दात पांढरे करण्याचे उपाय करून मिळवा शुभ्र दात - Teeth Whitening At Home In Marathi | POPxo

जाणून घ्या दात पांढरे करण्याचे उपाय (Teeth Whitening At Home In Marathi)

जाणून घ्या दात पांढरे करण्याचे उपाय (Teeth Whitening At Home In Marathi)

तुम्ही हसल्यानंतर पहिले दिसतात ते तुमचे दात.तुमचे दात सुंदर असतील तर तुमचे हास्य अगदी खुलून दिसते. पण तुमचे दात पिवळे असतील तर तुम्हालाही चारचौघात हसायला अगदी नकोसे होऊन जाते. तुम्हालाही तुमचे हात पिवळे झालेले दिसत असतील. तर दात पांढरे करण्याचे उपाय तुम्हाला माहीत हवेत. तुम्हाला माहीत आहे का? दात स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय आहेत. घरच्या घरी दातांचा पिवळेपणा कसा घालवावा यासाठीच आम्ही तुमच्यासोबत दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. मग जाणून घेऊया दात साफ करण्याचे उपाय.


दात पिवळे पडण्याची ही आहेत कारणं (Causes of Yellow Teeth)


प्रत्येकाच्या दातांचा शेड हा जरी वेगवेगळा असला तरी पिवळे पडलेले दात नेहमीच वेगळे दिसतात.तुमच्या दातांचा रंग तुम्हाला पिवळा वाटत असेल तर ही काही कारणं आहेत ज्यामुळे तुमचे दात पिवळे पडत आहेत. जाणून घेऊया दात पिवळे पडण्यामागील कारणे


चुकीच्या पद्धतीने दात घासणे


काही जणांना दात घासण्याचा फारच कंटाळा असतो. सकाळी आणि रात्री झोपताना ब्रश करण्याची सवय ही नेहमीच चांगली असते. पण काहींना दोन वेळा ब्रश करणेही जीवावर येते. तुम्ही दिवसभर खाल्लेलं अन्न तुमच्या दातांवर तसेच राहिले की, आपसुकच तुमचे दात पिवळे दिसू लागतात. दातांवर हळद किंवा तुम्ही खाल्लेल्या खाद्यपदार्थांचे डाग राहतात. त्यामुळे तुमचे दात न घासणे किंवा चुकीच्या पद्धतीने घासणे तुमच्या दातांचा शुभ्रपणा घालवू शकते. 


दात किडणे


cavities


दात स्वच्छ केले नाहीत तर तुमच्या दातांना किड लागणे स्वाभाविक आहे. किडलेले दात कधीच शुभ्र दिसत नाही. ते दात हळुहळु कमकुमव होतात. त्यांचा रंग बदलत जातो. जर तुमचे दात किडले असतील तर तुम्हाला त्यांचा रंगही बदलेला जाणवेल. त्यामुळे दात किडणे हे देखील तुमच्या दातांच्या रंगावर परिणाम करत असते.  


कॉफीचे अति सेवन


काही जणांना सतत कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीमध्ये असलेले कॅफेन तुमच्या  दातांचा रंग बदलत असते. जर तुम्ही जास्त कॉफी पित असाल तर तुम्हाला तुमच्या दातांवर आलेली पिवळी झाक नक्कीच दिसेल. त्यामुळे तुमचे दात पिवळे करण्यामागे हे आणखी एक महत्वाचे कारण आहे. 


दारु आणि धूम्रपानाची सवय


धूम्रपान आणि दारु पिण्याची सवयही तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे दारुमध्ये असलेले घटक आणि सिगारेटमध्ये असलेले तंबाखू तुमच्या दातांना पिवळे करु शकते. जर तुम्ही दारु पिणे आणि सिगारेट पिणाऱ्यांचे दात पाहाल तर तुम्हाला त्यांचे दात पिवळे झालेले दिसतील. 


वाचा - जाणून घ्या दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय


कोल्ड्रींक्स


cold drinks


प्रत्येक जेवणासोबत कोल्ड्रींक पिण्याची खूप जणांना सवय असते. कोल्ड्रींक्स सतत पिणे तुमच्या दातांसाठी घातक आहे. कारण कोल्ड्रींकमध्ये असलेले अॅसिडीक घटक तुमच्या दातांचा रंग हळुहळु पिवळा करतात. तुम्ही अगदी कोला पासून ते पांढऱ्यारंगाचे असे कोणतेही कोल्ड्रींक तुमच्या दातांना पिवळे करु शकते. तुमच्या दातांना नाजूक करण्याचे कामही कोल्ड्रींक्स करते. 


घरच्या घरी असा घालवा दातांचा पिवळेपणा (Teeth Whitening at Home in Marathi)


तुम्हालाही तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय (pivale dat upay) करु शकता. हे उपाय तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करतील. पण हा परिणाम तुम्हाला त्याच्या सततच्या उपयोगामुळे जाणवू शकेल.


केळ्याच्या साली (Banana Peel) 


banana peel



केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. ते ब्लिचिंग एजंट असल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची सालं उपयोगी पडते. केळ खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता ती साल तुम्ही तुमच्या दातांना घासा. असे केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा जाण्यास मदत होईल. वर म्हटल्याप्रमाणे सालीमध्ये असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशिअम तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करते. केळ्यांच्या सालीचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनवेळा केला तरी चालू शकेल. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.


स्ट्रॉबेरी (Strawberry)


ज्या प्रमाणे केळ्याच्या सालीमध्ये अॅसिडीक गुणधर्म असतात अगदी त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीमध्येही काही अॅसिडीक गुणधर्म असतात. स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अॅसिड आणि टूथ व्हाईटनिंग एजंट आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा उपयोगही दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केला जातो. स्ट्रॉबेरी हाताने क्रश करुन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालून एक छोटा ब्रश घेऊन टुथपेस्टचा वापर करतात अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे दात घासायचे आहेत. असे करताना तुम्हाला थोडी चुरचूर जाणवेल. पण जर तुम्हाला जास्त अॅसिडीक रिअॅक्शन नको असेल तर तुम्ही यातील सोडा वगळू शकता आणि नुसताच स्ट्रॉबेरीचा क्रश वापरु शकता. 


लिंबाची फोड आणि खाण्याचा सोडा (Lemon Slice and Soda)


pinapple %281%29



लिंबू ही ब्लचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे ते तुमच्या त्वचेवर काम करते अगदी त्याच पद्धतीने ते तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करु शकते. लिंबामध्ये सायट्रिक असते. ज्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे एक लिंबाची फोड घेऊन त्यावर खाण्याचा सोडा घाला आणि ही फोड दातावर चोळा आणि अगदी काहीच वेळ ठेवून तुम्ही गुळण्या करा. (लिंबाचा अति वापर तुमच्यासाठी चांगला नाही. लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड तुमच्या दातांसाठी चांगले नाही. त्याच्या अति वापरामुळे तुमच्या दातांवरील इनॅमल कमी होते आणि त्यामुळे तुमचे दात नाजूक होतात. जे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा वापर अगदी योग्य व्हायला हवा)


अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)


दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर देखील केला जातो. अॅपल सायडर व्हिनेगरमधील अॅसिडीक घटक तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करतात. अॅपल सायडर व्हिनेगर तुमच्या दातांसाठी जितके चांगले आहे तितकेच ते वाईट आहे. अॅपल सायडर व्हिनेगर तुम्ही थेट तुमच्या दातांना लावू शकत नाही. अगदी किंचिंतसे व्हिनेगर घेऊन त्यात पाणी घाला. कापसाचा बोळा किंवा थेट बोटाने तुम्ही तुमच्या दातांवर व्हिनेगर चोळा. एका मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही ते ठेवू नका. नाहीतर दातांवरील आवश्यक इनॅमल निघून जाईल. 


तुमच्या दातांच्या सौंदर्याचा विचार करणेही तितकेच गरजेचे


बेकिंग सोडा आणि ब्रश (Baking Soda and Brush)


baking soda %281%29


आतापर्यंत आपण पाहिलेच आहे की, बेकिंग सोडाचा वापर दातांसाठी केला जातो. तुम्ही थेट बेकिंग सोड्याचा वापर दातांसाठी करु शकता. बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या थेट दातांवर करा. तुमच्या दातांचे डाग निघून  जातील. बेकिंग सोड्याचा वापर करताना थोडे जपून राहा. 


अननस (Pineapple)


दातांचा पिवळेपणा तुमच्या दातांमध्ये साचलेल्या प्लाकमुळे अधिक दिसू लागतो. तुमच्या दातांच्या आजुबाजूला जर पिवळा थर साचला असेल तर त्याला प्लाक असे म्हणतात. अननसामध्ये असलेले इन्झाईम्स तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करतात. अननसाची फोड घेऊन तुम्ही तुमच्या दातांवर चोळा. यामुळे तुमच्या दातांवरील पिवळेपणा कमी झालेला दिसेल. याशिवाय तुमच्या दातांवरील प्लाक निघण्यासही तुम्हाला मदत मिळेल.


कडुनिंब (Neem)


तुमच्या दातांच्या समस्या कमी करण्यासाठी कडुनिंब हे उत्तम आहे. कडुनिंबामुळे तुमच्या दातांमधील किड, दातांचा पिवळेपणा आणि दातांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत मिळते. हल्ली बाजारात कडुनिंबाची पावडर मिळते. तुम्ही कडुनिंबाची पावडर घेऊन तुमचे दात ब्रश करु शकता. तुमच्या दातांचा रगं उजळण्यासोबतच तुमच्या दातांच्या इतर समस्याही त्यामुळे दूर होतील. कडुनिंबाचा वापर करण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. 


कोळसा (Coal)


charcoal


कोळश्याचा उपयोग दातांची स्वच्छता करण्यासाठी केला जातो हे तुम्ही पाहिले असेलच. कोळसा तुमच्यातील दातांवरील काळेपणा दूर करण्यास मदत करते. कोणतीही इम्प्युरीटी कोळसा काढून टाकण्यास मदत करते. पण हा शास्त्रशुद्ध उपाय नाही. कारण असे अजिबात सिद्ध झालेले नाही. जर तुम्ही कोळशाचा वापर करत असाल तर त्याचे नुकसानही तुम्हाला होणार नाही. त्यामुळे बाजारात मिळणारी अॅक्टिव्ह चारकोल पावडर घेऊन तुम्ही ती तुमच्या दाताला चोळू शकता. त्यामुळे तुमचे दात स्वच्छ होतील.


काळे मनुके (Raisins)


काळे मनुके तुमचे दात स्वच्छ करण्यास मदत करते. जर तुम्ही काळे मनुके चघळले तर या मनुक्यांमधून बाहेर पडणारे अॅसिडीक गुणधर्म तुमच्या दातांना स्वच्छ करण्यास मदत करतात.त्यामुळे तुम्ही काळे मनुके अगद मूठभर खायला काहीच हरकत नाही. तुम्ही जर मनुके खाणार असाल तर तुम्ही ते उघडून ते तुमच्या दातांनाही चोळू शकता. त्यामुळे तुमच्या दातांच्या इतर समस्याही कमी होतील. 


संत्र्याच्या साली (Orange Peel)


orange peel


सौजन्य: Instagram


दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालींचा देखील उपयोग करु शकता. संत्र्यांच्या सालीमध्ये सायट्रीक अॅसिड असते.त्याचा उपयोग तुम्हाला दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी होऊ शकतो. जर तुम्ही संत्र्याची पावडर तयार करुन ठेवली तर तुम्ही त्याचा उपयोग आठवड्यातून दोनदा करु शकता. तुम्ही तुमच्या ब्रश करण्याच्यावेळी त्याचा वापर केला तरी चालू शकेल. पण सायट्रीक अॅसिड असल्यामुळे त्याचा  वापर थोडा बेताने करा.


तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)


दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती वस्तूंचा वापर करणे घातक आहे का?


कोणत्याही गोष्टींचा वापर तुमच्या दातांसाठी करताना तुम्हाला थोडा विचार करणे आवश्यक असते. तुम्ही दातांसाठी ब्लीच असलेले पदार्थ वापरत असाल तर त्याचा अतिरेक करायला नको. कारण जर तुम्ही अशा गोष्टींचा वापर जास्त करत असाल तर तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता असते. विशेषत: नैसर्गिक अॅसिड असलेले पदार्थ अति वापरल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. 


दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी डेंटिस्ट नेमके काय करतात? 


जर तुम्ही तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इन्स्टंट अशी ट्रिटमेंट केली जाते ती म्हणजे ब्लीच ट्रिटमेंट. या ट्रिटमेंटमध्ये तुमच्या दातांना ब्लीच लावले जाते. त्यानंतर त्यावर ब्लु लाईट दिली जाते. अनेक सेलिब्रिटी अशा प्रकारच्या ट्रिटमेंट घेतात.  कारण त्यांना स्क्रिनवर चांगले दिसायचे असते. ही ट्रिटमेंट साधारण वर्षभर टिकते. जर तुम्ही कॉफी किंवा चहाचे सेवन बेताने केले तर तुमच्या दातांचा पांढरेपणा अधिक काळ टिकून राहतो. 


दात पिवळे होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही दिवसातून किती वेळा चहा -कॉफी प्यायला हवी?


चहा आणि कॉफीच्या अति सेवनामुळेही तुमचे दात पिवळे होतात. जर तुम्ही तुमच्या दातांसाठी ब्लीच ट्रिटमेंट घेतली असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतात. तुम्ही कोणतीही ट्रिटमेंट घेतली नसेल तरी तुम्ही चहा-कॉफीचे प्रमाण हे योग्य ठेवायचे असते. कारण सतत चहा कॉफी किंवा कोल्ड्रींक्सच्या सेवनामुळेही तुमचे दात पिवळे होऊ शकतात. जर तुम्हाला चहाची तल्लफ टाळता येत नसेल तर तुम्ही दोनदाच याचे सेवन करा. 


आता या सोप्या उपायांना दातांचा पिवळेपणा करा दूर आणि हसा बिनधास्त


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.


फोटो सौजन्य: Shutterstock