह रोगात (डायबिटीज) ही गुळवेलाचा रस गुणकारी आहे.कावीळ झाल्यास गुळवेलाच्या पानांची पावडर मधाबरोबर घेतल्यास फायदा होतो.

  • कावीळीमुळे रूग्णाला येणारा अशक्तपणा गुळवेल घेतल्यास दूर होतो. तसंच गुळवेलाचा काढा मधातून दोन-तीन वेळा घेतल्यास आराम पडतो.

  • हातापायांची जळजळ होत असल्यास गुळवेलाची पान वाटून सकाळ संध्याकाळ पायाला आणि हाताला लावा. जळजळ कमी होईल.

  • स्त्रियांच्या पाळीदरम्यान गुळवेलाचा रस सेवन केल्यास खूपच लाभदायी ठरतो.

  • गुळवेलाच्या रसाच्या सेवनाने अॅसिडीटीचा त्रास दूर होतो.

  • गुळवेलाच्या फळांचा रस काढून तो चेहऱ्यावर लावल्यास तारूण्यपिटीका, फोड आणि पुळ्या बऱ्या होतात.

  • कान दुखत असल्यास गुळवेलाच्या पानांचा रस काढावा आणि एक दोन थेंब कानात घालावे. लगेच आराम मिळतो.

  • अंगाला खाज येत असल्यास गुळवेलाच्या पानांचा रस आणि हळदीचा लेप करून शरीरावर लावावा खाज थांबेल आणि त्वचासुध्दा चमकदार होते.


टीप: वरील दिलेले उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


गुळवेलाच्या सेवनाचे दुष्परिणाम (Side Effects Of Giloy)


गुळवेल ही वनस्पती किती फायदेशीर आहे. ते आपण बघितलं पण काही परिस्थितींमध्ये ह्याचे सेवन करणे नुकसानदायक किंवा त्याचे दुष्परिणाम ही दिसून येतात.


- जर तुम्ही मधुमेहाची औषध घेत असाल तर गुळवेलाचे सेवन करू नका.


- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी शक्यतो गुळवेलाचे सेवन करू नये.


- शस्त्रक्रिया झाल्यावरही ह्याचा वापर टाळावा


सार : अमृततुल्य गुळवेलाचे अनंत लाभ असल्याकारणाने त्याला अमृता असे संबोधले आहे. गुळवेलाच्या नित्य उपयोगाने आपण निरोगी राहून अनेक रोगांपासून सुरक्षित राहू शकतो.


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:


अपने घर में ही लगा सकते हैं अनेक बीमारियों के लिए फायदेमंद गिलोय


बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे


जाणून घ्या कलौंजीचे आरोग्यदायी फायदे (Benefits of Black Seeds In Marathi)