कॅट आणि कर्ल्स : कतरिनाचा नवा कर्ल लुक

कॅट आणि कर्ल्स : कतरिनाचा नवा कर्ल लुक

उफफ्...क्या अदा क्या जलवे तेरे कॅट. मस्त आहे ना..कतरिनाचा हा नवा कर्ल लुक. कतरिना कैफने नुकताच आपल्या आगामी सलमान खानबरोबरच्या ‘भारत’ चित्रपटातील तिचा लुक इन्स्टावर शेअर केला. हा फोटो शेअर होताच कतरिनाच्या फॅन्सनी लगेच कौतुकाचा वर्षाव केला आणि तिची ही नवी हेअरस्टाईल आवडल्याचं ही शिक्कामोर्तब झालं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Bhaiya and me in दिल्ली 4 भारत


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

जर तुम्ही कतरिनाला सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेलच की, कॅटने कधीच आपल्या हेअरस्टाईलच्या बाबतीत जास्त प्रयोग केलेले नाहीत. तिच्या बहूतेक चित्रपटातील हेअरस्टाईल ही सिल्की आणि सरळ केस अशीच दिसली आहे. त्यामुळेच तिचा हा नवा कर्ल लुक पाहून आम्ही आणि तुम्हीही नक्कीच आश्चर्यचकित झाला असाल. नाही का? मला तर हा लुक खूपच आवडलाय.


katrina-kaif-with-curls-bharatखरंतर ज्यांचे सरळ केस असतात, त्यांना नेहमीच कुरळ्या (Curls) केसांची आवड असते. आतातर हा कतरिनाचा लुक पाहिल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा कुरळ्या केसांची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. कतरिनाचा हा नवा लुक पाहिल्यावर अजून एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे हा लुक ओव्हल फेस शेपच्या व्यक्तींना खूपच छान दिसेल. तुम्हीही कतरिनाचा हा कर्ल लुक कोणत्याही स्टायलिंग टूलच्या मदतीशिवाय घरी करून पाहू शकता. सोप्प आहे ना? आता तुम्हीही फेक कर्ल करून पाहा.  


तुमच्या चेहऱ्याच्या शेपप्रमाणे करा हेअरस्टाईल.


'भारत'मध्ये कतरिनाची वर्णी


प्रियांका चोप्राने काही कारणास्तव 'भारत' चित्रपट सोडल्यानंतर त्यात कतरिनाची वर्णी लागली. काही दिवसांपूर्वीच ह्या चित्रपटाचा फर्स्ट लूक ही रिव्हील करण्यात आला होता.
 

 

 


View this post on Instagram


 

 

@bharat_thefilm @atulreellife @aliabbaszafar @beingsalmankhan


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on
दिवाळीत आलेला कतरिनाचा यशराजनिर्मित 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पण कॅट मात्र अपयशाकडे दुर्लक्ष करत सध्या  आपल्या आगामी चित्रपटांवर लक्ष देत आहे. सध्या ती शाहरूख खान आणि अनुष्कासोबतच्या 'झिरो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असून दुसरीकडे सलमानबरोबरच्या 'भारत' चित्रपटाचंही शूटींगही जोरदार सुरू असल्याचं दिसतंय. सध्या 'भारत' चित्रपटाची टीम दिल्लीत शूट करत असून त्यानंतर पुढचं शेड्युल जलंधर येथे असणार आहे. जिथे ह्या चित्रपटासाठी खास वाघाह बॉर्डरचा हूबेहूब सेट तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.    


फोटो सौजन्य: Instagram


POPxo is now available in six languages: English, Hindi, Tamil, Telugu, Marathi and Bangla.AWESOME NEWS! POPxo SHOP is now Open! Get 25% off on all the super fun mugs, phone covers, cushions, laptop sleeves, and more! Use coupon code POPXOFIRST. Online shopping for women never looked better!