ADVERTISEMENT
home / Care
हिवाळ्यामध्ये अशी घ्या त्वचेची काळजी (Winter Skin Care Tips In Marathi)

हिवाळ्यामध्ये अशी घ्या त्वचेची काळजी (Winter Skin Care Tips In Marathi)

आपण सगळे जास्त करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी या बद्दल जास्त जागरूक असतो परंतु असे नाहीये सर्व ऋतू मध्ये त्वचेवर वेगवेगळे परिणाम होत असतात. आता कुठे… जरा गुलाबी थंडी पडू लागली आहे. हिवाळ्यामध्ये तब्येतीबरोबरच त्वचेची काळजी घ्या घेणंही तितकंच गरजेचं असतं. कारण थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. तसंच थंड हवेमुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे त्वचा रुक्ष व निर्जीव वाटू लागते. ब्युटी एक्सपर्ट्सनुसार या ऋतूत आपल्या त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. आता हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत जाणून घ्यायला हवं की, विंटरमध्ये नक्की त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्यावी. सर्वोत्तम त्वचा काळजी उत्पादने नक्की कोणती हे जाणून घ्यायचे असेल तर मग वाचा हा आर्टिकल. 

हिवाळ्यासाठी स्किन केअर टिप्स

हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी स्किन केअर

हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

ADVERTISEMENT

हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी टिप्स

विंटर स्किन केअर टिप्स (Winter Skin Care Tips In Marathi)

थंडीच्या मौसमात स्किन (skin) खूपच कोरडी आणि निर्जीव होते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी विविध प्रकारे घ्यावी लागते. या हिवाळ्यात तुम्हीही आपल्या स्किनसाठी हे खास स्किन केअर टिप्स (skin care tips) फॉलो करा. 

कोमट पाणी (Lukewarm Water)

थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणं साहजिक आहे. पण प्रयत्न करा की, तुम्ही जास्त वेळ गरम पाण्याच्या संपर्कात राहणार नाही. शक्य असल्यास थंड पाण्याने चेहरा आणि हात धुवा किंवा गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा (lukewarm water) वापर करावा. कोमट पाणी तुमच्या त्वचेतील आर्द्रता कायम ठेवतं आणि एसेंशियल ऑयल (essential oil) सुद्धा कायम ठेवतं. 

Also Read Tips For Skincare In Marathi

ADVERTISEMENT

मॉईश्चराईजर आहे आवश्यक (Moisturizer)

winter-skin-care-tips-in-marathi

थंडीच्या दिवसात आपल्या चेहऱ्याला मॉईश्चराईज (moisturize) करणं खूपच आवश्यक असतं. त्यामुळे हलक्या हाताने ओल्या चेहऱ्यावर मॉईश्चराईजर (moisturizer) लावा. ज्यामुळे मॉइश्चर अनेक तास चेहऱ्यावर लॉक राहील. तुमच्या हातानांही मॉईश्चराईजर लावायला विसरू नका. आंघोळ केल्यानंतर लगेच शरीराला मॉईश्चराईजर नक्की लावा. शरीराचा जो भाग मोकळ्या हवेच्या संपर्कात येत असेल तिथे मॉईश्चराईजर नक्की लावा. 

एक्सफोलिएशनने पडेल फरक (Exfoliate)

हिवाळ्यात चेहऱ्यावरील डेड सेल्स (dead cells) हटवणं आवश्यक असतं. डेड सेल्स (dead cells) वाढल्याने तुमच्या चेहऱ्याला आवश्यक तेवढी आर्द्रता मिळत नाही. त्यामुळे मॉईश्चराईजर लावण्याआधी त्वचेला एक्सफॉलिएट  (exfoliate) करायला विसरू नका. थंडीमध्ये केमिकल पील ट्रीटमेंट (chemical peel treatment) सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. 

जास्त पाणी प्या (Drink Plently of Water)

winter-skin-care-tips-in-marathi

थंडीत साधारणतः आपलं पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं आणि चहा आणि कॉफीचं सेवन जास्त होतं. आपले स्किन सेल्स (skin cells) ना हायड्रेटेड (hydrated) ठेवण्यासाठी आवश्यक आहे की, आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवणं. जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. चेहराही तजेलदार राहतो. त्यामुळे दिवसभरात किमान 3 लीटर पाणी पिण्याचं टार्गेट सेट करा. 

