दीपिका - रणवीरच्या मुंबई रिसेप्शनचा रॉयल लुक

दीपिका - रणवीरच्या मुंबई रिसेप्शनचा रॉयल लुक

दीपिका आणि रणवीर ही प्रेक्षकांची सर्वात आवडती जोडी आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. लग्नापासून ते बंगलुरूमध्ये झालेल्या रिसेप्शनपर्यंत सर्वच ठिकाणी दीपवीरचा लुक रॉयल राहिला आहे. त्यामुळे आजच्या मुंबईच्या रिसेप्शनमध्ये दोघं कोणत्या लुकमध्ये समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. दीपिका आणि रणवीरचा पहिलाच लुक समोर आला असून दोघांचा जोडा नजर लागण्यासारखा दिसत आहे. मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये दीपिका आणि रणवीरने आपल्या निकटवर्तीयांसाठी रिसेप्शन ठेवलं असून अजून एक रिसेप्शन १ डिसेंबरला आपल्या बॉलीवूडमधील मित्रांसाठी ठेवण्यात आलं आहे. २८ डिसेंबरला रात्री ८ वाजल्यापासून हे रिसेप्शन चालू झालं असून दोघांचाही पहिला फोटो रणवीरच्या इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे.


mumbai reception
काय खास लुक आहे?


रणवीर आणि दीपिका दोघांनीही एकाच रंगाचं को-ऑर्डिनेशन या रिसेप्शनलाही केलं आहे. अगदी लग्नाला मुंबईतून निघण्यापासून ते आतापर्यंत दोघांनाही एकाच रंगाच्या को-ऑर्डिनेशनमध्ये पाहण्यात आलं आहे. दोघांनीही ऑफव्हाईट रंगाचे कपडे घातले असून त्याला गोल्डन एम्ब्रोडरी करण्यात आल्याचं दिसत आहे. दोघेही एकमेकांना अतिशय चांगल्या तऱ्हेने मॅच करत असून दीपिका कोणत्याही अप्सरेपेक्षा कमी सुंदर दिसत नाही. शिवाय लग्नानंतरचा नवरीच्या चेहऱ्यावरील एक चमक दीपिकाच्या चेहऱ्यावरही दिसून येत आहे. इतकंच नाही तर दीपिकाने साडीला मॅच होणारे अगदी रॉयल दागिनेही चढवले आहेत. अगदी राजेरजवाड्यातील राणीप्रमाणेच दीपिका सजली असून रणवीरचा लुकही तिला साजेसा आहे. अगदी राजाला शोभेल असा लुक रणवीरला देण्यात आला आहे. दोघेही खऱ्या आयुष्यातील बाजीराव - मस्तानी वाटत आहेत असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती होणार नाही. 


रणवीर या लुकमध्ये अगदी शाही वाटत असून दीपिकाही अत्यंत सुंदर महाराणी असल्याचं जाणवत आहे. प्रत्येक रिसेप्शनला वेगळा लुक ठेवला असून दोघांच्या एकमेकांवरील प्रेमामुळेच त्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडत आहे असंही म्हणता येईल. 


royal look


इमेज सोर्स - इन्स्टाग्राम