लग्नात साडीला देऊया डिफरंट लुक, हटके स्टाईल

लग्नात साडीला देऊया डिफरंट लुक, हटके स्टाईल

 


जर तुमच्या जवळच्या मैत्रीणीचं किंवा भावाचं, जवळच्या कोणाचंही यंदा कर्तव्य असेल आणि तुम्ही लग्नात साडी नेसण्याच्या विचारात असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप वेगळ्या आडियाज घेऊन आला आहे. तुम्हाला आम्ही सांगतो, आजकाल साडी नेसण्याच्या पद्धतींमध्ये भरपूर बदल झालेत. आता साडीचा लुक म्हणजे फक्त पारंपरिक असं समीकरण राहिलं नाही तर साडी नेसणं आता फ्युजनदेखील झालं आहे. साड्यांचे वेगवेगळे लुक्स आणि स्टाईल्स बॉलीवूड सेलिब्रिटीजमध्ये पाहायला मिळतात. दीपिका पाडुकोण, सोनम कपूर, उर्वशी रौतेला, तमन्ना आणि कृती सेनॉनसह बॉलीवूडमधल्या अनेक तारका­­ नवनवीन ट्रेंन्डस् फॉलो करता आहेत. मग तुम्ही तरी मागे का राहताय... तुम्हीही द्या की तुमच्या साडीला फ्यूजन लुक... आणि व्हा तुमच्या लग्नकार्यातील सेलिब्रेटी...


प्लाझो साडी


Plazo Sari
'आयुष्य परफेक्ट नाही झालं तरी तुमची साडी तर परफेक्ट होऊच शकते ना...' या कॅप्शन सकट सोनम कपूर आणि रिया कपूरने प्लाजो साडी नेसून इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर केला.  नुसतंच साडी लिहण्या ऐवजी त्यांनी 'मिठाई प्लाजो साडी' असं नाव दिलं आणि त्याचबरोबर दोन्ही कपूर सिस्टर्सने ब्लाऊज ऐवजी 'मोतीचूर क्रॉप टॉप'  घातला आहे. शिवाय त्यांनी साडीवर सॅन्डल घालण्याऐवजी व्हाइट कलरचे शूज कॅरी केलेत. मात्र तुम्हाला हवं असेल तर या प्लाजो साडीवर तुम्ही सॅन्डलही घालूच शकता.  


साडी गाऊन


Saari Deepika


तुम्ही कधी साडी आणि गाउन एकत्र घालण्याचा विचार केलाए? जर केला नसेल तर दीपिका पादुकोणच्या या साडीकडे बारकाईनं बघा... डिझायनर अनामिका खन्नानं डिझाईन केलेला हा साडी गाउन दीपिकाने फारच सुंदर पध्दतीने कॅरी केलायं. कुठल्याही परी कथेत शोभेल अशी व्हाइट कलरची साडी, दिसायला एकदम स्टाइलिश आहे.


ऑनिक्स पॅन्ट साडी


Urvashi Saari


या साडीचा ट्रेंड खरचं खुप यूनीक आहे. उर्वशी रौतेलाच्या या साडीमध्ये परकराची जागा टाईट पॅन्टने घेतली आहे. त्याच्या निऱ्या देखिल फार खुबीनं नेसल्या आहेत म्हणून सुंदर दिसताएत... आणि त्या पॅन्टलाही अगदी सूट करताएत. उर्वशीने या ब्लॅक कलरच्या साडीवर सिल्वर कलरच्या हाई हील सॅन्डल्स कॅरी केल्यात. तुम्हाला जर ट्रॅडिशनल साडी नेसण्याचा कंटाळा आला असेल तर या लग्नकार्यांच्या सिझनमध्ये तुम्ही साडीचा हा नवा लुक नक्कीच ट्राय करु शकता.


पॅन्ट साडी


Saari Tamanna


मल्टीकलरमध्ये असलेली ही पॅन्ट साडी खरंच खुप स्टाइलिश वाटते. त्यात तमन्नाने साडीला डिफरंट लुक देण्यासाठी कंबरेवर गुलाबी रंगाचा बेल्ट बांधला आहे, त्याचबरोबर शोल्डरवर एक स्कार्फही घेतला आहे. पॅन्ट साडीतला तमन्नाचा ओव्हरऑल लुक एकदम हटके आहे. तुम्हाला जर स्कार्फ घ्यायचा नसेल तर तुम्ही नका घेऊ, कारण त्या शिवायही साडी स्टाइलिश वाटेलच.  


फ्रिज पॅन्ट साडी


Kriti Saari
'साड़ी विद ए ट्विस्ट...' कृती सेननने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या कंटेम्परेरी इंडियन लुकिंग साडीवरचा फोटो टाकला आणि हेच कॅप्शन दिलं. या साडीत ट्विस्ट आणण्यासाठी कृतीने फ्रिज्ड पॅन्ट घातलीए...ज्यामध्ये लेअर्स आहेत. ही ब्लॅक अॅन्ड रेड साडी अजूनच हटके वाटावी म्हणून त्यावर बोल्ड प्रिंटीग केलंल आहे. तुम्हीही साडीची ही हटके स्टाईल घरच्या लग्नाकार्याला आजमावूच शकता. विश्वास ठेवा ही हटके साडी नेसून तुम्ही साडीबाबत जर बोल्ड स्टेप घेतलीत तर त्यामुळे तुमचा लुक लग्नात सगळ्यांपेक्षा वेगळाच दिसेल.  


 


इमेज सोर्स - इन्स्टाग्राम