ADVERTISEMENT
home / Make Up Trends and Ideas
स्वतःचा मेकओव्हर स्वतः करा, ‘ह्या’ खास मेकअप टीप्सने (Makeup Tips In Marathi)

स्वतःचा मेकओव्हर स्वतः करा, ‘ह्या’ खास मेकअप टीप्सने (Makeup Tips In Marathi)

मेकअप करायला प्रत्येक मुलीला आवडतं. पण मेकअप करणं ही एक कला आहे आणि आवश्यक नाही की प्रत्येक जण या कलेत पारंगत असेलच. मेकअप हे खूप मोठं क्षेत्र आहे. मेकअप करण्यापासून ते मेकअपमधील बारकावे आणि मेकअप करताना होणाऱ्या चुकाही ह्यात सामील आहेत.काही जणी घरून निघताना अगदी पूर्ण मेकअप करूनच बाहेर पडतात तर काही मुली काजळ आणि लिपस्टीक लावून रेडी होतात. प्रत्येकीची मेकअप करण्याची आवड आणि परिभाषा वेगळी आहे. काहींना मेकअप करायला आवडत तर असतं पण मेकअप करता येत नाही. कारण त्यांना मेकअप टीप्सची माहिती नसते. आम्हाला खात्री आहे की, हे मेकओव्हर गाइड आणि मेकअप टीप्स वाचल्यावर तुम्हाला वारंवार पार्लरमध्ये नाही जावं लागणार.   

मेकअप प्रोडक्ट्स

फेसशेपप्रमाणे मेकअप

त्वचा टोन त्यानुसार मेकअप

ADVERTISEMENT

मेकअप करताना टाळा ‘ह्या’ चुका

ब्रायडल मेकअप

FAQs

मेकअप प्रोडक्ट्स (Makeup Products)

सगळ्यात आधी पाहूया मेकअपसाठी वापरण्यात येणारे मेकअप प्रोडक्ट्सबद्दल. हे सर्व मेकअप प्रोडक्ट्स तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाइन अगदी सहज मिळतील. मेकअप करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते योग्य मेकअप प्रोडक्ट्स निवडणं. फक्त टीव्हीवरील जाहिराती पाहून किंवा मॉलमधील सेल्समनचं ऐकून कोणतंही प्रोडक्ट घेऊ नका. लॅक्मे, मेबलीन न्यूयॉर्क, लॉरियल आणि कलरबार असे कितीतरी ब्रॅंड्स आहेत जे स्कीन टोनप्रमाणे मेकअप प्रोडक्ट्सची रेंज बाजारात आणतात. तुम्हाला फक्त तुमच्या आवडीप्रमाणे स्कीनला सूट होईल असा मेकअप निवडायचा आहे. चांगला मेकअप करण्यासाठी तुमच्याकडे काही चांगले मेकअप प्रोडक्ट्स असणं महत्वाचं आहे. आम्ही तुम्हाला अशाच मेकअप प्रोडक्ट्सबद्दल सांगणार आहोत….

ADVERTISEMENT

फाउंडेशन (Foundation)

मेकअप करताना फाउंडेशन फेसवर सगळ्यात आधी लावण्यात येत. म्हणजेच फाउंडेशन हा तुमच्या मेकअपचा बेस असतो. भारतीय स्कीनटोन साधारणतः नॉर्मल, ड्राय, ऑयली, मिक्स, डार्क आणि लाइट अशा असतात. फाउंडेशनची शेड ही स्कीनटोन्स लक्षात घेऊन बनवल्या जातात. त्यामुळे सर्वात आधी फाउंडेशनची शेड निवडताना तुमच्या चेहऱ्याशी कोणती शेड ब्लेंड होईल ते पाहून घ्या. योग्य टोनचं फाउंडेशन खरेदी करताना सर्वात आधी आपल्या अंगठ्यावर किंवा हातावर थोडं फाउंडेशन लावून बघा. फाउंडेशन तुम्ही गालांवर देखील लावून बघू शकता की ती शेड तुमच्या स्कीनशी मॅच होते की नाही.

कंसीलर (Concealer)

कंसीलरचा वापर चेहऱ्यावरील डाग, व्रण आणि बरेच वेळा लाल चट्टे लपवण्यासाठी केला जातो. ह्याचा उपयोग तुम्ही डोळ्याखालील डार्क सर्कल्स लपवण्यासाठी ही करू शकता. कंसीलरच्या वापराने चेहऱ्यावरील पिंपल्ससुध्दा दिसत नाहीत. जर तुमच्या चेहऱ्याचा रंग साफ असेल तर कंसीलर वापरताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, ते तुमच्या स्कीनटोनशी मॅच होणारं असलं पाहिजे. जर तुमच्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स असतील तर हे जास्त महत्वाचं आहे.

