चुकूनही तुमच्या चेहऱ्यावर लावू नका ‘या’ ७ गोष्टी, पडू शकतं महागात

चुकूनही तुमच्या चेहऱ्यावर लावू नका ‘या’ ७ गोष्टी, पडू शकतं महागात

कधीही कोणत्याही कारणानं तुमच्या चेहऱ्यावर एखादी पुळी आली अथवा अगदी हलकसं सनबर्न दिसून आलं किंवा अगदी कोणतीही लहान गोष्ट चेहऱ्यावर दिसून आली तर हजार लोक तुम्हाला न मागता सल्ला द्यायला येत असतात. आम्ही तुम्हाला हीच जाणीव करून देऊ इच्छितो की, असे सल्ले तुम्हाला बरेच महागातही पडून शकतात आणि फायदा होण्याऐवजी तुमचं बरंच नुकसानही होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या चेहऱ्यासाठी काय योग्य आहे आणि कोणत्या गोष्टीचा वापर केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला नुकसान होऊ शकतं हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे.


1. दारू


never-use-these-7-things-on-your-face 2
तुम्ही जेव्हा तुमचे स्किन केअर प्रॉडक्ट्स खरेदी करत असता तेव्हा तुम्हाला माहीत असायला हवं की, या उत्पादनांमध्ये दारू मिसळलेली असते. अशा उत्पादनांमध्ये दारू मिसळलेली असल्यास, त्वचा कोरडी होणे, त्वचेवर रॅश येणं अशा समस्यांना बऱ्याच जणींना हमखास सामोरं जावं लागतं याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी जेव्हा कोणत्याही उत्पादनाची खरेदी कराल, तेव्हा त्यात दारू नाही याची शहानिशा करून घ्यावी अन्यथा तुम्हाला अशी उत्पादनं घेणं महागात पडू शकतं.


2. पेट्रोलियम


पेट्रोलियम जेली स्किन केअर उत्पादनांमध्ये असणं ही साधारण गोष्ट असल्याचं तुम्हाला वाटत असेल. मात्र, इथे आम्ही पेट्रोलियम जेलीबद्दल नाही तर केवळ पेट्रोलियमबद्दल बोलत आहोत. या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून अगदी वेगळ्या आहेत. तुमच्या त्वचेवर लावण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये पेट्रोलियम असल्यास, तुमच्या त्वचेसाठी हे अजिबातच चांगलं नाही. त्वचेवर अतिशय वाईट प्रभाव यामुळं पडतो. यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होऊन चेहऱ्यावर मुरुमं आणू शकतं अथवा तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र अर्थात पोर्स बंद करू शकतं. अशी उत्पादनं चेहऱ्यावर लावल्यास, तुम्हाला खाजही येऊ शकते वा रॅशेस होण्याचीही शक्यता असते.


Also Read Vaseline Uses In Marathi


3. बेकिंग सोडा


never-use-these-7-things-on-your-face 3
तसं तर म्हटलं जातं की, बेकिंग सोडा चेहऱ्यासाठी चांगला असतो. मात्र, तुम्हाला वाटत असेल की, त्वचेसाठी आम्ही बेकिंग सोडा वाईट असतो असं का सांगत आहोत. वास्तविक आम्ही यासाठी असं सांगत आहोत कारण, बेकिंग सोड्याची पीएच व्हॅल्यू अतिशय जास्त आहे. जर तुम्ही बेकिंग सोडा योग्य प्रमाणात पाणी आणि इतर वस्तूंबरोबर मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास, त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. मात्र याचं प्रमाण चुकल्यास, तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं याचा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.


4. हेअर प्रॉडक्ट्स


never-use-these-7-things-on-your-face 4
तुम्ही जर तुमच्या केसांसाठी हेअरडाय, हेअर स्प्रे अथवा जास्त स्ट्रॉंग शॅम्पू वापरत असाल, तर त्याने तुमच्या त्वचेला काही त्रास तर होत नाही ना ही काळजी घ्यायला हवी. हेच कारण आहे. हेअर प्रॉडक्ट्समध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स असतात, जे तुमच्या नाजूक त्वचेला नुकसानदायी असतात. यापैकी काही उत्पादनं अशीही असतात, ज्यामुळे तुमची त्वचा बर्न होण्याची शक्यता असते. त्वचा यामुळे कोरडी होणं हे तर हमखास होतंच. त्यामुळं हेअर प्रॉडक्ट्स वापरताना चेहरा व्यवस्थितरित्या कव्हर करून घ्यायला हवा.


5. फ्रेगरन्स
अधिकतर स्किन केअर प्रॉडक्ट्स हे सुगंधी आणि केमिकल्सने बनलेले असतात. हा सुगंध अर्थात फ्रेगरन्स तुमच्या त्वचेवर इरिटेशन अर्थात अॅलर्जीचं कारण होऊ शकतं. तुमची त्वचा अगदीच नाजूक असल्यास, नक्कीच हे यामुळं अॅलर्जी येऊ शकते. त्यासाठी तुम्ही अति सुगंधी उत्पादनं आपल्या त्वचेपासून दूर ठेवा. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी कोणतंही स्किन केअर खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा, त्यामध्ये जास्त सुगंध असता कामा नये. याचा एक फायदा असाही होतो की, सुगंध नसलेल्या उत्पादनांमध्ये केमिकलचा वापरदेखील कमी करण्यात आलेला असतो. त्यामुळं तुमची नाजूक आणि कोमल त्वचादेखील चमकदार आणि डागविरहित राहते.


6. व्हिनेगर


never-use-these-7-things-on-your-face 5
वास्तविक व्हिनेगरचा वापर बऱ्याच स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये करण्यात येतो. मात्र जर हे व्हिनेगर आर्टिफिशियल असेल तर तुमची त्वचा यामुळे बर्न होऊ शकते. उत्कृष्ट दर्जाचं व्हिनेगर असलं तरीही त्वचेपासून व्हिनेगर लांबच ठेवायला हवं कारण यामुळं त्वचा कोरडी होते. तुम्ही जरी व्हिनेगरचा वापर करत असाल, तरीही पाण्यात घालून मिक्स करून याचा वापर करावा, जेणेकरून तुमच्या त्वचेला कोणताही अपाय होणार नाही.


7. मेयोनीज
आजकाल खाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मेयोनीजचा वापर करण्यात येतो. इतकंच नाही तर ब्युटी ट्रीटमेंट्ससाठीदेखील मेयोनीज वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. लक्षात ठेवायला हवं की, मेयोनीजमध्येदेखील आर्टिफिशियल व्हिनेगरचा वापर करण्यात येतो, जे त्वचेसाठी अतिशय खराब असतं. याच्या उपयोगामुळे त्वचेवरील पोर्स बंद होण्याची शक्यता असते आणि असंही होऊ शकतं की, तुमचा चेहरा पूर्ण मुरूमांनी भरू शकतो.


तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:


Types Of Pimples, Causes & Ways To Get Rid Of It In Marathi