मऊ आणि मुलायम त्वचा सगळ्यांनाच हवी असते. पण त्वचेवरचे पोर्स ओपन असले की चेहरा वाईट दिसू लागतो, चेहऱ्याचं सौंदर्य हरवू लागतं. आपल्यालाच आपल्या स्कीनबाबत काहीसं अनइझी वाटू लागतं. ओपन पोर्समुळे त्वचा निर्जीव दिसू शकते आणि सुरकुत्याही पडू शकतात. खरं पहायला गेलं तर ओपन पोर्स ही अगदी सामान्य समस्या आहे. मात्र कोणाला ही समस्या भेडसावू लागली तर मग मात्र या समस्येतून सुटका व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले जातात. कारण ओपन पोर्समुळे रुक्ष दिसणारी त्वचा कोणाला आवडेल? पण तुम्ही घाबरु नका ह्यावर अनेक उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही ओपन पोर्स भरु शकता किंवा त्यांचा आकार कमी होऊ शकतो. जसं की त्वचेची नियमित काळजी करण्यापासून, घरगुती उपाय ते लेजर ट्रीटमेंटपर्यंत अनेक पर्याय आहेत. हो, लेझर ट्रीटमेंट तुम्हाला खर्चात टाकू शकते. पण घरगुती उपचारांनी पोर्स भरणार असतील, तर हा खर्च कशाला करायचा? आणि म्हणूनच प्रसिद्ध कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. प्रेरणा तनेजा तुम्हाला काही टीप्स देत आहेत. त्या टीप्स फॉलो करा आणि लेजर ट्रीटमेंटशिवाय ओपन पोर्सपासून सुटका मिळवा.
कोरफडाचा गर म्हणजेच अॅलोवेरा जेल, ह्याचा एक नैसर्गिक स्रोत म्हणून वापर होऊ शकतो. कोरफडामध्ये त्वचेसंबंधित वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचे गुणधर्म असतात. अगदी तुमच्या ओपन पोर्ससाठीही ते उपयुक्त ठरते. त्यासाठी कोरफडाचा गर घ्या आणि तुमच्या ओपन पोर्सला लावून काही मिनिटं मालिश करा. त्यानंतर 10 मिनिटं गर तसाच तुमच्या चेहऱ्यावर राहू द्या व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. लक्षात ठेवा यासाठी कोरफडाचा ताजा गरच वापरायला हवा.
अंड फक्त तुमच्या तब्येतीसाठी नाही तर तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी पण फायद्याचं आहे. ओपन पोर्सला ट्रीट करण्यासाठी अंड्यातला पांढरा बलक घ्या. त्यात ओटमिल आणि लिंबाचा रस टाकून फेटा व ही पेस्ट चेहऱ्यावर 30 मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
अॅपल सायडर व्हिनेगरचे अगणित फायदे आहेत. आयुर्वेदात त्याचा औषध म्हणून उपयोग करतात. ओपन पोर्स बंद करण्यासाठी पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. त्यात कापसाचा बोळा भिजवून त्याच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हवेवर चेहरा वाळू द्या.
चेहरा स्वच्छ करुन त्याचा रंग उजळवण्यासाठी नेहमीच पपईचा वापर करतात. अगदीच सांगायचं झालं, तर अनेक ब्रॅंडच्या फ्रूट फेशियल प्रोडक्ट्समध्ये पपईचा आवर्जून वापर केलेला दिसतो. तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स बंद करण्यासाठीही पपई फायदेशीर ठरते बरं. त्यासाठी तुम्ही पपईचा गर कुस्करुन तो चेहऱ्यावर लावा. २० मिनिटं हा पॅक चेहऱ्यावर ठेवा व त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
सोडा आणि गरम पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट ओपन पोर्सवर लावून साधारणतः 30 सेकंद सर्क्युलर मोशनमध्ये हळूवार मालिश करा. त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.