केसांची गळती ही अशी एक समस्या आहे जी प्रत्येक वयामध्ये तुमच्यासमोर येत असते. कधी कधी ऋतूमधील बदल हेदेखील केसगळतीचं महत्त्वाचं कारण असू शकतं. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार, दिवसातून शंभर केस गळणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. मात्र जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल की, यापेक्षा केसगळतीची संख्या जास्त आहे, तेव्हा लगेचच यावर उपचार सुरु करा. कारण तसं न केल्यास, तुम्हाला टक्कल पडण्याचीही शक्यता असते. यातून सुटका मिळवायची असल्यास, त्याचे बरेचसे उपाय हे आपल्या घरातच असतात. मात्र आपण घरगुती उपाय करणं बऱ्याचदा नजरअंदाज करत असतो आणि असे उपाय शोधू लागतो जे कमीत कमी वेळेमध्ये केसांच्या गळतीच्या समस्येतून सुटका मिळेल. बाजारामध्ये असे कितीतरी अँटी हेअरफॉल शॅम्पू उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची केसगळती थांबवू शकता. आम्ही तुमच्यासाठी अशीच अँटी हेअरफॉल शॅम्पूची यादी आणली आहे, ज्यामुळे घरगुती उपायाप्रमाणेच तुम्हाला फायदा मिळेल.
आपल्याला दिवसातून बरीच कामं पूर्ण करायची असतात. याच कारणांमुळे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ताण वाढवून घेतो. हाच तणाव पुढे केसगळतीचं मुख्य कारण बनतो.
डोकेदुखी झाली खाल्ली पेनकिलर, ताप आला तर खाल्ली पॅरासिटेमॉल किंंवा कोणत्याही आजारामध्ये उपाय म्हणून दिवसातून ४ ते ५ वेळा औषधं घ्यावीच लागतात. या औषधांचा सर्वात पहिला परिणाम हा आपल्या केसांवर होत असतो. त्यामुळे केसगळती होते.
जेवणामध्ये फास्ट फूड आणि अनहेल्दी खाणं वाढल्यास, केसगळती होऊ लागते. जेवणामध्ये भाज्या, डाळ, अंड आणि फळांचा समावेश केल्यास, जास्त चांगलं होईल.
केसांमध्ये केमिकल्सचा जास्त वापर केल्यासदेखील केस गळतात. आपण केसांची स्टाईल करण्यासाठी कधी जेल तर कधी हेअरकलर्सचा वापर करत असतो. कधी कधी तर केसांवर कर्लिंग मशीन अथवा स्ट्रेटनिंग मशीनचाही वापर करतो. त्यामुळेदेखील केसगळती होऊ लागते.
तुम्हाला जर तुमच्या उशीवर, कारच्या सीटवर अथवा आपल्या खोलीमध्ये सगळीकडे केसच केस दिसत असतील तर समजून जा की, तुम्हाला आता अँटी हेअरफॉल शॅम्पू वापरण्याची गरज आहे. सनसिल्क ब्रँडचे हेअरफॉल सॉल्युशन शॅम्पू गोल्डन कलरच्या एका बारीकशा बाटलीमध्ये मिळतो. सोया विटामिन कॉम्प्लेक्सयुक्त हा शॅम्पू केसांच्या मुळांना मजबूती देतो आणि केसांना दहापट गळण्यापासून रोखतो. याच्या वापरामुळे तुमचे केस केवळ मजबूतच नाही तर पहिल्यापेक्षाही अधिक स्मूथ आणि चमकदार होतील.
वाचा - पांढर्या केसांच्या दुष्परिणामांबद्दलही
लॉरियल ब्रँडचा हा शॅम्पू गेसगळती, केसांचं दुहेरी होणं, केस कोरडे आणि बेजान असणं आणि केस पातळ होणं या केसांशी संबंधित 5 समस्यांपासून सुटका मिळवून देतो. तसंच केसांची मुळंदेखील यामुळे मजबूत बनतात. याचा वापर रोज केल्यास, केस स्मूथ आणि घनदाट होतात. लॉरियल टोटल रिपेअर 5 शॅम्पूची ही खास गोष्ट आहे की, हा शॅम्पू कोणत्याही केसांना सूट करतो. तुमचे केस स्कल्प ड्राय असोत वा तेलकट हा शॅम्पू तुम्हाला कुठेही निराश करत नाही.
डव ब्रँड नेहमीच सॉफ्ट त्वचेसाठी प्रसिद्ध आहे. या ब्रँड्सची अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे डव डॅमेज थेरपी शॅम्पू. हा शॅम्पू डॅमेज झालेल्या केसांना रिपेअर करून त्यांना पुन्हा नॉरिश करतो. याचा रोज वापर केल्यास, तुमच्या केसांची गळती थांबते. याचं युनिक फॉर्म्युलेशन केसांना मजबूती मिळवून देतं. त्याशिवाय हा शॅम्पू कलरिंग आणि उष्णतेमुळे डॅमेज होणाऱ्या केसांनाही वाचवतो. आपल्या केसांना अधिक चमकदार बनवण्यासाठी तुम्ही डव कंडिशनरदेखील वापरू शकता.
याचा प्रो विटामिन फॉर्म्युला केसांच्या मुळांपासून मजबूती आणतो. मागच्या 30 वर्षात हा ब्रँड बाजारामध्ये खूपच लोकप्रिय आहे. प्रो विटामिन फॉर्म्युलासह या शॅम्पूमध्ये तेलाचेही गुण आहेत. ज्यामुळे केसांच्या मुळांना मजबूती येते. बाकीचे शॅम्पू केसांचा बाहेरून 5 टक्के मजबूती देत असतील, तर पँटीनचा हा शॅम्पू केसांच्या मुळांपर्यंत जाऊन पोषण देतो. याच्या वापरामुळे केस मऊ होतात आणि केसगळतीही थांबते.
हिमालयाचा अँटी हेअर फॉल शॅम्पू एक यशस्वी 2- इन -1 फॉर्म्युला आहे जो केसगळती कमी करतो आणि केसांना मुळांपासून पोषण देतो. हिमालयाची सर्व उत्पादनं ही औषधी वनस्पतींपासून बनवण्यात आली आहेत. हा शॅम्पू बनवण्यासाठीही अनेक असरदार औषधी वनस्पतींचा उपयोग करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात खास वनस्पती आहे ती म्हणजे भृंगराज. पूर्वीच्या काळापासूनच आयुर्वेदामध्ये भृंगराज केसांच्या मजबूती आणि केसगळती थांबवण्यासाठी औषध म्हणून वापरात होते. हे केसांना मुळापासून मजबूत करून त्यांना मऊ आणि मुलायम बनवतं.
वाचा - केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू
आजकाल मुलींना पतंजलिची सर्व ब्युटी अाणि हेअर उत्पादनं आवडत आहेत. याचे शॅम्पूदेखील पूर्णतः आयुर्वेदिक असतात. बाबा रामदेवने पतंजलिच्या या शॅम्पूमध्ये आवळा, शिकेकाई, गुळवेल, जटमानसी, हळद, लिंबू आणि रीठा यासारख्या आयुर्वेदीक पदार्थांचा वापर केला आहे. हा शॅम्पू आंतरराष्ट्रीय स्तरावर पातळीवर सर्व शॅम्पूंपेक्षा अधिक चांगला असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे.
या शॅम्पूचा वापर करणं तुम्हाला महाग वाटत असेल तर, तुम्ही घरगुती उपायदेखील करू शकता आणि त्यासाठी आमच्याजवळ तुमची केसगळती थांबवण्यासाठी बरेच घरगुती उपायही आहेत.
1. लसणीच्या दोन ते तीन पाकळ्या ठेचून घ्या. त्यामध्ये तीन मोठे चमचे नारळ तेल मिक्स करा. हे मिश्रण काही मिनिट्ससाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करा. त्यानंतर ही पेस्ट 30 मिनट पर्यंत आपल्या केसांमध्ये लावून मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा.
2. कांद्याचे तुकडे करून बाऊलमध्ये ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे अॅलोव्हेरा जेल आणि एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करावे. त्यानंतर ही पेस्ट केसांना मुळांपासून लावून सुकवण्यासाठी ठेवा. अर्धा तास झाल्यानंतर केस शॅम्पू लावून थंड पाण्याने धुवा.
3. तुमच्या केसांच्या प्रमाणात दही घ्या आणि त्याप्रमाणेच मुलतानी माती त्यामध्ये मिसळा. आता याची पातळ पेस्ट करून घ्या. कारण ही पेस्ट ना तुम्हाला तासनतास केसांना लावून ठेवायची आहे ना त्याने मालिश करायचं आहे. ही पेस्ट तुम्हाला शॅम्पूप्रमाणे केसांना लावून केस धुवायचे आहेत. तुम्हाला हवं असल्यास, त्यानंतर कंडिशनरचा उपयोग करू शकता. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा आपल्या केसांवर करू शकता आणि तसं केल्यास, त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
4. नारळाच्या तेलात कापूर आणि कोथिंबीर घालून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर २० मिनिट्स ही पेस्ट केसांवर ठेवून द्या आणि त्यानंतर केसांना थंड पाण्याने धुवा. केस धुण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्ही केसांना हॉट टॉवेल स्टीमदेखील देऊ शकता. त्यामुळे केसांचे मूळ मजबूत होतील.
ब्युटी एक्सपर्ट मौना लालच्या म्हणण्याप्रमाणे केसगळती थांबवण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी शॅम्पूबरोबरच तेल लावणंही महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा की, नेहमी केसांच्या टेक्सचरप्रमाणेच तेल लावावं. जसं कोरड्या केसांसाठी नेहमी जास्त तेल घ्यावं. त्यासाठी तुम्ही बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचं तेलही वापरू शकता जे अधिक चांगलं आहे. तेल कधीही रात्रभर केसांना लावून ठेऊ नये. केस धुण्यापूर्वी १५ मिनिट्स आधी तेलांना मालिश करावं. त्यानंतर गरम पाण्यानं टॉवेल भिजवून केसांना स्टीम द्यावं आणि शॅम्पूने केस धुवावेत.
एक्सपर्टच्या सांगण्यानुसार, तेलकट केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. धूळ, माती, प्रदूषणाच्या सतत संपर्कात आल्याळं केस लगेच तेलकट होतात. तेलकट केसांमध्ये जास्त वेळ जीव राहण्यासाठी, तुम्ही घरच्या घरी पॅक बनवू शकता. बेसनमध्ये दही मिक्स करून घ्या आणि मग तुमच्या केसांना लावा. २० मिनिट्सनंतर केस शॅम्पूने धुवून टाकावेत. याशिवाय महिन्यान किमान दोनवेळा तेल मालिश करावे.
केसांमध्ये चमक आणायची असल्यास, तुम्हाला सतत पार्लरच्या फेऱ्या मारायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही फक्त दह्यात एक केळं घालून मिक्सरमधून काढावं आणि त्याची पेस्ट करून केसांवर लावावी. २० मिनिट्सने केस धुवून टाकावेत.
वेळोवेळी शॅम्पू बदलत राहायला हवा का ?
शॅम्पू वेळोवेळी बदलत राहायला हवा ही गोष्ट अगदी बरोबर आहे. वास्तविक बऱ्याच कालावधीपर्यंत एक शॅम्पू वापरत राहिल्यामुळे तुम्हाला त्या शॅम्पूची सवय होते आणि त्यामुळे हळूहळू शॅम्पूचा परिणाम दिसेनासा होतो. मात्र शॅम्पू बदलण्याचीदेखील एक योग्य वेळ असते. जेव्हा तुम्हाला वाटू लागतं की, तुमचा नियमित शॅम्पू लावल्यानंतरही केसगळती थांबत नाही तेव्हा समजून जावं की, शॅम्पू बदलण्याची वेळ जवळ आली आहे.
शाच्या कमतरतेमुळे केस गळतात ?
बऱ्याचदा केसांची गळती हा एकप्रकारचा संकेत असतो. तुमच्या शरीराला संतुलित आणि पोष्टिक आहाराची गरज असल्याचा हा संकेत असतो. आपल्या डाएटमध्ये अंडं, पालक, सिमला मिरची, मसूर डाळ आणि रताळं समाविष्ट करावं. या सर्व पदार्थांमध्ये विटामिन आणि प्रोटीन्स असतात जे केसांना आतून मजबूती देतात आणि केसगळती होण्यापासून थांबवतात.
आठवड्यातून किती वेळा केस धुवावे ?
हा प्रश्न बहुतेकवेळा त्या मुलींना जास्त महत्त्वाचा असतो ज्यांचे केस जास्त लांब असतात. कारण लांब केस रोज धुणं अतिशय कठीण असतं. वास्तविक रोज शॅम्पू लावल्याने तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल संपून जातं. ज्यामुळे केस अतिशय कोरडे आणि वाईट दिसतात. केसांच्या योग्य काळजीसाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना शॅम्पू लावणं योग्य आहे. तुमचे केस लहान असतील तर केवळ पाण्याने धुवूनही तुम्ही साफ करू शकता.
मुलं आणि मुलींच्या केसांसाठी हेअर फॉल शॅम्पूदेखील वेगवेगळे असतात का ?
असं काहीही नाही. बाजारामध्ये मुलं आणि मुलींसाठी केसगळतीसाठी एकाच प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. सर्व कंपनी मुलं आणि मुलीच हे उत्पादन वापरणार हे लक्षात ठेवूनच उत्पादनांची निर्मिती करत असतात.
केसगळती थांबवण्यासाठी औषधं उपलब्ध आहेत का ?
केसगळती थांबवण्यासाठी बाजारामध्ये बऱ्याच स्वरुपाची औषधं उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरल्यास, अधिक योग्य होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास, या औषधांनी डोकेदुखी, चक्कर येणं आणि रक्तदाब कमी जास्त होणं अशा स्वरुपाच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
इमेज सोर्सः Shutter Stock