भाबीजी शुभांगी अत्रेचा हॉट अवतार

भाबीजी शुभांगी अत्रेचा हॉट अवतार

लोकप्रिय टीव्ही शो ‘भाबीजी घर पर हैं’ मधली साधी भोळी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रे हे पात्र फारच लोकप्रिय आहे. मालिकेमध्ये सतत साडीत आणि पारंपरिक वेशात दिसणारी शुभांगीचं हे हॉट फोटोशूट पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.


हॉट आणि बोल्ड भाभीजी


टीव्ही शो ‘भाबीजी घर पर हैं’ ची लोकप्रियता आजही तसूभरही कमी झाली नाही तर ती दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षक नेहमीच सीरीयलमधील पात्रांशी स्वतःला रिलेट करतात. या मालिकेत नखशिखांत साडी आणि डोक्यावर पल्लूत दिसणारी अंगुरी म्हणजेच शुभांगी अत्रे थायलॅंडला व्हेकेशनसाठी गेली होती. बीच व्हेकेशन म्हंटल्यावर बिकनी घातली नाही, असं होत नाही. मात्र सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अंगूरी भाभीला ह्या बोल्ड लुकमध्ये पाहून प्रत्येकजण हैराणच झाला की राव..


36935682 1788590864565528 5289771654073810944 n


सोशल मीडियावर नेहमी सिरीयलच्या सेटचे फोटो शेअर करणाऱ्या शुभांगीचा इतका हॉट अवतार या आधी कोणीच पाहिला नव्हता.


35264372 249275278956914 7397279511714201600 n


 भाबीजींना ऐकावे लागले स्वतःचेच डायलॉग


अॅन्ड टीव्हीवर सुरु असलेला लोकप्रिय फॅमिली-कॉमेडी शो ‘भाबीजी घर पर हैं’ मधली पात्रं तर फेमस आहेतच, पण त्याचबरोबर त्यांचे डायलॉगही लोकांच्या जिभेवर तितकेच रुळलेत. त्यामुळे या शोमधल्या अंगुरी भाभी रंगवणाऱ्या शुभांगी अत्रेच्या बिकिनी पोज पाहून, तिच्या फॅन्सनी कमेंट बॉक्समध्ये मालिकेतील हिट डायलॉग लिहीले आहेत.  एका युजरने लिहीलं की, ‘अरे दादा! अंगूरी भाभी तो मॉडर्न हो गई हैं।’ तर दुसऱ्या युजरने तिच्याच स्टाईलने डायलॉग कॉपी करत लिहलं, ‘हाय दइया लडडू की भाभी, ई का पहन लिया, बिकिनी।’ खरंतर वर्षानुवर्ष प्रेक्षक या कलाकारांना त्यांच्या एकाच अवतारात पाहतात, त्यामुळे त्यांना तसंच पाहण्याची सवय प्रेक्षकांना झालेली असते. त्यामुळे जरा काही बदल दिसला की त्यांच्या फॅन्सना धक्काच बसतो.


32450787 210404236421769 7907454972881534976 n %281%29


भूमिकेशी एकरुपता


टीव्ही शो ‘भाबीजी घर पर हैं’ मध्ये अंगूरी भाभीची भूमिका आधी ‘बिग बॉस सिझन 11’ ची विजेती शिल्पा शिंदे करत होती. प्रेक्षकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पण निर्मात्यांसोबत तिचे खटके उडाले आणि शिल्पा शिंदेनं मालिकेला रामराम ठोकला. त्यानंतर या भूमिकेसाठी शुभांगी अत्रेला निवडण्यात आलं. अगदी सुरुवातीला कोणाला वाटलंही नव्हतं की, प्रेक्षक तिला शिल्पाच्या जागी स्वीकारतील. मात्र तिने लगेचच स्वतःला त्या भूमिकेशी एकरुप केलं. परिणामी रसिक प्रेक्षकांचं तिला भरपूर प्रेम मिळत गेलं. प्रेक्षक तर हा शो एन्जॉय करतातच त्याचबरोबर शुभांगीही हा शो खूप एन्जॉय करते आणि नेहमीच आपल्या को-स्टार्ससोबतचे सेटवरचे फोटोज् शेअर करत असते.


 43913271 1960483474252696 6712093649087194112 n


 ‘अंगूरी भाभी’ फेम शुभांगी अत्रेनं केलेलं हॉट अॅन्ड बोल्ड फोटोशूट तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी नक्कीच उपयोगी ठरेल.  


फोटो सौजन्य- instagram