प्रियांकाला लग्नासाठी निकने दिला आलिशान व्हिला गिफ्ट

प्रियांकाला लग्नासाठी निकने दिला आलिशान व्हिला गिफ्ट

प्रियांका आणि निकच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता आहे. आपल्याकडे लग्नामध्ये बऱ्याच गोष्टी एकमेकांना गिफ्ट म्हणून द्यायची पद्धत असते किंवा काही जण अगदी मनापासून आपल्या जोडीदाराला अंगठी, नेकलेस, फूल वा चॉकलेट आपापल्या परीने जे जमेल ते गिफ्ट म्हणून देत असतात. पण आपल्या देसी गर्लचा अंदाजच काही वेगळा आहे. देसी गर्लचा होणारा नवरा निक जोनस अर्थात अंग्रेजी बाबू देसी गर्लच्या प्रेमात अखंड बुडाला आहे असंच म्हणता येईल. निकने प्रियांकाला लग्नाचं गिफ्ट म्हणून लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान व्हिला दिला आहे. हा व्हिला केवळ सुंदरच नाही तर अगदी ऐशोआरामाने भरपूर असा आहे. हा आलिशान व्हिला कसा दिसतो हे आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आलिशान व्हिला सर्व गोष्टी उपलब्ध असून कोणालाही हवाहवासा वाटेल असाच आहे. सामान्य माणसाला कदाचित हे घर स्वप्नामध्येच शक्य आहे. मात्र देसी गर्ल प्रियांकासाठी निकने अगदी भारतीय संस्कृती लक्षात ठेवून हे घर बनवलं असून गिफ्ट केलं आहे.


priyanka-chopra-nick-jonas-Villa 10


निकचं खरोखरंच प्रियांकावर अतिशय प्रेम आहे असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. इतकंच नाही तर त्याच्या मनामध्ये भारतीय सभ्यता आणि परंपरांनाही तितकाच मान आहे. भारतीय संस्कृतीचा सन्मान करूनच निकने या आलिशान व्हिलामध्ये सर्व इंटिरिअर करून घेतलं आहे. त्यामुळेच दोघेही एकमेकांच्या संस्कृतीचा मान ठेऊन हे लग्न करत आहेत.


priyanka-chopra-nick-jonas-Villa 11 


सुत्रांच्या सांगण्यानुसार, निक जोनसने प्रियांकाला देण्यासाठी एका प्रसिद्ध ठिकाणी अर्थात लॉस एंजेलिसमधील बेवर्ली हिल्सच्या समोर एक आलिशान व्हिला खरेदी केला असून या विलावर साधारण ६५ लाख खरेदी केले आहेत. त्यामुळे अगदी बारकाईने भारतीय संस्कृती आणि आधुनिकीकरण याचं मिक्स्चर या व्हिलामध्ये करण्यात आलेलं आहे. तसंच बरीच मोकळी जागाही ठेवण्यात आली आहे. पाहा कसं आहे बेडरूम -


 priyanka-chopra-nick-jonas-Villa 3


फोटोग्राफ्स पाहिले तरी या व्हिलाचं इंटिरिअर अतिशय उत्कृष्ट आहे हे सांगणंही तितकंच महत्त्वाचं आहे. खेळती हवा आणि तितकंच खेळतं वातावरण राहील असं इंटिरिअर या व्हिलामध्ये करण्यात आलेलं आहे. व्हिलामधील लिव्हिंग एरिया आणि त्यासमोर पूल कसा आहे ते पाहा -


 priyanka-chopra-nick-jonas-Villa 6


 


असं सांगण्यात येत आहे की, हा आलिशान व्हिला जवळजवळ ४१२९ चौरस फूट क्षेत्रामध्ये बांधण्यात आला असून यामध्ये ५ बेडरूम्स, ४ बाथरूम्स आणि एक मोठा पूल समाविष्ट आहे. प्रियांका चोप्राच्या या नव्या घराची मागची बाजूही अतिशय सुंदर असून या घराला गच्चीही आहे. स्विमिंग पूलबाहेरील आकर्षक देखावा पाहा -


priyanka-chopra-nick-jonas-villa 1


priyanka-chopra-nick-jonas-Villa 2
प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या विलामधील अजून एक सुंदर रूम जिथून बेवर्ली हिल्सचा सुंदर नजारा दिसतो.


priyanka-chopra-nick-jonas-Villa 9
या आलिशान घराचा अजून एक सुंदर देखावा तुम्ही पाहू शकता -


priyanka-chopra-nick-jonas-Villa 13
हा फोटो पाहून तर तुम्हालाही कळेल की, हे अतिशय आलिशान असं बाथरूम आहे, जे आपल्या घरातील बेडरूमपेक्षाही खूप मोठं आहे.


priyanka-chopra-nick-jonas-Villa 8


priyanka-chopra-nick-jonas-Villa 7
या व्हिलामध्ये एक स्टडी रूमदेखील आहे. हे स्टडी रूमदेखील अतिशय आकर्षक पद्धतीने बनवण्यात आलं आहे. हे बघूनच वाचायला आवडत नसलं तरीही वाचावं असं वाटू लागेल.


priyanka-chopra-nick-jonas-Villa 4


इमेज सोर्स - इन्स्टाग्राम