त्वचा काळजी सौंदर्य उत्पादने - Skincare Beauty Products in Marathi | POPxo

ह्या '5' स्कीन केअर प्रोडक्ट्सशिवाय अपूर्ण आहे तुमचं ब्युटी रुटीन

 ह्या '5' स्कीन केअर प्रोडक्ट्सशिवाय अपूर्ण आहे तुमचं ब्युटी रुटीन

आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्कीन केअर प्रोडक्टस रोजच्या रोज येतात. त्यामुळे अर्थातच तुम्ही एवढे प्रॉडक्टस् बघून चक्रावल्यासारखं होत असेल आणि नेमकं कोणतं प्रोडक्ट घ्यायचं हेही कळत नसेल. पण तुम्हाला आमचा मोलाचा सल्ला आहे की, आपल्या मेहनतीची कमाई कोणत्याही प्रोडक्टसवर उधळू नका. हेही लक्षात घ्या की, रोज रोज वेगवेगळे प्रोडक्ट वापरण्या इतका वेळ आजकाल कोणालाच नसतो. नाही... गोंधळून जाऊ नका, कारण तुमच्यासाठी हे सर्व सोपं जावं. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही गरजेच्या स्कीन केअर प्रोडक्टसबाबत माहिती देणार आहोत. असे प्रोडक्टस की ज्यांच्याशिवाय तुमचं ब्युटी रुटीन अपूर्ण आहे.


फेसवॉश


Makeup Remover collage %281%29


चेहरा धुण्यासाठी साबण वापरणं आता आऊटडेटेड झालंय. आता साबणाऐवजी लोकं फेसवॉश वापरु लागले आहेत. तुमच्या स्कीन टाईपला सूटेबल असा फेसवॉश नेहमीच तुमच्या पर्स आणि बाथरूममध्ये असायलाच हवा. फेसवॉशने रोज सकाळ- संध्याकाळ चेहरा धुवा. ज्यामुळे चेहरा स्वच्छ राहील.


बॉडीवॉश


bath-bathroom-bathtub-716437


जर तुम्ही तोंड साबणाने धुवत नसाल तर मग बाकी शरीरावर तरी अत्याचार का?  साबणामुळे स्कीन कोरडी होते. त्यामुळे स्कीनची काळजी घ्या आणि साबणाला जरा लांबच ठेवा. बाजारात अनेक ब्रँड्सचे चांगले बॉडीवॉश उपलब्ध आहेत.मॉयश्चराइज


skin-care2


त्वचा कोरडी राहणं कधीही वाईटच. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का? तेलकट त्वचेलाही तारूण्यपूर्ण, निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी मॉयश्चराइज करणं गरजेचं असतं. त्यामुळे असं मॉयश्चराइजर वापरा जे त्वचेत लगेच जिरेल आणि त्वचेवर चिकटपणा ही राहणार नाही. पण त्याचसोबत तुम्ही स्कीन टाईप आणि स्कीनची गरज ओळखून मॉयश्चरायजर निवडायला विसरु नका. उदाहरणच द्यायचं झालं तर कोरड्या त्वचेसाठी नेहमी हेवी मॉयश्चराइयर आणि तेलकट त्वचेसाठी ऑईल-फ्री किंवा वॉटरबेस्ड मॉइश्चराइजर निवडावं.


सनस्क्रीन


Sunscreen


आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, सनस्क्रीन लावणं किती गरजेचं असतं पण तरी आपण नियमितपणे ते लावत नाहीच. उन्हाळ्यात तर युव्ही किरणांमुळे सनबर्न होतं. त्यामुळे स्कीनची स्वतःची नैसर्गिक चमक हरवते. मैत्रिणींनो, हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर चांगल्या सनस्क्रीनला पर्याय नाही. त्यामुळे सनस्क्रीन रोज आणि मोकळ्या जागी जाताना प्रत्येकवेळी वापराच.  मेकअप रिमूव्हर


skin-care


तुम्हाला माहीत असेलच की, झोपण्यापूर्वी मेकअप काढणं किती गरजेचं आहे. तरीही तुम्हाला त्याचा कंटाळा येत असेल आणि जास्त कष्ट घ्यायचे नसतील तर बाजारात मिळणारे मेकअप रिमूव्हर वाइप्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही मेकअप कराल, तेव्हा तो काढण्यासाठी हे वापरायला विसरु नका.नाईट क्रीम


New 1


रोज  प्रदूषण आणि सनबर्नचा मारा सहन करत, दिवस संपत आला की आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव वाटू लागते. त्यामुळे झोपताना एखादं चांगलं नाइट क्रीम लावा. हे क्रीम रात्रभर तुमच्या त्वचेचं पोषण करेल आणि त्यामुळे तुमची स्कीन सकाळी पुन्हा सॉफ्ट आणि बुमिंग वाटेल. तुम्ही तिशीच्या असाल तर फाइन लाइंस टाळण्यासाठी अंडर आयक्रीम किंवा सेरम वापरायला सुरुवात करा. कारण बऱ्याचदा डोळ्याखाली सुरकुत्या यायला सुरूवात होते. त्यामुळे आयक्रीम वापरायला विसरु नका.

SHIPPING
We offer free shipping on all orders (Terms & Conditions apply). The orders are usually delivered within 4-6 business days.
REPLACEMENT
Your item is eligible for a free replacement within 15 days of delivery, in an unlikely event of damaged, defective or different/wrong item delivered to you. All the beauty products are non-returnable due to hygiene and personal care nature of the product. Please send an email to  care@popxo.com to have your order replaced.
HELP & ADVICE
For questions regarding any product or your order(s), please mail us at  care@popxo.com and we will get back to you with a resolution within 48 hours. Working Hours: Monday to Friday, from 10 AM to 6 PM.