आयलायनर (Eyeliner)

डोळ्यांच्या सौंदर्याला अजूनच खुलवतं ते म्हणजे आयलायनर. हे वेगवेगळ्या स्टाइल्सनी लावता येत असल्याने तुम्ही प्रत्येकवेळी आपल्या डोळ्यांना नवा लूक देऊ शकता. ह्यासाठी तुम्ही लिक्वीड किंवा पेन्सील आयलायनरचा वापर करू शकता. तसं तर सर्वात जास्त ब्लॅक आयलायनरचा वापर केला जातो. पण तुम्ही नेहमीपेक्षा हटके ब्लू, डार्क ग्रीन किंवा इतर ही कलर आयलायनरचा वापर करून नवा लूक ट्राय करू शकता.

मस्कारा (Mascara)

डोळ्यांचे सौंदर्य घनदाट आणि लांबसडक पापण्यांनी खुलून येते. पापण्या जर पातळ आणि लहान असतील तर तुम्ही मस्काराच्या मदतीने त्या दाट आणि सुंदर करू शकता. यासाठी तुम्हाला मस्कारा कसा लावायचा हे जाणून घ्यावं लागेल. ज्यामुळे तुमच्या पापण्या अधिकच सुंदर दिसू लागतील.

ADVERTISEMENT

आयशॅडो (Eyeshadow)

डोळे उठावदार दिसण्यासाठी आयशॅडोचा वापर केला जातो. त्वचेच्या रंगसंगतीप्रमाणे आयशॅडोची शेड निवडायला हवी. जर तुम्ही सावळ्या असाल तर गोल्ड, कॉपर, मॅक्स ब्राऊन, ब्रॉंझ, मॅक्स बर्गंडी यासारख्या शेड्स वापरा. जर तुम्ही गोऱ्या असाल तर रेड, ब्लू, ग्रीन, पिंक, पर्पल, गोल्ड असे कलर डोळ्यांवर फार सुंदर दिसतात.

1. Makeup Tips In Marathi

लिपस्टीक (Lipstick)

लिपस्टीक एक असं प्रोडक्ट आहे जे प्रत्येक मुलीच्या मेकअप बॉक्समध्ये असतंच असतं. लिपस्टीक ही तुमच्या लुक कंप्लीट तर करतेच पण कधी कधी चांगल्या लुकला बिघडवू ही शकते. याच कारणामुळे लिपस्टीकची खरेदी खूप विचारपूर्वक करावी. जर तुम्ही पहिल्यांदा लिपस्टीक खरेदी करायला जाणार असाल तर तुम्ही सगळ्या शेड्स ट्राय करू पाहू शकता. प्रत्येक शेड तुमच्या हातावर लावून बघा. ह्यासाठी तुम्ही शॉपकीपरची मदत पण घेऊ शकता. जर तुमचा रंग सावळा असेल तर रेड, मरून, ब्राऊनसारख्या थोड्या डार्क शेड्स तुम्हाला चांगल्या दिसतील. जर तुम्ही उजळ चेहरा असेल तर सॉफ्ट पिंक, ऑरेंज, निऑन कलर्स आणि न्यूड लिपस्टीक शेड्स तर कोणालाही छान दिसतात.

2. Makeup Tips In Marathi

फेसशेपप्रमाणे मेकअप (Makeup According To Face Shape)

तु्म्हाला माहीत आहे का? तुमच्या फेसशेपप्रमाणे तुमचा मेकअप केला जातो. जसा चेहऱ्याचा आकार तसा मेकअप. आम्ही तुम्हाला फेसशेप आणि त्याप्रमाणे करण्यात येणाऱ्या मेकअपबद्दल सांगणार आहोत.

गोल फेसशेप (Round Face)

गोल चेहरा जेवढा दिसायला सुंदर असतो तेवढाच मोठा ही वाटतो. गोल आकाराच्या चेहऱ्यासाठी डोळ्यांचा मेकअप जास्त प्रभावी असला पाहिजे. त्याबरोबरच गोल चेहऱ्याला स्लिम लूक देणारा मेकअप करायला हवा. गोल चेहऱ्याला स्लिम लूक देण्यात महत्वाची भूमिका कॉन्ट्यूरिंगची असते. चेहऱ्यावर फाउंडेशन किंवा कंसीलरच्या मदतीने  कॉन्ट्यूरिंग केलं जातं. गोल फेसशेप असलेल्या मुलींनी डोळ्यांलर बोल्ड आयलायनर किंवा डार्क आयशॅडो लावलं पाहिजे. ब्लश लावताना गालांवर तिरके स्ट्रोक्स लावावे. ज्यामुळे तुमचे चीकबोन्स जास्त उठून दिसणार नाहीत आणि स्लीम वाटतील.

ADVERTISEMENT
3. Makeup Tips In Marathi

चौकोनी फेसशेप (Square Face Shape)

चौकोनी चेहऱ्याच्या कॉन्ट्यूरिंगसाठी शिमर नसलेल्या मॅट कलर्सचा वापर करा. जे तुमच्या स्कीनटोनच्या 1-2 शेड्स गडद असतील. फेसच्या अॅंगलला कव्हर करण्यासाठी तुम्हाला खास आय मेकअप करावा लागेल. तुमच्या डोळ्यांच्या चारी बाजूंना कलर अॅड करण्याची गरज आहे. ह्यामुळे चेहऱ्यावर कॉन्ट्रास्ट तयार होईल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा शेप बॅलन्स होईल.  

4. Makeup Tips In Marathi

डायमंड फेसशेप (Diamond Face Shape)

ह्या प्रकारचा चेहरा चीकबोन्सपेक्षा रूंद पण हनुवटी आणि कपाळपेक्षा बारीक असतो. डायमंड शेपच्या चेहऱ्याचे कॉन्ट्यूरिंग हे चेहरा बॅलन्स करण्यासाठी केले पाहिजे. सगळ्यात आधी जॉ लाइन आणि कपाळ थोडं मोठं आणि चीकबोन्स थोडे बारीक करायला हवे. ब्लश चीकबोन्सवर लावावं. त्याच्या खालच्या भागात लावू नये. ब्लशचा वापर करतेवेळी लक्षात ठेवा की ह्याची शेड थोडी हलकी आणि दाट पिंक ऐवजी दाट पीच किंवा ब्राउन असावी. तुमचे कपाळ मोठे दिसण्यासाठी आयब्रोज ह्या मध्यभागापासून थोड्या वेगळ्या असाव्यात. ओठाचं म्हणालं तर ब्राइट आणि ग्लॉसी लिप कलर्सऐवजी मॅट लिपस्टीकचा वापर करा आणि तुमचे ओठ भरलेले दिसावेत म्हणून प्रयत्न करा.

5. Makeup Tips In Marathi

अोव्हल फेसशेप (Oval Face Shape)

ओव्हल फेसवर जर चांगला मेकअप केला तर लूक एकदमच बदलून जातो. ओव्हल फेसवर जास्त कॉन्ट्यूरिंग करावे लागत नाही. जर तुम्हाला चीकबोन्स जास्त हाइलाइट करायचे असतील तर तुमच्या चीकबोन्सखाली एक डार्क शेडचे ब्रॉन्झर किंवा ब्लशचा वापर करू शकता आणि गालांच्या अॅपलवर हलक्या शेडचा वापर करा. डोळ्यांच्या सुंदर लूकसाठी आपल्या आयब्रोजच्या नैसर्गिक आर्कवर लक्ष द्या.

वाचा – हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी

ADVERTISEMENT
6. Makeup Tips In Marathi

हार्ट फेसशेप (Heart Face Shape)

हार्ट शेपचा फेसवर कपाळ बाकी चेहऱ्यापेक्षा रूंद, चीकबोन्स जास्त उंचावलेले आणि हनुवटी दिसायला एकदम छोटी असते. हा फेसशेप असलेल्या मुलींनी आपल्या चेहऱ्यावरील उंचवट्यांचा जसं कपाळ, नाकाचं टोक आणि चीकबोन्सवर त्यांच्या नैसर्गिक स्कीनशेडपेक्षा 1-2 शेड डार्क फाउंडेशन लावलं पाहिजे. डोळ्याचं म्हणाल तर नेहमीच डार्क आयलायनरचा वापर करावा. जास्त आयमेकअप टाळावा कारण त्यामुळे तुमचे डोळे अजून छोटे दिसतील.

7. Makeup Tips In Marathi

त्वचा टोन त्यानुसार मेकअप (Makeup According To Skin Tone)

सावळ्या त्वचेसाठी मेकअप (Makeup Tips For Dusky Skin Tone)

सावळा रंग म्हणजे डस्की कॉम्प्लेक्शन. सावळ्या रंगावर अशा मेकअपची गरज असते, जो तुमच्या कॉम्प्लेक्शनला गोरं करण्याऐवजी तुमचे फिचर्स अजून उठावदार करू शकेल. प्रायमर खरेदी करताना लक्षात घ्या की नेहमी तुमच्या स्कीन कलरला मॅच करणार हवं. सावळ्या रंगाचा अंडरटोन बऱ्याचदा थोडा पिवळा रंग असतो, त्यामुळे तुम्ही थोडी पिवळी शेड म्हणजे बनाना कलर फाउंडेशन बेस बनवा. डोळ्यांसाठी मजेंटा, ब्लू, ग्रीन किंवा निऑन कलरच्या शेड्स टाळा. कारण ह्यामुळे तुमची स्कीन डार्क वाटेल. तुमच्यासाठी ब्लशमध्ये सर्वात चांगल ऑप्शन म्हणजे ब्रॉंझ किंवा ब्राऊन आहे. लिपस्टीकमध्ये थोड्याशा लाइट आणि निऑन कलरच्या शेड्स टाळा.

8. Makeup Tips In Marathi

गोऱ्या त्वचेसाठी मेकअप (Makeup Tips For Fair Skin Tone)

गोऱ्या रंगावर जास्त मेकअप चांगला दिसत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा तुमच्या स्कीन टोनपेक्षा एक शेड डीप मेकअप करा. ज्यामुळे चेहऱ्यावरील मेकअप जास्त वाटणार नाही. गोऱ्या रंगावर जास्त कॉन्ट्यूरिंगची गरज नसते.

9. Makeup Tips In Marathi

जर कॉन्ट्यूरिंग करायचं असेल तर नेहमी सॉफ्ट ब्राउन किंवा सॉफ्ट ब्रॉंझ कलरचा वापर करा. कंसीलर नेहमी तुमच्या स्कीन टोनशी मॅच करणार असावं. फक्त डाग-व्रण असल्यास एक शेड ब्राइट कंसीलरचा वापर करा. कॉम्पॅक्टसुध्दा स्कीन टोनपेक्षा एक शेड डार्क ठेवा. जर तुम्ही डोळ्यांसाठी ब्राइट कलरचा वापर केला तर तुमच्यासाठी न्यूड ब्राउन आणि स्कीन कलर लिपस्टीक बेस्ट राहील. रेड कलरची लिपस्टीक लावायची असल्यास आयशॅडोमध्ये वॉर्म कलर जसे ब्राउन, रेड, मरून आणि गोल्ड ह्या कलर्सचा वापर करा.

ADVERTISEMENT

मेकअप करताना टाळा ‘ह्या’ चुका (Makeup Mistakes To Avoid)

1. फाउंडेशची चुकीची शेड निवडणं ही कॉमन चूक आहे. खरंतर फाउंडेशन तुमच्या लूकला बनवू ही शकतं आणि बिगडवू ही शकतं. स्वतःसाठी योग्य फाउंडेशन निवडताना ते आधी आपल्या चेहऱ्याच्या कडेला लावून बघा. जर फाउंडेशन तुमच्या स्कीनमध्ये ब्लेंड होऊन गायब होत असेल तर ते तुमच्या मेकअप बेससाठी एकदम परफेक्ट आहे.

2. आयशॅडो आणि लिपस्टीक जर सारख्या कलरचं असेल तर तेही तुमचा लूक बिगडवू शकतं. जर तुम्ही तुमच्या डोळ्यांना डार्क शेड्स लावत असाल तर ओठांना नेहमी लाइट शेड्सच्या लिपस्टीक वापरा. स्मोकी आईज मेकअप करताना लिपस्टीकची शेड न्यूड किंवा पीच ठेवा.

3. ओठांवर कधी ही डायरेक्ट लिपस्टीक लावू नका. असं केल्यामुळे तुमचे ओठ ड्राय तर होतातच पण फाटू लागतात. लिपस्टीक लावण्याआधी ओठांवर नेहमी व्हॅसलीन लावा. त्यानंतर लिप लायनरने ओठांना शेप द्या आणि मग तुमची आवडती लिपस्टीक शेड लावा.

मेकअप करते समय न करें ये गलतियां, हो सकता है पूरा लुक खराब

ADVERTISEMENT

ब्रायडल मेकअप (Bridal Makeup Tips)

10. Makeup Tips In Marathi

प्रत्येक नववधूसाठी तिच्या लग्नाचा दिवस हा सर्वात खास असतो. ह्या दिवशी तिला सर्वात सुंदर दिसायचं असतं. आणि का नाही वाटणार. नवऱ्यामुलांसह पाहुणे आणि फोटोग्राफरची ही नजर फक्त नववधू असते. चांगले फोटो येण्यासाठी नवऱ्यामुलीचा मेकअप ही तसाच असायला हवा. ह्यासाठी प्रत्येक ब्युटी पार्लरमध्ये नॉर्मल ब्रायडल मेकअपपासून एअर ब्रशपर्यंत अनेक पॅकेजेस असतात. जर ही पॅकेजेस तुमच्या बजेटच्या बाहेर असतील तर तुम्ही घरच्या घरीसुध्दा ब्रायडल मेकअप करू शकता. ह्यासाठी सर्वात आधी तुमची मनपसंत हेअर स्टाइल निवडा. नंतर फाउंडेशन आणि लूज पावडरच्या मदतीने बेस तयार करून घ्या. जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर कंसीलर लावायला विसरू नका. तुमच्या लहंग्याच्या कलरला लक्षात घेऊन आयशॅडो लावा. ब्लॅक आयलायनरच चांगलं वाटतं. आयलॅशेसला दाट करण्यासाठी खोट्या आयलॅशेससुध्दा लावू शकता. आता लिपस्टीक लावण्यासाठी सर्वात आधी लिप पेन्सिलचा वापर करा. लिप पेन्सिल लावल्यावर हळूहळू लिपस्टीक लावा आणि शाइनसाठी थोडं लिप ग्लॉस वापरा. वाटलं तर आधी पूर्ण तयार होऊन स्टेजवर जाताना लिपस्टीक लावा. झाला तुमचा ब्रायडल मेकअप रेडी.

मेकअप टिप्सशी निगडीत प्रश्न-उत्तर / FAQ’s

सीसी क्रीम, फाउंडेशन आणि कंसीलर ह्यात काय फरक आहे?

प्रत्येक मेकअप प्रोडक्टचं काम वेगळं असतं. सीसी क्रीम, फाउंडेशन आणि कंसीलर ह्यांचे ही वेगवेगळे उपयोग आहेत. सीसी क्रीम दिसायला जरी फाउंडेशनसारखं असलं तरी फाउंडेशन बिल्कुल नाही. सीसी क्रीम म्हणजे कलर करेक्शन क्रीम. हे नॉर्मली रोज ऑफिस किंवा कॉलेजला जाताना लावू शकता. हे क्रीम बिना मेकअप तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक आणि सुंदर लूक देतं. तर फाउंडेशन हा मेकअप बेस आहे. कंसीलर हे चेहऱ्यावरी डाग आणि काहीवेळा रेड पॅचेस लपवण्यासाठी वापरतात.

आयलायनर लावण्याच्या किती स्टाइल्स आहेत?

आयलायनरच्या अनेक स्टाइल्स आहेत.डोळ्यांना कॅट आय लूक देण्यासाठी कॅट आयलायनर स्टाइल, विंग्स स्टाइल देण्यासाठी विंग आयलायनर स्टाइल, डोळ्यांना ग्लिटर लूक देण्यासाठी ग्लिटर आयलायनर स्टाइल आणि स्मोकी लूक देण्यासाठी स्मोकी आयलायनर स्टाइलसुध्दा फॅशनमध्ये आहे.

कोणत्या फंक्शनला कोणती लिपस्टीक शेड बेस्ट दिसेल?

जर तुम्ही कॉलेजला जात असाल तर लाइट पिंक लिपस्टीक बेस्ट दिसेल. तर ऑफीस मीटींगसाठी मॅट लिपस्टीक ग्लॉसी लिपस्टीकपेक्षा चांगली दिसेल. कोणत्याही लग्नात किंवा फंक्शनला चेरी कलर लिपस्टीक बेस्ट ठरते. ह्याशिवाय छोट्या फंक्शनसाठी किंवा कॉलेज आणि ऑफिस पार्टीसाठी न्यूड शेड सर्वात चांगली ठरते.

ADVERTISEMENT

मेकअपसाठी किती तऱ्हेचे ब्रश वापरले जातात ?

प्रत्येक मेकअप प्रो़डक्टसाठी वेगळा मेकअप ब्रश वापरला जातो. मार्केटमध्ये तुम्हाला फाउंडेशन ब्रशपासून आयलायनर ब्रश, आयशॅडो ब्रश आणि लिपस्टीकसाठी ही ब्रश मिळतील.

You Might Like These:

Makeup Kits In Marathi

Winter Makeup Tips For Dry, Normal & Oily Skin In Marathi

ADVERTISEMENT

मुंबईतील ‘या’ लई भारी बँक्वेट हॉलमध्ये थाटामाटात करा लग्न

तुमच्या स्किनटोननुसार तुमच्यासाठी या लिपस्टिक आहेत बेस्ट

न्यूड मेकअपसाठी लागणाऱ्या मेकअप प्रोडक्टची निवड

15 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT