ADVERTISEMENT
home / आरोग्य
Mustard Seeds In Marathi

त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया (Benefits Of Mustard Seeds In Marathi)

आपल्या दैनंदिन आयुष्यात पूर्वीपासूनच मोहरीचा उपयोग केला जात आहे. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना केवळ याची चव आणि केवळ खाण्यासाठी याचा उपयोग होतो इतकेच माहीत आहे. याचा उपयोगही आपण नेहमी खाण्याच्या पदार्थांमध्ये घालण्यासाठीच करत आलो आहोत. मोहरीला इंग्रजीत मस्टर्ड, तामिळ आणि मल्याळममध्ये कडूगु, तेलुगूमध्ये अवालू, बंगालीमध्ये मोहोरी आणि पंजाबीमध्ये राई म्हटलं जातं. जगभरातील स्वयंपाकघरात मोहरी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? मोहरीच्या बियाणांमध्ये अनेक फायदे (Benefits Of Mustard Seeds In Marathi)  आहेत, जे बऱ्याच रोगांना मुळापासून नष्ट करतात. याचा उपयोग कॅन्सर, मायग्रेन, दमा, कंबरदुखी यासारख्या रोगांसाठी करून घेता येतो.

बघूया मोहरीची बी कोणकोणत्या रोगांवर उपाय आहे आणि यामुळे इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टींमध्ये फायदे होतात…

कशा असतात मोहरीच्या बिया (Mustard Seeds In Marathi)

Mustard Seeds In Marathi

भारतात शेंगदाण्यानंतर सर्वात जास्त तेलाशी संबंधित शेती कसली होत असेल तर ती आहे मोहरी, ज्याचं जास्त पीक हे राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल तसेच आसाममध्ये पिकवण्यात येते. ब्रेसिका कम्प्रेसटिस असे याचे वैज्ञानिक नाव आहे. याला पिवळ्या रंगाची फुले येतात आणि जी त्याच्या वेलीला वरच्या भागावर असतात. याचे फळ परिपक्व झाल्यानंतर फुटते आणि याच्या बिया जमिनीवर सांडतात. प्रत्येक फळाला साधारणतः ८ ते १० बी असतात जे काळे, पिवळे आणि धारणतः भुऱ्या रंगाच्या असतात.

Also Read गुळवेल म्हणजे जणू अमृतच

कोणकोणत्या गोष्टीमध्ये होतो मोहरींच्या बियांचा उपयोग (Use Of Mustard Seeds In Marathi)

भारतीय कुटुंबांमध्ये मोहरीच्या बियांचा जास्त उपयोग हा स्वयंपाकघरामध्ये मसाला अर्थात पदार्थांची चव वाढवण्यासाठी करण्यात येतो. तर मोहरीच्या बियांपासून काढण्यात आलेल्या तेलाचा उपयोगदेखील खाण्याचे पदार्थ बनविण्यासाठी होतो. शिवाय मोहरीची फोडणी घालण्यासाठी वा लोणचे जास्त काळासाठी चांगले ठेवायचे असल्यास आणि त्याची चव वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. इतकेच नाही तर मोहरीच्या पावडरचा वापर हा गार्निशिंगसाठीदेखील करण्यात येतो. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की, मोहरीच्या बियांचे बरेच औषधीय गुण आहेत, ज्याचा वापर हा ब्युटी प्रॉडक्ट्स अथवा बऱ्याच रोगांवरील औषधे बनविण्यासाठीदेखील करण्यात येतो.

ADVERTISEMENT

मोहरीचा प्रत्येक घरामध्ये वापर करण्यात येतो. काही ठिकाणी तेलाच्या स्वरुपात तर काही ठिकाणी फोडणीसाठी तर काही ठिकाणी लोणच्याची चव वाढवण्यासाठी उपयोग होतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का? केवळ चवीसाठीच नाही तर याचे काही अचंबित करणारे फायदेदेखील आहेत. बऱ्याच शारीरिक दुखण्यावर मोहरी हा उपाय असून त्याने आराम मिळतो.

