Successful Life Bedroom Vastu Tips in Marathi | POPxo

वास्तू टीप्स:  चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान

वास्तू टीप्स:  चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान

कितीतरी वेळा आपण एखादं काम सुरळीत होण्यासाठी आपलं 100% पणाला लावतो. पण असं करूनही जेव्हा रिजल्ट आपल्या विचारांच्या अगदी उलट येतो तेव्हा हाती लागते ते अपयश. मग ते ऑफिसमधील प्रमोशन असो परीक्षेतील फर्स्ट क्लास असो वा यशस्वी जीवन असो. प्रत्येक वेळी होईल असं वाटणाऱ्या कामात अडथळा येतो. ह्या गोष्टीला तुमची झोपही कारणीभूत असू शकते. कारण झोपेचा संबंंध हा तुमच्या एनर्जीशी असतो. जितकी गाढ झोप तितके जास्त तुम्ही एनर्जेटीक असता. पण जर उशीरा झोप लागणं किंवा रात्री वारंवार जाग येत असेल, तर तुमच्या बेडरूममध्ये वास्तूदोष असू शकतो. जर तुम्ही तुमच्या बेडरूममधील काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचं लक नेहमी चांगलंच राहील. ह्यासाठी तुम्हाला फक्त वास्तूशी निगडीत काही सोप्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.    


1 - बेडच्या जवळची जागा तुम्ही नेहमीच स्वच्छ ठेवत असाल पण कधी-कधी बेड थोडासा सरकवून त्याच्या खालील सफाई केलीत तर चांगल होईल. कारण बेडच्या खाली जर घाण असेल तर ह्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. घरातील कोणी ना कोणी सदस्य सतत आजारी राहतो, म्हणून बेडच्या खालील जागासुध्दा स्वच्छ ठेवली पाहिजे.  


2 - तुमची बेडरूम अशी असावी की जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांना तुमचा बेड थेट दिसणार नाही. जर दरवाजासमोर बेड असेल त्याला थोड शिफ्ट करा. नाहीतर वास्तूदोषामुळे दांपत्याच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमची रूम छोटी असेल आणि बेड शिफ्ट करता येणार नसेल तर पडदा लावावा.


यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स (Goodluck Vastu Tips)


3 - तुमच्या बेडरूम अशी कोणतीही वस्तू नसावी ज्यामुळे आवाज होईल. जसं रेडिओ, टीव्ही किंवा कोणतेही वाद्य यंत्र. ह्यामुळे आर्थिक समस्या, मानसिक तणाव, आजारपण इत्यादी समस्या निर्माण होतात. आपल्या बेडरूममध्ये अशा ठिकाणी विंडचाइम लावावे जिथून हवा येत असेल. विंडचाइमचा मधूर आवाज कानावर पडल्याने तुम्हाला एक आनंद मिळतो आणि तणाव कमी होतो. तसंच घरातील वातावरणसुध्दा पॉजिटीव्ह एनर्जीयुक्त राहतं.  


4 - बेडच्या समोर कधीही आरसा नसावा. ह्यामुले समाजात बदनामी होण्याची सदैव चिंता राहते. वास्तूशास्त्रानुसार, सकाळी उठल्यावर सर्वात आधी आरसा बघू नये. जर तुम्ही असं केलंत तर दिवसभर तुमच्याबरोबर चूकीच्या गोष्टी होतील. ज्या तुम्हाला दुःखी करतील. ह्यामुळे सकाळी उठल्यावर असा एखादा फोटो बघा ज्याने तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळेल. 


उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’5 - आजकालच्या मॉडर्न काळात  बेडरूममध्ये बूट-चपला ठेवण्याचीही जागा असते. ते योग्य नाही. झोपण्याच्या खोलीत कधीही बाहेर घालण्याची चप्पल किंवा बूट ठेऊ नये. ह्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यासाठी प्रयत्न करा की, तुमच्या बेडरूमबाहेर बूट-चपला ठेवायची वेगळी जागा असावी.


6 -  चूकूनही कधी बेडच्या आसपास खाण्याची कोणतीही वस्तू ठेऊ नका किंवा बेडरूममध्ये खाऊ ही नका. कारण हे दारिद्रयाचं लक्षण आहे. जेवण नेहमी किचन किंवा डायनिंग एरियामध्ये बसून स्वच्छ जागी जेवावं.


7 - लक्षात ठेवा की, तुमचा बेड कधीही छताच्या खांबाखाली नसावा. जर तुमचा बेड अशा ठिकाणी आहे, जिथे खांब अगदी तुमच्या डोक्याच्या बाजूला येतो. तर तो बाजूला करावा. कारण खांबाखाली झोपल्याने डोक्यावर सतत दबाव असल्यासारखं जाणवतं आणि तणावसुध्दा वाढतो.


bedroom-389258 640


8 - बेडच्या मागे कधीही खिडकी किंवा मोकळी जागा असून नये. त्यामुळे आसपासची सगळी सकारात्मक उर्जा बाहेर निघून जाते. म्हणून बेडच्या मागे भिंत असावी. ज्यामुळे तुम्हाला जास्त उर्जा मिळते.


घराच्या सौदर्यांत भर टाकणाऱ्या 'कॉटन आणि हँडलूम' पडद्यांच्या टेंडविषयी बरंच काही...


9 - बेडरूममध्ये चूकूनही पाण्याचे चित्र किंवा फोटो लावू नये. ह्यामुळे घरात आर्थिक चणचण कायम राहते.


10 - बेडरूममध्ये बेडवर झोपताना डोक नेहमी पूर्व किंवा दक्षिण बाजूला असावं. ह्यामुळे झोपेत कोणताही अडथळा येत नाही.