रणवीर - दीपिकानंतर आता चाहत्यांना वेध लागले आहेत ते म्हणजे प्रियांका आणि निकच्या लग्नाचे. येत्या २ आणि ३ डिसेंबरला प्रियांका आणि निक लग्नबंधनात अडकणार आहेत. आपल्यापेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनसबरोबर प्रियांका लग्नबंधनात अडकत आहे. गेले संपूर्ण वर्षभर या दोघांचंही नातं हा चर्चेचा विषय होता. आता दोघेही जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये शाही लग्न करणार आहेत. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु असून हे दोघेही अगदी खास तऱ्हेने उमेद भवनमध्ये ‘एन्ट्री’ घेणार आहेत. आतापर्यंत बऱ्याचदा चित्रपटांमध्ये ग्रॅंड एन्ट्री घेणाऱ्या प्रियांकाची लग्नामध्येही एन्ट्री ग्रँड असणार आहे.
कशी करणार प्रियांका - निक ‘एन्ट्री’
प्रियांका आणि निक या दोघांनाही भारताबाहेर लग्न न करता भारतातील जोधपूर हे ठिकाण लग्नासाठी निवडलं असून त्यांची ‘एन्ट्री’देखील अगदी ग्रँड असणार आहे. लग्नस्थळावर दोघेही हेलिकॉप्टरने पोहचणार आहेत. थोडं आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे नवरा आणि नवरी दोघेही लग्नाच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने येणार आहेत. इतकंच नाही तर जोधपूर एअरपोर्टवरून लग्नाचे सर्व वऱ्हाडी हे लग्नस्थळी हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यामुळे उमेद भवनमध्ये सध्या एक हेलिपॅड उभारण्यात येत आहे. मेवाड हेलिकॉप्टर्स सर्व्हिसने या वृत्ताला दुजोराही दिला आहे. २९ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर या दोन दिवसांसाठी एक चॉपर बुक करण्यात आल्याचं या सर्व्हिसकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अर्थातच चाहत्यांना रणवीर - दीपिकाच्या फोटोसाठी ताटकळत राहावं लागलं होतं तसंच निक आणि प्रियांकाच्या फोटोसाठीही ताटकळत राहावं लागणार आहे. कारण जोधपूर एअरपोर्टवरून प्रियांका आणि निक मध्ये कुठेही थांबणार नसून हेलिकॉप्टरने उमेद भवनलाच थेट जाणार आहेत. कोणालाही त्यांचा फोटो काढण्याची कोणतीही संधी त्यांनी ठेवलेली नाही.
लग्नाचे फोटो इंटरनॅशनल कंपनीला १८ कोटींना विकले
प्रियांका आणि निक केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे फोटो पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. दरम्यान त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटी रुपयांना विकले असल्याचीही चर्चा सध्या चालू आहे. यापूर्वी सोनम आणि आनंद आहुजा यांनीही आपल्या लग्नाचे फोटो ‘वोग’ मासिकाला विकले होते. अर्थात सेलिब्रिटीजने असे फोटोज विकणं हे नवं नाही.
कसे असतील विधी?
जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये २९ नोव्हेंबरला सर्व विधी सुरु होतील. २९ तारखेला निकच्या नावाची मेंदी प्रियांकाच्या हातावर काढण्यात येईल. यानंतर ३० तारखेला जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्यामध्ये संगीत सोहळा असेल. याच दिवशी प्रियांका आणि निक कॉकटेल पार्टी आपल्या प्रियजनांसाठी होस्ट करणार आहेत. या पार्टीमध्ये प्रियांका आणि निकच्या जवळचे मित्र आणि अन्य नातेवाईक असतील. १ डिसेंबरला दोघांचीही हळद असेल आणि त्यानंतर २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने दोघेही लग्नबंधनात अडकतील. तर ३ डिसेंबरला हे जोडपं ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहेत. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी पार पडणार आहे. लग्नानंतर प्रियांका आणि निक दोन रिसेप्शन देणार आहेत. त्यापैकी एक दिल्लीमध्ये असेल आणि दुसरे रिसेप्शन मुंबईमध्ये असेल. यामध्ये प्रियांका आपल्या बॉलीवूडमधील मित्रमंडळींना बोलावणार आहे.