मोहरी आणि त्याच्या तेलामुळे नक्की काय फायदे होतात ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Internal stopped using a facewash

सुंदर दिसण्यासाठी (Beauty Benefits Of Mustard Seeds In Marathi)

आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त मानण्यात येणारी मोहरी केवळ आरोग्यासाठीच नाही तर, आपल्या सौंदर्यामध्येही अधिक सुंदर दिसण्यासाठी उपयोगी ठरते. उत्कृष्ट त्वचेसाठी मोहरीचा उपयोग करता येऊ शकतो. मोहरीचा वापर केल्यानंतर लगेचच काही तासांमध्येच याचा रिझल्ट तुम्हाला दिसतो. वास्तविक मोहरीमध्ये कॅरेटिन आणि लुर्टिन प्रचंड प्रमाणात असते आणि त्याबरोबरच त्यामध्ये व्हिटामिन ए, सी आणि के देखील भरपूर प्रमाणात असते. ही सर्व पौष्टिक सत्त्व एकत्र येऊन उत्तम अँटिऑक्सिडंट तयार होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील वाढते वय कमी दिसण्यासाठी मदत होते. तसेच मोहरीमध्ये अँटी – फंगल गुणही आहेत ज्यामुळे त्वचेवरील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते आणि तुमची त्वचा हायड्रेड राहण्यासाठी मदत होते. यामुळे तुमची त्वचा अतिशय तजेलदार आणि ताजी दिसते.

अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते मोहरी

मोहरीमध्ये कॅरोटिन, जॅक्सेथिन आणि व्हिटामिन ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व व्हिटामिन असल्यामुळे मोहरी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. जे वाढते वय आणि चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच तुम्हाला बऱ्याच वेळेपर्यंत तरूण दिसण्यासाठीही याचा उपयोग होतो.

वजन कमी करण्यासाठी (Mustard Seeds Benefits for Weight Loss)

Mustard Seeds Benefits for Weight Loss

वजन कमी करण्यासाठीदेखील मोहरी अतिशय उपयोगी आहे. हवे तर तुम्ही याचा उपयोग पावडर खाऊन किंवा पदार्थ बनविण्यासाठी केवळ मोहरीचे तेल वापरून करू शकता. वजन कमी करण्यासाठी मोहरी अतिशय उपयोगी ठरू शकते. वास्तविक याच्या बियांमध्ये बी कॉम्प्लेक्स व्हिटामिन अर्थात फॉलेट, नियासिन, थियामिन आणि राईबोफ्लेविन असल्यामुळे शरीरातील मेटबॉलिजम व्यवस्थित राहते.

ADVERTISEMENT

घनघोर, लांबसडक आणि काळ्या केसांसाठी (Mustard Seeds For Hair Care)

Mustard Seeds for Hair Care

मोहरी केसांसाठी एक रामबाण उपाय अर्थात औषध आहे. घनघोर, काळ्या आणि लांबसडक केसांची तुम्हाला आवड असल्यास, आठवड्यात कमीत कमी ३ वेळा मोहरीच्या तेलाने डोक्याचे मालिश करावे. यामुळे केसांची चांगली वाढ होते, तसेच शरीरातील रक्ताभिसरणदेखील चांगले राहते. मोहरीच्या तेलामुळे वयापूर्वीच पांढऱ्या होणाऱ्या केसांच्या समस्येला नैसर्गिकरित्या रोखण्याचे काम करते आणि केस काळे राहण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच मोहरीच्या बिया या नैसर्गिक कंडिशनर म्हणूनदेखील काम करतात. यामधील फॅटी अॅसिड हे केसांमध्ये व्यवस्थित आत जाऊन कंडिशनिंगचे काम करते आणि त्यामुळे केस चमकदार आणि घनघोर बनविण्यासाठी मदत होते.

Also Read मेथीचे केसांसाठी फायदे

पाळीमध्येही होतो उपयोग (Mustard Seeds Benefits In Marathi For Periods)

पाळीच्या दिवसात महिलांसाठी मोहरीचा उपयोग खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये तांबे, लोह, मॅग्निशियम आणि सेलेनियम अशी पौष्टिक तत्त्व असतात. ज्यामुळे रक्तदाब आणि पाळीमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळते. तसेच पाळीच्या ५ दिवसांमध्ये महिलांच्या हाडांचे जे नुकसान होते ते थांबवण्यासाठीही याची मदत होते. त्यामुळे अगदी घरातील मोठ्या स्त्रिया पाळीच्या दिवसात मोहरीची आमटी (सरसो का साग) खाण्याचा सल्ला देतात. यामुळे हाडातील मॅग्नेशियमची मात्रा वाढते आणि अॅस्टियोपोरोसिसला रोखण्यासाठीही याची मदत होते.

या रोगांसाठी औषधी उपचार म्हणून काम करते मोहरी (Health Benefits Of Mustard Seeds)

Health Benefits Of Mustard Seeds

मधुमेह (Mustard Seeds for Diabetes)

मोहरी बी मधुमेहासारख्या रोगापासून मुक्त करते. एका संशोधनामध्ये समोर आले आहे की, मोहरीच्या दाण्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरावर येणाऱ्या तणावापासून मुक्त करतात. तसेच शरीरातील ग्लुकोजचे प्रमाणही मोहरीच्या दाण्यांमुळे कमी होण्यास मदत होते असाही शोध लावण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

कर्करोग (Mustard Seeds For Cancer)

कर्करोगाला मात देणारा ग्लुकोजेल ओलेट (glucogel olet) हा गुण मोहरीमध्ये असतो, ज्यामुळे कर्करोगाचा ट्यूमर अथवा गाठ बनू शकत नाही. मोहरीमध्ये फायटोन्यूट्रीयन्ट्सदेखील (phytonutrients)  असतात जे विशेषतः गॅस्टोइंटेस्टायनल कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मदत करतात. रोज मोहरी खाल्ल्यामुळे कर्करोग होण्याची शंकादेखील कमी होते.

मायग्रेन (Mustard Seeds For Migraine)

मायग्रेनचे दुखणे हे प्रचंड प्रमाणात असते. यामध्ये डोक्यावर कोणीतरी हातोडी मारत असल्यासारखे वाटत राहते. केवळ अर्ध्या डोक्याच्या बाजूला हे दुखत राहते तर कधी कधी पूर्ण डोके दुखते. यामध्ये मोहरी हा यावरील रामबाण उपाय असून उत्कृष्ट औषध आहे. कारण यामधील मॅग्नेशियम मायग्रेन ही समस्या कमी करण्यासाठी मदत होते.

दमा (Mustard Seeds For Asthma)

ADVERTISEMENT

मोहरीच्या दाण्यांमध्ये सेलेनियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते आणि दोन्ही अँटीइन्फ्लेमेटरी असते. मोहरी रोज खाल्ल्याने दमा असलेल्या रूग्णाला श्वास घेण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळते. तसेच मोहरीमुळे सर्दीही ठीक होते आणि छातीत जमा झालेला कफ काढण्यासाठीही मदत होते.

संधिवात (Mustard Seeds For Arthritis)

संधिवात अर्थात अर्थरायटिस यामध्ये गुढघे, हात आणि शरिरातील अन्य भागांमध्ये दुखत असते आणि माणसाला चालण्या – फिरण्यालाही मर्यादा येतात. यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. विशेषतः रूमेटिक अर्थरायटिसमुळे आजारी असलेल्या रूग्णांना मोहरीच्या तेलाने नक्कीच मालिश करून घ्यायला हवे. मोहरीमध्ये असलेल्या सेलेनियम आणि मॅग्नेशियममुळे खूपच चांगला फायदा होतो.

वाचा – आळशीच्या बियांचे आरोग्यासाठी फायदे

ADVERTISEMENT

मोहरीच्या दाण्यांचे घरगुती उपाय (Mustard Seeds Home Remedies In Marathi)

1. लांबसडक, घनघोर आणि काळ्या केसांसाठी आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा मोहरीच्या तेलाने डोक्याचे मालिश करावे. लक्षात ठेवा, मालिश करून झाल्यानंतर केसावर प्लास्टिक बॅग अथवा गरम टॉवेल लपेटून घ्यावा. त्यामुळे तेल व्यवस्थितरित्या केसांमध्ये सुकेल. अर्धा तास झाल्यानंतर शॅम्पू लावून आंघोळ करावी. त्यानंतर तुमच्या केसांना खूपच चांगली चमक येईल.

2. कानामध्ये दुखत असेल अथवा कानात कोणता कीडा गेला असल्यास, मोहरीच्या तेलामध्ये २ ते ३ लसूण पाकळ्या घालाव्यात आणि तेल चांगले गरम करावे. थोडे कोमट असताना कापसाच्या सहाय्याने २ थेंब कानात घालावे. कानात गेलेला कीडा मरून तेलाबरोबर नक्की बाहेर येईल.

3. पायाचे तळवे दुखत असल्यास, मोहरीची पावडर बनवावी. कोमट पाण्यात ती पावडर मिसळून घ्यावी आणि साधारणतः १५ मिनिटे पाय त्यामध्ये बुडवून ठेवावे. असे केल्यामुळे तुमच्या तळव्याचे दुखणे गायब होईल.

4. कंबर दुखत असल्यास, मोहरीच्या तेलात ओवा, हिंग आणि लसूण घालून गरम करावे आणि नंतर कमरेवर हलक्या हाताने लावून मालिश केल्यास, लगेच आराम मिळेल. ओवा खाण्याचा फायदा होतो.

ADVERTISEMENT

5. बद्धकोष्ठ असल्यास, त्यापासून सुटका मिळण्यासाठी एक चमचा मोहरी दिवसातून दोन ते तीन वेळा खावी. यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास थांबतो.

6. सांधेदुखीमुळे तुम्ही त्रस्त असल्यास, मोहरीच्या तेलामध्ये कापूर घालून गरम करावे. त्यानंतर त्याने मालिश केल्यास, आराम मिळेल.

7. मासिक पाळीदरम्यान, बऱ्याच प्रमाणात रक्तस्राव होत असल्यास, ४० ग्रॅम मोहरीचे सुके दाणे घ्यावेत त्याची बारीक पावडर बनवावी. त्यामध्ये २ ग्रॅम पावडर घेऊन दिवसातून दोन वेळा दुधातून ही पावडर पाळीच्या पहिले वा पाळी चालू असताना प्यावे. पाळीदरम्यान रक्तस्राव थांबवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय आहे.

8. बेसनामध्ये मोहरीचे तेल घालून एक पेस्ट करून ग्यावी. त्यामध्ये २ चमचे दही आणि लिंबू रस मिक्स करावा. हा लेप रोज १५ ते २० मिनिट्स चेहऱ्यावर लावल्यास, त्वचेवरील टॅनिंग आणि काळे डाग यासारख्या समस्या दूर होतील.

ADVERTISEMENT

9. मोहरीचे दाणे हे नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करतात. यामध्ये तुम्ही लव्हेंडर वा गुलाब पाणी मिसळून स्क्रब बनवू शकता. या स्क्रबचा प्रयोग तुम्ही चेहरा वा डेड त्वचा हटवण्यासाठी करू शकता. ते हैं।

10. डोके दुखत असल्यास वा मायग्रेन असल्यास, अर्धा चमचा मोहरी पावडर, ३ चमचा पाण्यात घालून नाकावर लावावे. यामुळे तुमचे दुखणे निघून जाते.

11. संधिवातामुळे हैराण असल्यास, मोहरीच्या दाण्यांची १०० ग्रॅम पावडर घ्यावी. यामध्ये मीठ आणि सोडियम बायकार्बोनेट घालावे. या साऱ्या गोष्टी एकत्र करून एक जाडसर लेप तयार करावा. दुखत असलेल्या ठिकाणी हा लेप लावावा. काही वेळातच आराम मिळेल.

12. मोहरीचे दाणे वाटून मधाबरोबर चाटण चाटल्यास, कफ, खोकला आणि सर्दीपासून आराम मिळेल.

ADVERTISEMENT

13. पायरियाने तुम्ही त्रस्सत असल्यास, मोहरीच्या दाण्यांचा घरगुती उपाय नक्की करा. वाटलेले सैंध मीठ मोहरीच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यावे आणि रोज दातावर लावावे. यामुळे दात हलायचे आणि दातांतून रक्त येणे बंद होते. तसेच दात साफ आणि मजबूत बनतात.

14. गोरा रंग येण्यासाठी, मोहरीचे दाणे दुधामध्ये घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. हा लेप चेहऱ्यावर १५ मिनिट्स ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. रंगामध्ये फरक पडलेला दिसून येईल.

15. रोज मोहरीच्या तेलात बनलेले पदार्थ खाल्ल्यामुळे हृदयाशी संबंधित कोणतेही रोग होण्याची शक्यता कमी असते.

You Might Like These:

ADVERTISEMENT

ऑलिव्ह ऑईलचे विविध प्रकार आणि फायदे

जिरे खाण्याचे फायदे (Cumin Seeds Benefits In Marathi)

20 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT