बॉलीवूडच्या ‘या’ टॉप १० अॅक्टर्सनी अनाथ मुलांना घेतलं दत्तक

बॉलीवूडच्या ‘या’ टॉप १० अॅक्टर्सनी अनाथ मुलांना घेतलं दत्तक

लोकसंख्येने मोठ्या असलेल्या आपल्या भारत देशात लाखो लहान मुलं अनाथ आणि बेघर आहेत. अशा मुलांना दत्तक घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे. खरंतर आपल्या देशात अशा लोकांची गरज आहे, जे अनाथ मुलांना दत्तक घेतील. पण अजूनही आपल्याकडे लोक असं मानतात की, त्यांना त्यांच्याच रक्ताचं मूल हवं, मग त्यामध्य अनेक अडचणी का येईनात. पण आधुनिक युगात अशी अनेक जोडपी आहेत, जी मुलांना दत्तक घेऊन समाजाला एक नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर असे कित्येक लोक आहेत की, ज्यांना स्वतःची मूलं असूनही त्यांनी मूलं दत्तक घेतली आहेत आणि त्यांना नवजीवन दिले आहे. आपल्या बॉलीवूडमध्ये ही असे काही स्टार्स आहेत.


1. साक्षी तन्वर


Bollywood celebs adopted kids -1


बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील अभिनेत्री साक्षी तन्वरने नुकतंच एका लहान मुलीला दत्तक घेऊन, ती सिंगल मदर झाली. साक्षीने नवरात्रीच्या दरम्यान ८ महिन्यांच्या एका मुलीला आपल्या घरी आणलं. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला. साक्षीने सांगितलं की, माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळेच मी हा निर्णय घेऊ शकले. साक्षीने आपल्या मुलीचं नाव ‘दित्या’ ठेवलं आहे. साक्षी हीच लग्न झालेलं नसून तिने मुलीला दत्तक घेतलं आहे आणि ती सिंगल मदर झाली आहे. आपल्या आयुष्यातील अतिशय मौल्यवान क्षणांपैकी हा एक क्षण असल्याचं सांगितलं आहे. तसंच माझ्या प्रार्थनाचं फळ आणि लक्ष्मी देवीचा प्रसाद आहे.2. सुष्मिता सेन


Celebs who adopted kids 2


बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा मुलं दत्तक घेण्याचा विषय येतो, तेव्हा अभिनेत्री सुष्मिता सेन हीच नाव पहिल्या क्रमांकावर येतं. ह्याचं कारण म्हणजे बॉलीवूड अॅक्ट्रेस आणि पूर्व मिस युनिव्हर्स सुष्मिता हीने  दोन अनाथ मुलींना दत्तक घेतलं असून त्यांचा योग्यरित्या सांभाळ करत आहे. सुष्मिताचं त्यांच्यावर असलेलं प्रेम हे आपल्याला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटोजवरून वारंवार दिसून येतं. दत्तक घेतलेल्या आपल्या दोन्ही मुली म्हणजे रेने आणि आलिजा ह्यांच्या मातृत्वाची जबाबदारी ती अत्यंत समर्थपणे पार पाडत आहे. रेनेला २००० साली तर आलिजाला 10 वर्षांपूर्वी दत्तक घेतलं.  त्यांच्या प्रेमापोटी तिने आपलं बॉलिवूड करिअरसुध्दा सो़डून दिलं.


3. रवीना टंडन


Celebs who adopted kids 3
बॉलीवूडमधील नावाजलेली अभिनेत्री रवीना टंडन हिने वयाच्या २१ व्या वर्षी छाया आणि पूजा ह्यांना दत्तक घेतलं.  इतक्या कमी वयात तिने दोन्ही मुलींची आई प्रमाणेकाळजी घेतली आणि एका सिंगल मदरप्रमाणे त्यांना वाढवलं. कालांतराने तिने अनिल थडानी  ह्यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना स्वतःचे राशा आणि रणबीर ही दोन मुलं झाली. त्यानंतर रवीनाने छाया आणि पूजा ह्या दोघींची थाटामाटात लग्न करून दिली. आज ह्या दोघीही आपापल्या घरी अतिशय  आनंदात नांदत आहेत.


4. सनी लिओनी


Celebs who adopted kids 4


पोर्न स्टारपासून बॉलीवूड अभिनेत्री असा प्रवास केलेल्या सनी लिओनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर ह्यांना आज ३ मुलं आहेत. ह्यांपैकी २१ महिन्यांची लहान निशा कौर हिला महाराष्ट्रामधील लातूर ह्या ठिकाणाहून दत्तक घेतलं असून अशर सिंह वेबर व  नोआ सिंह वेबर ही दोन जुळी मुलंही त्यांना आहेत. सनी आणि तिच्या नवऱ्याने सोशल मीडीयावर मुलं दत्तक घेण्याबाबत खूप समर्थन केलं आहे. सनीने स्वतःच्या सोशल मीडियावर देवाच्या आशिर्वादाने माझं कुटुंब पूर्ण झालं असं म्हंटल होतं. तिचं म्हणणं होतं की, ही जन्मभराची जवाबदारी आहे, पण आम्ही ह्यासाठी पूर्णपणे तयार होतो. ह्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे, कारण आम्हाला एक कुटुंब बनवायचं होतं. त्यामुळे आता आम्ही ह्याचा आनंद घेत आहोत.5.  प्रीती झिंटा


Bollywood celebs adopted kids 8


बॉलीवूडची डिंपल गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रीति झिंटा हीसुध्दा मूल दत्तक घेण्याच्या बाजूने आहे. त्यामुळेच २००९ साली तिने एक किंवा दोन नाहीतर तब्बल 34 अनाथ मुलांना दत्तक घेतलं. आता जरी प्रीतीने मिस्टर गुडइनफ ह्यांच्यासोबत लग्न केलं असलं तरी ही ती वेळ काढते आणि त्यांच्या अभ्यासात मदत करते. वर्षातून कमीतकमी दोन वेळा ह्या मुलांना भेटायला जाते.


6. नीलम कोठारी


Bollywood celebs adopted kids 5


बॉलीवूड अभिनेत्री नीलम कोठारी जी तिच्या काळात खूप प्रसिध्द होती. हीने बॉलीवूड आणि टीव्ही अॅक्टर समीर सोनीशी लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षानंतर, 2013 सालामध्ये ह्या जोडप्याने एका लहान मुलीला  दत्तक घेतलं. जिचं नाव त्यांनी अहाना ठेवलं. सध्या ज्वेलरी डिझायनिंग करणाऱ्या नीलमचं म्हणणं आहे की, आम्हाला बऱ्याच आधीपासून एका बाळाला दत्तक घ्यायची इच्छा होती आणि दत्तक घेण्याचा प्रक्रियेला ही बरेच महिने लागले.   7. मिथुन चक्रवर्ती


Bollywood celebs adopted kids 7
खूप कमी जणांना माहीत आहे की, प्रसिध्द अभिनेते मिथुन चक्रवर्ती ह्यांनी देखील एका मुलीला दत्तक घेतलं असून ती त्यांना एका कचऱ्याच्या डब्यात बेवारस पडलेली दिसली होती. मिथुन ह्यांना नमाशि , रिमोह आणि मिमोह अशी तीन मुलं आहेत . त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलीचं नाव दिशानी असं ठेवलं आहे.8. जय भानुशाली


jay bhanushali adopted kids 6


टीव्ही जगाततील अभिनेता जय भानुशाली आणि त्याची अभिनेत्री पत्नी माही विज ह्यांनी नुकताच दोन मुलांना दत्तक घेतलं आहे. खरंतर ही दोन्ही मुलं आपल्या खऱ्या आई - वडिलांसोबत राहतात, पण जय आणि माही ह्यांनी त्यांच्या शिक्षणाची आणि बाकी गरजांची जबाबदारी घेतली आहे. २०११ मध्ये जय आणि माही ह्यांचं लग्न झालं होतं.9. गुरमीत चौधरी


Celebs who adopted kids 8


टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय जोडी म्हणजे गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी हे  देखील दोन मुलींचे आई-वडील झाले आहेत. त्यांनी पूजा आणि लता ह्या दोघींना दत्तक घेतलं आहे. बिहार येथील गुरमीत, देबीना हिच्यासोबत कुटुंबातील एका लग्नासाठी गेले असता त्यांना तिकडे ह्या दोन मुली भेटल्या. पूजा ही आपल्या काकांसोबत राहत होती तर लताच्या वडिलांचा मृत्य झाला होता.10. राहुल बोस


Rahul bose adopted kids


अभिनेता राहुल बोसला बॉलीवूडमधील सर्वात टॉपचा सिंगल फादर म्हणून ओळखलं जात. राहुल बोस हा एक अभिनेता, खेळाडू असण्याबरोबरच एक सामाजिक कार्यकर्ता असून तो सामाजिक कार्यांमध्ये नेहमी अग्रेसर असतो आणि ह्याच कार्याच्या माध्यमातून अंदमान- निकोबार येथील 11 वर्षांच्या  जवळपास 6 मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी त्याने २४ लाखांची व्यवस्थादेखील केली. अंदमान-निकोबार येथील गरीब मुलांसाठी त्याने स्कॉलरशिप प्रोग्रॅमदेखील सुरु केला आहे. राहुल हा एकट्याने आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे.


You might like these


Komolika, Kali Pari & 8 Other Iconic TV Villains We Cannot Forget!


Oh-My-God: You Will Love Annoying Janice’s Not-So-Annoying Wardrobe


Not Saas-Bahu Sagas, Here Are 8 Shows On Indian Television You Can Enjoy Right Now!


'Phone Mein Hi Ghuss Ja' And Other Epic Things That Only Desi Moms Say!


6 TV Actors Who Found Love Outside The Industry And Have The Happiest Marriages!