ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
पहायलाच हवेत हे बॉलीवूडचे टॉप ’15’ थरारपट

पहायलाच हवेत हे बॉलीवूडचे टॉप ’15’ थरारपट

बॉलीवूड चित्रपटांमध्ये बऱ्याच जणांना खरंतर रोमॅंटीक चित्रपट आवडतात, पण थरार चित्रपटसुध्दा मनोरंजनाच्या कॅटेगरीत एकदम टॉपला आहेत. जर तुम्ही बॉलीवूड आणि थरारक चित्रपटांचे चाहते असाल तर पुढील थरार चित्रपटांची लिस्ट पाहून हे चित्रपट तुम्ही आजच्या आज पहायला सुरूवात केलीच पाहीजे.   

वजीर (2016)

 

हा एक थरार चित्रपट आहे. ज्याची सांगड बुध्दीबळाशी घालण्यात आली आहे.  खऱ्या आयुष्यात ही बुध्दीबळाचा खेळ कसा रंगत जातो आणि एक शुल्लक प्याद ही राजाला कसं मात देतं. हे ह्या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्या प्याद्याकडे क्षुद्र म्हणून कधीच दुर्लक्ष करायचं नसतं. कारण एका ठराविक ठिकाणी पोहचल्यावर त्याच्याकडे वजीरा इतकीच ताकद येते. वजीरची सुरूवातच जबरदस्त आहे. कथानकाला गती आहे आणि ते अजिबात भरकटत नाही. त्यात वजीरची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तरची जबरदस्त अदाकारी.

ADVERTISEMENT

कहानी- 2 (2016)

 

‘कहानी 2’ एक डार्क मूव्ही आहे. ज्यात थोडं रहस्य, थोडा थरारा अश्या खास गोष्टी आहेत. ह्या चित्रपटात काही चुकाही टाळता आल्या असत्या. सुजॉय घोष दिग्दर्शित ‘कहानी’ (2012) बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट थरारक चित्रपटांपैकी एक आहे. कारण सुजॉयने सिध्द केलंय कुठल्याही चेजिंग सिनशिवाय तसंच गन, स्टाइलिश लुक आणि लार्जर दॅन लाईफ इफेक्टशिवायही एक उत्कृष्ट थ्रिलर मुव्ही बनवला आहे. कहानी पार्ट टू मध्ये नवीन कथा आणि नवी पात्र आहेत. विद्या बालनने यावेळी विद्या बागची नाही तर विद्या सिन्हा साकारली आहे, तिच्या मुलीचं म्हणजेच मिनीचं अपहरण होतं आणि विद्या तिला शोधायला निघते. मात्र रस्त्यात एक दुर्घटना घडते, त्यामुळे ती कोमात जाते. प्रकरणाचा शोध लावण्यासाठी इन्स्पेक्टर इंद्रजीत सिंह (अर्जुन रामपाल) हॉस्पिटलमध्ये पोहचतो आणि तो विद्याला कुख्यात गुन्हेगार दुर्गा रानी सिंह समजतो, जिच्या मागावर अनेक वर्षांपासून पोलिस आहेत. आता विद्या आणि दुर्गा एक आहेत का? दुर्गा गुन्हेगार का झाली? इंद्रजीत सिंह तिला कसा ओळखतो? याचं कोडं हळू हळू ह्या कथेत उलगडत.

Also Read Movies To Watch After Breakup In Marathi

ADVERTISEMENT

रहस्य (2015)

 

मनीष गुप्ता दिग्दर्शित चित्रपट ‘रहस्य’ च्या संबंधात दिग्दर्शकाने असे म्हटलं आहे की, ही कथा आरुषी हत्याकांडावर आधारीत नाही. मात्र चित्रपट पाहिल्यावर लगेच कळतं की, कथा ही आरुषी केसवरच बेतलेला आहे. फक्त फरक इतकाच आहे की, दिल्ली ऐवजी ही घटना मुंबईत घडली आहे असं दाखवण्यात आलं. या चित्रपटात खून झालेल्या लहान मुलीची म्हणजेच आयेशाची भूमिका साक्षी सेमने साकारली आहे. आशीष विद्यार्थी आणि टिस्का चोपडाने तिचे डॉक्टर आई-बाप वठवले आहेत आणि केके मेननने प्रकरणाचा छडा लावणाऱ्या  सीबीआय ऑफिसरची भूमिका साकारली आहे.

