नवविवाहित #DeepVeer ने घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

नवविवाहित #DeepVeer ने घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

बॉलीवूडच्या बाजीराव-मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी कुटुंबियांसोबत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी ह्या जोडप्याने कपल ट्वीनिंग केल्याचं दिसून आलं. लग्नाआधीचे फंक्शन्स असो, इटलीला निघताना एअरपोर्ट लुक असो वा लग्नाचे विधी असो हे गोड जोडपं वारंवार कपल ट्वीनिंग करताना दिसून आलंय. लग्नसराईत हा ट्रेंड दिसून आला तर आश्चर्य वाटणार नाही.


DeepVeer in Siddhivinayak


दोघांनीही सब्यसाचीने डिझाईन केलेले कपडे घातले होते. दीपिकाने क्रीम कलरचा अनारकली घातला होता तर रणवीरने क्रीम कलरचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर नेहरू जॅकेट घातलं होतं. दीपिकाने अगदी नववधूला शोभेल असा चूडा घातला होता आणि सिंदूरही लावलं होतं. सिद्धीविनायकाचं दर्शन घेतल्यावर बाहेर पडतानाचे दीपवीरचे फोटो इतके सुंदर आहेत की, तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात पडाल. दीपिकाच्या चेहऱ्यावर नववधूचं तेज आणि आनंद अगदी झळकतोय. पाहा हा व्हिडिओ -
 

 

 


View this post on Instagram


 

 

And after the puja they posed again #ranveersingh #deepikapadukone #DeepVeerKiShaadi @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

नवविवाहीत #DeepVeer बरोबर त्यांचे आईवडील म्हणजे प्रकाश-उज्ज्वला पदुकोण आणि जगजीत सिंग-अंजू भवनानी होते. तसेच या दोघांच्या बहिणी अनिशा पदुकोण आणि रितिका भवनानी ह्यांनी सिद्धीविनायकाचा आशिर्वाद घेतला.


DeepVeer in Siddhivinayak 1

नुकत्याच एका मुलाखतीत रणवीरने इटलीतील लेक कोमो हे ठिकाण लग्नासाठी का निवडलं ह्याचा गोड खुलासा केला होता. रणवीर म्हणाला होता की, ‘तिची ही  इच्छा होती, ती मला पूर्ण करायची होती. चांगल्या पती म्हणून माझं ते पहिलं कर्तव्य आहे. मला लग्नाबाबतची तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची होती. मला तिला आनंदी ठेवायचं आहे. बस्स एवढंच.’ किती गोड ना.


44917785 195313618071462 2418570013649666048 n
14 आणि 15 नोव्हेंबरला या लव्हबर्डसच इटलीतील लेक कोमो येथे कोकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न पार पडलं होतं. त्यानंतर पहिलं रिसेप्शन बंगळूरू येथे तर बॉलीवूड सेलेब्ससाठी दुसरं रिसेप्शन आज मुंबई येथे देण्यात येणार आहे. आजच्या रिसेप्शच्या अपडेट्ससाठी फॉलो करा POPxo मराठी.


फोटो सौजन्य - Instagram 


AWESOME NEWS! POPxo SHOP is now Open! Get 25% off on all the super fun mugs, phone covers, cushions, laptop sleeves, and more! Use coupon code POPXOFIRST. Online shopping for women never looked better!