चॅप्ड आणि ड्राय ओठांसाठी लिप बाम

ADVERTISEMENT

डाएट चार्टमध्ये करा बदल (Change in Diet)

थंडीच्या दिवसात हिरव्यागार पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. तसंच गाजर आणि मटारसारख्या भाज्याही मिळतात. त्यामुळे त्याच्या रोजच्या डाएट (diet) मध्ये डाळ आणि फळांसोबतच मेथी, सोया मेथी, गाजर, आणि पालक यासारख्या भाज्यांचं प्रमाण वाढवा. मूठभर बदाम आणि अक्रोडसुद्धा तुमच्या डाएटमध्ये सामील करा.

फेसमास्कचा करा वापर (Use Face Mask)

आठवड्यातून दोनदा जेल (gel) किंवा क्रीम (cream) बेस्ड फेस मास्क (face mask) चा प्रयोग केल्यास तुमच्या चेहऱ्याचं मॉईश्चर कायम राहील आणि टॉक्सिन (toxin) बाहरे पडण्यासही मदत होईल. थंडीच्या दिवसात त्वचा जास्त कोमल आणि तजेलदार दिसण्यासाठी दही आणि साखरेचं मिश्रणही तुम्ही लावू शकता. कोरड्या त्वचेसाठी दूध एक उत्तम टॉनिक म्हणून काम करतं. तुम्ही हवं असल्यास कोणत्याही फेसपॅकमध्ये दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता किंवा फक्त दूधानेही चेहऱ्यावर मसाज करू शकता. 

विसरू नका सनस्क्रीन (Use Sunscreen)

winter-skin-care-tips-in-marathi

उन्हाळ्याच्या दिवसता सनस्क्रीन (sunscreen) वापरणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच थंडीच्या दिवसातही. बरेचदा आपण थंडीत सनस्क्रिन लावायला विसरतो. पण हे चुकीचं आहे. थंडीच्या दिवसातही आवर्जून सनस्क्रिन वापराच. यामुळे सूर्याच्या अल्ट्राव्हॉयलेट (ultraviolet) किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण होईल आणि त्वचेची न्यूट्रीशन लेव्हलसुद्धा संतुलित राहील.

गुड नाईट विथ क्रीम (Night Cream)

थंडीच्या दिवसात झोपण्याआधी चेहऱ्यावर नाईट क्रीम (night cream) जरूर लावा. स्किनला रिपेअर (repair) करण्यासाठी एक चांगल्या क्वालिटीचं कोल्ड क्रीमसुद्धा जरूर लावा. पिस्त्याची गणतीसुद्धा एक चांगलं मॉईश्चराईजर म्हणून केली जाते. 

ADVERTISEMENT

ओठांशिवाय इतरही गोष्टींसाठीही होऊ शकतो व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचा वापर

हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी स्किन केअर (Winter Skin Care Tips For Dry Skin)

winter-skin-care-tips-for-dry-skin-in-marathi

थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. कारण कोरडी त्वचा असणाऱ्यांना कोरड्या हवामानामुळे जास्त समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी स्किन केअरसाठी खास टिप्स. 

योग्य पद्धतीने करा मॉईश्चराईजिंग (Moisturize)

थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेला मॉईश्चराईजिंग करणं हे तर आलंच पण किती प्रमाणात आणि किती वेळा हे जास्त महत्त्वाचं आहे. चांगल्या हाताची काळजी उत्पादने आणि क्रीम वापरुन आपल्याला आपली त्वचा मॉइश्चराइझ करण्याची आवश्यकता आहे. बरेच वेळा हात पाण्याने धुतल्यानेही हातांना कोरडेपणा येतो. अशावेळी व्हॅसलिन जेलीचा वापर करा किंवा हात धुतल्यानंतर त्यांना बॉडी लोशनने मसाज करायला विसरू नका.

सनस्क्रीन हवंच (Apply Sunscreen)

कोरडी त्वचा असणाऱ्यांनीही स्किन डॅमेज आणि तीव्र सूर्य किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रिन लावणं आवश्यक आहे. फक्त आवर्जून वापर करा जास्त एसपीएफ असलेल्या सनस्क्रिनचा. ज्यामुळे तुमची स्किन डॅमेज आणि कोरडी होणार नाही. 

ADVERTISEMENT

कंपल्सरी कोमट पाणी (Hot Water Bath)

Winter-hair-care-tips-in-marathi

ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी तर हिवाळ्यात कंपल्सरी कोमट पाण्यानेच आंघोळ करायला हवी. कारण गरम पाण्याने आंघोळ केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात कोरडेपणा जाणवू शकतो. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास तुमची त्वचा जास्त कोरडी होत नाही.