दृश्यम (2015)

ADVERTISEMENT

 

दृश्यम् म्हणजे 2015 साली निशिकांत कामतने दिग्दर्शित केलेला थ्रिलर-ड्रामा आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका वठवली आहे ती अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बूने. कुमार मंगत पाठक, अजीत आंध्रे आणि अभिषेक पाठक यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मूळ लेखक जीतू जोसेफने लिहिलेली आणि 2013 साली प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ हा मल्याळम चित्रपटाचं हिंदी रूपांतरण आहे. चित्रपटांमध्ये अजय देवगणच्या पत्नीचा रोल तामीळ अभिनेत्री श्रिया सरनने केला आहे. विशेष म्हणजे यात अभिनेत्री तब्बूची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

एन-एच 10 (NH10) (2015)

 

ADVERTISEMENT

नवदीप सिंहने दिग्दर्शित केलेला एन एच 10  हा एक भारतीय क्राइम थ्रिलर मुव्ही आहे. या चित्रपटांमध्ये भारतातील महिलांची स्थिती, त्यांच्यावरील पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा, त्यातून घडणारं  ऑनर किलिंग आणि भारतातली कायदा व्यवस्था या सगळ्या गोष्टी खूप चतुराईने मांडल्या आहेत. यात अनुष्का शर्मा आणि नील भूपलम प्रमुख भुमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अनुष्का शर्मा चित्रपट निर्मितीमध्ये उतरली आहे. चित्रपटाची कथा सुरू होते ती रोड ट्रीपला निघालेल्या जोडप्याने. हे जोडप सापडतं गुंडांच्या तावडीत आणि मग सुरु होतो पाठलागाचा थरार खेळ.

डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी (2015)

 

हा चित्रपट डिटेक्टीव्ह ब्‍योमकेश बक्शी या  भारतातल्या पहिल्या गुप्तहेराच्या  किस्स्यांवर बेतला आहे. या चित्रपटाची कथा बंगालचे सुप्रसिध्द लेखक शरादिंदो बंडोपाध्‍याय यांनी लिहीली असून दिबाकर बॅनर्जींनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये दुसऱ्या महायुध्दाचा म्हणजेच 1940 चा काळ दाखवला असून कथा कोलकत्याच्या आसपास घडते. यामध्ये युध्दादरम्यान ब्‍योमकेश बक्शींनी केलेली धाडसी कामगिरी पाहायला मिळते. कथा अशी आहे की, नुकताच कॉलेज पासआऊट झालेला विद्यार्थी जेव्हा एका बुध्दीवान पण दुष्ट माणसाला भेटतो आणि स्वतःसाठी खड्डा खणत जातो. गुन्हेगारांच्या जगतातील अट्टल आणि खतरनाक गुन्हेगार आणि त्यांच्या अवतीभोवती चालणारं आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण आणि लालसा अशा गर्ततेत अडकलेला ब्‍योमकेश अापली बुद्धिमत्‍ता वापरुन कोडं सोडवतो आणि त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतो.

ADVERTISEMENT

स्पेशल 26 (2013)

 

स्पेशल 26  हा एक असा सिनेमा आहे, ज्यात हिंसेला स्थान नाही. 80 च्या दशकात काही फसवणूकीच्या घटना घडल्या, त्यावर आधारित ह्या चित्रपटाचं कथानक आहे. काळा पैसा बाळगून असलेल्या काही नेत्यांवर आणि व्यापाऱ्यांवर एक नकली सीबीआय अधिकारी आणि त्याची टीम छापे घालून कशा प्रकारे दागिने आणि रोकड जप्त करते आणि ह्या गोष्टीची बाहेरही वाच्यता होऊ शकत नाही, कारण शिकार ठरलेलेच अपराधी आहेत. या चलाख ठगांना ‘स्पेशल 26’ मध्ये हिरो बनवलं आहे, कारण ते रॉबिनहुडसारखे आहेत. जे फक्त श्रीमंतांनाच लुटतात. हा चित्रपट बघताना मजा येते कारण चोर आणि पोलिसांमधला रंगलेला बुध्दीचा सामना.

अग्ली – Ugly (2013)

ADVERTISEMENT

 

 

अनुराग कश्यपच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये एकाच वेळी अनेक प्रश्न आणि समांतर चालणारी कथानक सुरू असतात. यामध्ये मानवी स्वभावाचे अनेक चांगले आणि वाईट चेहरे समोर येतात. त्याच्या चित्रपटामध्ये असते नवीन कथा आणि सामान्य स्टार कास्ट. त्यामुळे प्रत्येक चित्रपट हा कमाल असताे. ‘अग्‍ली’ बाबत ही अगदी तसंच आहे.  अनुरागच्या इतर चित्रपटाप्रमाणे हा देखील डार्क चित्रपट आहे. गोष्ट साधी पण खिळवून ठेवणारी आहे. अनुरागने या मुव्हीमध्ये माणसांच्या भावनांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि आधुनिक जीवनातील गोष्टींमुळे नात्यांमधली गुंतागुंत त्याने दाखविली आहे. या गोष्टीत 10 वर्षांच्या लहानगीचे अपहरण होते. या चित्रपटातील पात्र वास्तववादी वाटतात आणि त्या गोष्टीत आपण गुंतत जातो. हा चित्रपट इतर बॉलीवूडच्या चित्रपटांपेक्षा अगदी वेगळा आहे. यात लाऊड म्यूजिक आणि नाच-गाण्यांचा भडीमार केलेला नाही.

कहानी (2012)

ADVERTISEMENT

 

‘कहानी’ एक थरार चित्रपट आहे, मात्र बॉलीवूडच्या इतर थरारपटांपेक्षा हटके आहे. या ‘कहानी’तली नायिका गरोदर आहे आणि कशाच्यातरी शोधात इकडेतिकडे हिंडतेय. तिच्यासोबत एक सामान्य पोलीस ऑफीसर असतो. गंमत म्हणजे कोलकता शहर जे ‘सिटी ऑफ जॉय’ म्हणून ओळखलं जातं, तेही या सिनेमातलं पात्रच आहे. सेतूने कोलकाताच्या गल्ली-बोळातून मोठ्या खुबीने कॅमेरा फिरवलाय. शांत किंवा गजबजलेल्या गल्ल्या, शानदार मेट्रो, गलिच्छ ट्राम, पिवळ्या रंगाच्या टॅक्सीज, बेशिस्त ट्रॅफिक आणि दुर्गापूजेसाठी सजलेलं कोलकाता हेही कहानीमधील एक पात्र बनलंय. कहानी दर्जेदार ठरला दमदार कथा आणि स्क्रीनप्लेमुळे.   

तलाश (2012)

 

ADVERTISEMENT

तलाश एक चांगला थरार चित्रपट आहे. ज्यात पोलिस ऑफिसर सुर्जन शेखावत (आमिर खान) एका चित्रपट अभिनेत्याच्या कार दुर्घटनेत झालेल्या मृत्यूची तपासणी करतोय. त्याचबरोबर त्याच्या खासगी आयुष्याचीही वाईट अवस्था आहे. त्याच्या ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालेला असतो. परिणामी त्याची बायको रोशनी (रानी मुखर्जी) आणि त्याच्यामधले संबंध तणावपूर्ण होतात. मात्र चित्रपटाच्या शेवटी जेव्हा सारी रहस्य उलगडतात, तेव्हा अनपेक्षित शेवटाने प्रेक्षक थक्कच होतात. संपूर्ण चित्रपट तुम्हाला अगदी आपलासा वाटावा म्हणून दिग्दर्शकाने विशेष काळजी घेतली आहे.

404 (2011)

 

हल्ली हॉरर चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. ह्यातीलच एक उदाहरण म्हणजे ‘404’ हा चित्रपट होय.  ज्यामध्ये विज्ञान आणि दुष्ट शक्तींमधलं व्दंद चतुराईने दाखवण्यात आलं. चित्रपट सुरु होताच कळत की, हा चित्रपट इतर हॉरर बॉलिवूड चित्रपटांपेक्षा हटके आहे. महत्त्वाचं म्हणजे भितीदायक दृष्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी त्याने लाऊड म्युझिक वापरलं नाही, तरीही चित्रपटातला सस्पेन्स कायम राहतो.

ADVERTISEMENT

कार्तिक कॉलिंग कार्तिक (2010)

 

सस्पेंस थ्रिलर चित्रपट ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’च्या शेवटाशी तुम्ही सहमत असाल अथवा नसाल. पण तरीही उत्तम सादरीकरण आणि उत्कृष्ट अभिनय यासाठी तरी तुम्ही हा चित्रपट नक्की पहाच. चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक विजय ललवानीने ही कथा पडद्यावर मस्त रंगवली आहे. हा चित्रपट तुम्हाला अक्षरशः खिळवून ठेवतो. चित्रपटाची लुक एकदम यूथफुल आहे आणि मेट्रो कल्चर कलाकारांनी छान रंगवलं आहे. फरहान आणि दीपिकाचा रोमांसही पडद्यावर छान दिसतोय. दोघांमध्ये केमेस्ट्रीही चांगलीच जुळलीयं. एक हॉट तर दुसरा कूल.  

ए वेन्सडे ! (2008)

ADVERTISEMENT

 

‘ए वेन्सडे’ चित्रपट म्हणजे एका सामान्य माणसात असलेल्या असामान्य ताकदीची गोष्ट आहे. यामध्ये मुंबईत एका बुधवारी 2 ते 6 दरम्यान घडणाऱ्या घटना दाखवल्या आहेत. अशा घटना ज्या रेकॉर्ड्सवर नाहीत. चित्रपटाची गोष्ट दमदार आहेच आणि  लेखक, निग्दर्शक नीरज पांडेने चांगल्या पध्दतीने ती पडद्यावर मांडलीयं. शेवटपर्यंत ही कथा तुम्हाला बांधून ठेवते. यात बरेच चढ-उतार दाखवले आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर नवं आव्हान येतं. दीड तासांच्या या चित्रपटामध्ये एकही गाणं नाही किंवा फालतू सीन नाही. नसीरूद्दीन शाहच्या यादगार सिनेमांच्या यादीत ‘ए वेन्सडे’ चं नाव नक्कीच सामील होईल.

जॉनी गद्दार (2007)

 

ADVERTISEMENT

‘जॉनी गद्दार’ मस्त थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटातली कथा जेम्स हॅडली चेजच्या कादंबरीवर आधारीत आहे. संपूर्ण कथा सिंगल ट्रॅकवर चालते. यामध्ये कॉमेडी, रोमांस, नाच-गाणी काहीच नाही, तरीही ती पाहताना आजिबात कंटाळवाणं वाटत नाही, उलट खिळवूनच ठेवते. चित्रपटांमध्ये प्रत्येक कलाकाराने शानदार अभिनय केला आहे. नील मुकेशने त्याच्या करियरची सुरुवात नकारात्मक भूमिकेतून केली असली तरी त्याला यात चांगला रोल मिळाला आहे.

मनोरमा सिक्स फीट अंडर (2007)

 

 

ADVERTISEMENT

दिग्दर्शक नवदीप सिंहने अभय देओलला घेऊन ‘मनोरमा : सिक्स फीट अंडर’ चित्रपट बनवला आहे. यामध्ये थ्रिल आणि मर्डर मिस्ट्री दाखवलीच आहे पण त्याचबरोबर मनुष्य आणि समाजाशी जोडलेल्या काही मुद्द्यांनाही स्पर्श केला आहे. ही अशा एका गुप्तचराची कथा आहे जो पेश्याने गुप्तहेर नसतो, पण एका प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या प्रयत्नात असतानाच, त्यात तो स्वतः फसतो. हा चित्रपट पाहताना बरेच प्रश्न समोर येतात, जसे की गुप्तहेराला म्हणजेच एसव्हीला कोणी अडकवण्याचा प्रयत्न करत तर नसेल? तो खोट्या आणि खुनाच्या जाळ्यात सापडणार तर नाही ना? हळूहळू या प्रश्नांची उत्तर सापडत जातात.

26 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT