परफेक्ट फिगर कोणाला नको असते. त्यासाठी काही मुली आपली छाती अर्थात ब्रेस्टसाईझ वाढवतात. तर काही मुली अशाही असतात ज्या स्वतःची ब्रेस्ट साईझ फिगरप्रमाणे आणू शकत नाहीत आणि ब्रेस्ट कमी करण्याची त्यांची इच्छा असते. वास्तविक तुमच्या छातीचा आकार हा तुमच्या खाण्यापिण्यावर, अनुवंशिकतेवर आणि हार्मोनल स्थितीवर अवलंबून असतो. तसंच याव्यतिरिक्तदेखील अनेक गोष्टी असतात, ज्या छातीचा आकार लहान असण्यासाठी कारणीभूत असतात. तुम्ही तुमच्या छातीचा आकार व्यायाम आणि खाण्यापिण्यामध्ये बदल करून आरामत कमी करू शकता.
बऱ्याचदा काही मुली मेहनत वाचवण्यासाठी ब्रेस्टसाईझ कमी करण्यासाठी सर्जरीचा आधार घेतात. मात्र हे चांगलं नसून याचे वेगळे दुष्परिणाम पाहायला मिळतात. ब्रेस्टसाईझ कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत. जे तुम्ही अगदी आरामात फॉलो करू शकता.
तुमची छाती सुडौल करण्यासाठी आणि त्याचा आकार योग्य करण्यासाठी सर्वात पहिले तर योग्य ब्रा घालणं गरजेचं आहे. कारण मुलींची छाती चुकीची ब्रा घातल्यामुळे मोठी आणि चुकीच्या आकारात दिसू लागते. बऱ्याचदा चुकीच्या आकाराची ब्रा घातल्यामुळे मुलींना खांदे आणि पाठीमध्ये दुखणंही सुरू होतं. त्यामुळे अशावेळी व्यायाम आणि खाण्यापिण्यात बदल करून तुम्ही आरामात तुमच्या छातीचा आकार कमी करून आकर्षक दिसू शकता.
स्तनांचे असतात वेगवेगळे प्रकार, सर्वांनाच नसते याची माहिती
जर तुम्हाला खरंच तुमचं शरीर सुडौल असेल आणि तुमच्या छातीचा आकार तुमच्या शरीरापेक्षा जास्त दिसत असेल तर तुम्हाला रोज व्यायाम करण्याची गरज आहे आणि फक्त व्यायाच अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमच्या छातीचा आकार कमी होऊ शकतो.
छातीचा बराचसा भाग हा चरबीने बनलेला असतो, त्यामुळे कमी करण्यासाठी तुम्हाला कार्डिओसारख्या हाय इंटेन्सिटी व्यायामावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. तेव्हाच तुम्ही छातीचा आकार कमी करू शकाल. लक्षात ठेवा की, कोणत्याही योग्य माहितीशिवाय, व्यायाम सुरू करू नका. कारण काही व्यायाम हे तुमच्या छातीचा आकार वाढवणारे असतात. छातीचा आकार कमी करण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी चारवेळा ३० मिनिट्स व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो.
1. कार्डिओ ट्रेनिंग हे ब्रेस्ट साईझसाठी खूपच प्रभावी असतं. तुम्ही जर रोज न चुकता कार्डिओ केलं तर तुमच्या छातीचा आकार कमी होण्यासाठी नक्की मदत होते.
2. पुशअप्सदेखील तुमची छाती अधिक टाईट करून तुम्हाला सुडौल बनण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे छातीचा आकार कमी दिसू लागतो.
3. छातीचा आकार कमी करण्यासाठी एरोबिक्स करण्याचा सल्ला देण्यात येतो. तुम्ही रेगुलर सायकलिंग, जिना चढणे अथवा ब्रिस्क वॉकिंगदेखील करू शकता.
4. रोज डान्सच्या फास्ट स्टेप्स केल्यासदेखील तुम्हाला योग्य छातीचा आकार मिळू शकतो. डान्सच्या अशा स्टेप्स फॉलो करा ज्यामुळे तुमच्या छातीच्या जास्त हालचाली होतील.
5. तुमच्या छातीला रोज व्यवस्थित मसाज दिल्यामुळेदेखील छातीचा आकार बऱ्याच कालावधीसाठी योग्य राहू शकतो. मसाजसाठी इसेन्शियल अथवा नैसर्गिक तेलाचा वापर करावा.
हेही वाचा: स्तनाचा आकार कसा वाढवायचा
तुम्ही जे काही खाता, ते तुमच्या शरीरामध्ये चरबी म्हणून जमा होत असतं. व्यायामासह तुम्ही तुमच्या डाएटवरदेखील लक्ष देऊन छातीचा आकार कमी करू शकता. तुम्ही जितकी कॅलरी बर्न करता, त्यापेक्षा कॅलरी शरीरामध्ये इनटेक करत असाल तर तुमच्यासाठी छातीचा आकार कमी करणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या छातीचा आकार कमी होण्याऐवजी वाढू लागतो. त्यामुळे जितकं पचू शकेल तितकं खा हे लक्षात ठेवा. त्याशिवाय, तुमच्या आहारामध्ये छातीचा आकार कमी करण्यासाठी पोषक खाण्याचा समावेश करा, जसे -
1. आलं चरबी जाळण्यासाठी खूपच उपयुक्त असतं. त्यासाठी सकाळीच सर्वात पहिले गरम पाण्यात वाटलेलं आलं आणि एक चमचा मध घालून प्यावं. छातीचा आकार कमी करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
2. ग्रीन टी देखील छातीचा आकार कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते. प्रत्येक दिवशी दोन कप ग्रीन टी प्यायल्यास, छातीचा आकार कमी होऊ शकतो.
3. फ्लेक्स सीड्स अर्थात आळशीच्या दाण्यांमध्ये ओमेगा - ३ अॅसिड असतं जे शरीरामध्ये अॅस्ट्रोजन स्तराचं काम करतं. तुम्ही एका ग्लासातील भिजलेले आळशीचे दाणे खाल्ल्यास, काही दिवसातच तुमची ब्रेस्टसाईझ कमी होऊ शकते. याबरोबरच आवश्यक प्रमाणात पाणी प्यावं.
4. छाती सुडौल करण्यासाठी अंड्याचा सफेद भाग हा चांगला नैसर्गिक उपाय आहे. एका सफेद अंड्यामध्ये एक चमचा कांद्याचा रस घालून खावं आणि त्यामुळे तुमच्या छातीचा आकार कमी होण्यासाठी मदत होते.
5. तुम्ही नैसर्गिकरित्या छातीचा आकार कमी करण्यास उत्सुक असाल तर त्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करा. एक मूठ लिंबाची पानं उकळून त्यामध्ये हळद आणि एक चमचा मध घाला. त्यानंतर व्यवस्थित गाळून हे रोज प्यावं.
हेही वाचा - सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय
(व्यायाम आणि घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टर अथवा विशेषज्ज्ञांकडून नक्की सल्ला घ्यावा)