ओठांची विशेष काळजी (Take Care of Your Lips)

कोरडी त्वचा असणाऱ्यांना ओठ फुटण्याची समस्या तीव्रतेने जाणवते. त्यामुळे तुमची त्वचा जर कोरडी असल्यास शक्यतो थंडीत लिप ग्लॉस किंवा मॅट लिपस्टीक वापरणं टाळा. कारण यामुळे ओठ जास्त कोरडे होतात. त्यापेक्षा व्हॅसलीन जेली किंवा लिपबामचा वापर करावा. 

आंघोळीनंतर लगेच त्वचा कोरडी करा

आंघोळ केल्यानंतर त्वचा मॉईश्चराईज करणं महत्वाचं आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेतील मॉईश्चर लॉक होईल. त्यामुळे आंघोळ करून बाहेर आल्यावर टॉवेलने त्वचा पुसून लगेच मॉईश्चराईजर लावा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. 

डिहायड्रेशन टाळण्यासाठी (Keep Your Skin Hydrated)

आपण नेहमी ऐकतो की, भरपूर पाणी प्यायला हवं. हेच थंडीतही महत्त्वाचं आहे. त्यासोबत ताज्या फळांचे ज्यूस प्या. तसंच पालेभाज्या आणि टॉमेटो, ब्रोकोली, कलिंगडसारखी फळं खा. ज्यांच्यात भरपूर वॉटर कंटेट असतं. अल्कोहोल आणि खारट-तळलेलं फूड टाळा. कारण यामुळे शरीर जास्त डिहायड्रेट होतं आणि ज्यामुळे त्वचा जास्त ड्राय होते. 

ADVERTISEMENT

हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स (Winter Care Tips for Hair)

थंडीमध्ये केस धुण्याचा बरेचदा कंटाळा केला जातो. कारण ते पटकन सुकत नाही आणि सर्दी होण्याचीही शक्यता असते. या हिवाळ्यात सुंदर केसांसाठी फॉलो करा खास हेअर केअर टिप्स (hair care tips)

1. Moisturizing आहे सर्वात महत्त्वाचं (Use Conditioner)

थंडीत हवामान खूपच कोरडं असतं. ज्यामुळे तुमची त्वचा आणि केस दोन्हीमधली मॉईश्चर कमी होतं. अशावेळी तुम्ही शँपू आणि कंडीशनर या दोन्हींचा वापर moisturizing साठी करावा. यामुळे केस frizzy होणार नाहीत. 

2. हेअर मास्क लावायला विसरू नका (Hair Mask)

hair-care-tips-forwinters-in-marathi

तुमच्या विंटर हेअर-केअर रुटीनमध्ये hair-mask जरूर असावा. या मौसमात मेहंदीचा मास्क खूप थंड वाटू शकतो, त्याऐवजी तुम्ही अंड्याचा मास्क ट्राय करू शकता. शक्य असल्यास हा मास्क रात्रभर केसांवर राहू द्या. ज्यामुळे केसांमध्ये ते चांगलं absorb होईल.

3. थंडीमध्ये (Argan Oil)

आर्गन ऑईल केसांसाठी उत्तम असतं कारण हे केसांना instant moisturizing करतं. जर तुमच्या केसांसाठी हे जास्त हेवी असेल तर तुम्ही हेअर स्टाईलिस्टला विचारून याचं लाईट व्हर्जनसुद्धा वापरू शकता. 

ADVERTISEMENT

4. हीटिंग उपकरणे टाळा (Avoid Using Heating Appliances)

lip-care-tips-for-winters-in-marathi

हिटींग अप्लायंसेस म्हणजे स्ट्रेटनर, ड्रायर आणि कर्लर हे तुमच्या केसांतील आर्द्रता नाहीशी करतात. यामुळे थंडीच्या दिवसात यांचा कमीत कमी वापर करा. जर तुम्ही केस लवकर सुकवायचे असतील तर फक्त blow dry चा वापर करा. 

5. कधी-कधी वापरा Spray (Don’t Use Hair Spray Frequently)

जर तुमच्या रूटीनमध्ये तुम्हाला हीटिंग उपकरणे टाळणं शक्य नसेल तर एखादा चांगला heat-protective spray नक्की वापरा. ज्यामुळे तुमच्या केसांचं कमीत कमी नुकसान होईल. 

6. ऑईलिंग आहे आवश्यक (Oiling)

lip-care-tips-for-winters-in-marathi

थंडीच्या दिवसात कोरड्या हवेमुळे आपल्या केसांची त्वचा फारच कोरडी होते. ज्यामुळे केसात डँड्रफ (dandruff) होण्याची शक्यता वाढते. तसंच केसांची चमक कायम ठेवण्यासाठी आणि केसांना योग्य न्यूट्रीशन (nutrition) मिळावं यासाठी हॉट ऑईल हेअर मसाज (hot oil hair massage) आणि ऑईलिंग (oiling) ला तुमच्या डेली रूटीनचा महत्त्वाचा भाग बनवा.

7. Trimming : सर्वात सोपी ट्रिक (Trim Your Hair Frequently)

Regular trim केसांसाठी आवश्यक आहे खासकरून हिवाळ्यात dry-ends पासून सुटका मिळवण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे. तसंच यामुळे तुमच्या केसांची वाढही चांगली होईल आणि केस निरोगी दिसतील. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळी मेहनतही घ्यावी लागणार नाही. 

ADVERTISEMENT

8. केसांसाठी गरम पाणी? (Use Lukewarm Water)

आंघोळीसाठी गरम पाणी ठीक आहे. पण शँपू करताना गरम पाण्याचा वापर करू नका. यामुळे केस जास्त dry होतात. जर थंडीमुळे किंवा सर्दी होईल म्हणून तुम्हाला थंड पाण्याने केस धुवायचे नसतील तर कोमट पाणी वापरा आणि सर्वात शेवटी एक थंड पाण्याचा shot जरूर घ्या. 

9. केमिकल प्रोडक्ट्सला बायबाय (Don’t Use Chemical Products)

शँपू (shampoo) तुमच्या केस स्वच्छ करतो पण सोबतच केसांमधील नॅचरल ऑईलसुद्धा नाहीसं करतो. केसांमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी फक्त आठवड्यातून एक किंवा दोनदाच शँपूचा वापर करा. असा शँपू वापरण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये केमिकल्स नसतील. 

lip-care-tips-for-winters-in-marathi

10. कंडीशनर तर हवंच (Use Conditioner)

थंडीमध्ये मॉईश्चर बॅलन्स करणं फार महत्त्वाचं आहे. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा डीप कंडीशनिंग (deep conditioning) केल्यास केसातील मॉईश्चर लॉक करता येतं. केसांच्या आरोग्यासाठी हवं असल्यास तुम्ही मॉईश्चराईजिंग हेअर मास्क (hair mask) चा ही वापर करू शकता. 

घरीच कशी तयार कराल पेट्रोलियम जेली

ADVERTISEMENT

ओठांची काळजी घेण्यासाठी टिप्स (Lip Care Tips)

हिवाळ्यात ओठ फुटणं ही साधारण समस्या आहे. पण काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला हा त्रास जाणवणार नाही. हिवाळ्यासाठी खास लिप केअर टिप्स (lip care tips).

hair-care-tips-forwinters-in-marathi

अलमंड ऑईलचं महत्त्व (Use Almond Oil)

बदामाच्या तेलात (almond oil) व्हिटॅमीन ई चं प्रमाण अधिक असतं. फुटलेल्या ओठांवर बदामाचं तेल हा रामबाण उपाय आहे. अलमंड ऑईलमध्ये तुम्ही मधही मिक्स करून हे मिश्रण लावू शकता. 

लिप बटर आहे आवश्यक (Lip Butter)

ओठांचा कोरडेपणा टाळायचा असल्यास लिप बटर (lip butter) चा वापर आवश्यक आहे. लिप बटरमुळे ओठांना आर्द्रता मिळते आणि ते सॉफ्ट राहतात. घरगुती उपाय म्हणून तुम्ही लोणी किंवा तूप ओठांना लावू शकता. 

लिकिंग ची सवय टाळा (Don’t Lick Your Lips)

थंडीच्या दिवसात लोकांना ओठांवर जीभ फिरवण्याची वाईट सवय लागते. पण जर तुम्हाला फुटलेले ओठ टाळायचे असतील तर ही सवय तुम्हाला बदलावी लागेल. 

ADVERTISEMENT

नॅचरल स्किन केअर (Ghee)

जर तुम्ही लिप बाम (lip balm) किंवा मॉईश्चराईजरचा वापर करत असाल तर असा लिप बाम घ्या ज्यामध्ये कोकोनट ऑईल (coconut oil), शिया बटर (shea butter), कोकोआ बटर (cocoa butter) आणि बीवॅक्स (beaswax) हे घटक असतील. 

मग तुम्हीही थंडीच्या दिवसात त्वचेची, केसांची आणि ओठांची काळजी घेण्यासाठी वरील टिप्सचा वापर करा. 

You Might Like This:

कोरड्या त्वचेसाठी सोपे घरगुती उपाय

ADVERTISEMENT

केसांच्या वाढीसाठी माहीत असायला हव्यात उत्कृष्ट मसाजच्या पद्धती

20 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT